जळकोटमध्ये जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीची तयारी पूर्ण; ५ फेब्रुवारीला मतदान
लातूर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी जळकोट तालुक्यात प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून, सर्व संबंधितांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी स्वाती दाभाडे यांनी केले. ३ जिल्हा परिषद गट व ६ पंचायत समिती गणांच्या निवडणुका ५ फेब्रुवारी रोजी होणार आहेत. यंदा जळकोट तालुक्यात सहा नवीन बूथ वाढल्याची माहितीही त्यांनी दिली. या बैठकीस तहसीलदार राजेश लांडगे, नगरपंचायत मुख्याधिकारी रोहित आरबोळे, नायब तहसीलदार रंगनाथ कराड उपस्थित होते. जळकोट तालुक्यात एकूण ८४ मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली असून, यावर्षी ६ नवीन बूधांची वाढ करण्यात आली आहे. एकूण मतदारसंख्या ६५,३३८ असून त्यात ३३,९५७ पुरुष व ३१.३८१ महिला मतदारांचा समावेश आहे. ऑगस्ट २०२५ ची अंतिम मतदार यादी ग्राह्य धरली जाणार आहे.
१० झोनल अधिकारी उमेदवारांनी नामनिर्देशन लवकर दाखल करावे, जेणेकरून आवश्यक तपासणी व त्रुटीची पूर्तता करण्यासाठी वेळ मिळेल, असे स्पष्ट करण्यात आले. उमेदवारांना नामनिर्देशनाच्या दिवसापासून निकालापर्यंत रोजचा खर्च नोंदविणे बंधनकारक राहील, मतदान केंद्रांची दुरुस्ती मंडळाधिकाऱ्याकडे सोपवण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांना दोन टप्प्यांत प्रशिक्षण दिले जाणार असून दोन वैद्यकीय पथकांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान ने-आण करण्यासाठी ६ बसेस व १६ जीप अशा एकूण २२ वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. ८ झोनल अधिकारी व २ अतिरिक्त झोनल अधिकारी अशी एकूण १० झोनल अधिकायांची नेमणूक करण्यात आली आहे.
मतदारसंघाबाहेरील उमेदवारानी साक्षाकित मतदार यादी सादर करणे, अनामत रक्कम रोख स्वरूपात भरणे तसेच आरक्षित जागेसाठी जात व वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असल्याचे सांगण्यात आले. जळकोट तालुक्यातील वाढीव ६ बूथ केकतसिंदगी, कोकनूर, करंजी, सुल्लाळी, आतनूर व गव्हाण येथे त्याच इमारतीत बाजूला देण्यात आले आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर १,२०० पेक्षा अधिक मतदार असणार नाहीत. आचारसंहितेचा भंग झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
हेही वाचा: Latur Panchayat Samiti Election 2026: पंचायत समिती निवडणूक रणधुमाळी; उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी शिक्षण विभागामार्फत पथनाट्यांच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे. निवडणूक ड्युटीवरील कर्मचा-यांसाठी टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून वृद्ध व दिव्यांग मतदारासाठी व्हीलचेअरची व्यवस्था असेल. यावेळी होम व्होटिंग घेतले जाणार नाही. संवेदनशील गावांमाये अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. आचारसंहिता पथक, खर्च पथक व एक खिडकी सुविधेद्वारे रोगी, बॅनर, एनओसी आदी परवानग्या देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
स्ट्रॉग रूमची निर्मिती करण्यात आली असून मतमोजणी नवीन प्रशासकीय इमारतीच्या आवारात होणार आहे. होडिंग काढून घेण्याच्या सूचना ग्रामसेवक व शासकीय कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. या निवडणुकीसाठी शिक्षण, महसूल, पोलीस व पंचायत समिती विभागातील मिळून सुमारे ६०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून तालुक्यात दोन चेक पोस्टही स्थापन करण्यात आले आहेत.






