Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rupali Chakankar News: भोंदूबाबाचे कारनामे भोवले! महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना मुख्यमंत्र्यांचे राजीनाम्याचे आदेश?

नाशिकच्या भोंदू ज्योतिषी अशोक खरातसोबतचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 20, 2026 | 08:20 PM
महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना मुख्यमंत्र्यांचे राजीनाम्याचे आदेश? (Photo Credit-X)

महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना मुख्यमंत्र्यांचे राजीनाम्याचे आदेश? (Photo Credit-X)

Follow Us
Follow Us:

 

  • भोंदूबाबाचे कारनामे भोवले!
  • महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना मुख्यमंत्र्यांचे राजीनाम्याचे आदेश?
  • मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीनंतर मोठे पाऊल
Rupali Chakankar Resignation News: नाशिकमधील ज्योतिषी अशोक खरात याला एका महिलेच्या लैंगिक शोषणप्रकरणी अटक झाल्यानंतर दररोज नवनवे धक्कादायक खुलासे होत आहेत. या प्रकरणाचे पडसाद आता थेट राज्य महिला आयोगापर्यंत पोहोचले असून, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागण्याची दाट शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चाकणकर यांना तात्काळ राजीनामा देण्याचे आदेश दिले आहेत.

पाद्यपूजेचा व्हिडिओ आणि फोटोंमुळे खळबळ

शेकडो महिलांच्या लैंगिक शोषणाचा आरोप असलेला भोंदू बाबा अशोक खरात याच्यासोबत रुपाली चाकणकर यांचे काही फोटो आणि विशेषतः त्याची ‘पाद्यपूजा’ करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. महिलांच्या हक्कासाठी लढणाऱ्या आयोगाच्या अध्यक्षांचेच एका शोषण करणाऱ्या भोंदू बाबासोबत असे व्हिडिओ समोर आल्याने सर्वच स्तरांतून संताप व्यक्त केला जात होता. विरोधकांसह सर्वसामान्यांकडूनही त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली होती.

मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीनंतर मोठे पाऊल

वाढता दबाव आणि टीकेचा भडीमार झाल्यानंतर रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. मात्र, या प्रकरणाची गंभीरता घेता, मुख्यमंत्र्यांनी चाकणकर यांना पदावरून पायउतार होण्याचे स्पष्ट निर्देश दिल्याची माहिती मिळत आहे. रुपाली चाकणकर यांच्याकडे राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद असून त्यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा प्राप्त आहे.

महिलांचे शोषण करणारा अशोक खरात महाराष्ट्राचा ‘आसाराम बापू’, खरातला कोणाचा राजकीय आशिर्वाद? काँग्रेसचा सवाल

रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याबाबत आदिती तटकरे यांची स्पष्ट भूमिका

रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याबाबत आदिती तटकरे यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. त्या म्हणाल्या या विषयावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनित्रा पवार हेच एकत्रितपणे निर्णय घेतील. पीडित महिलांना न्याय: एक महिला म्हणून माझी भूमिका स्पष्ट आहे की, राज्यातील पीडित महिलांना न्याय मिळाला पाहिजे. तो न्याय मिळवून देताना कायदेशीर आणि प्रशासकीय दृष्टिकोनातून जे काही निर्णय घेणे आवश्यक आहे, ते आमचे तिन्ही प्रमुख नेते घेतील.

खरातसारख्या भोंदूना पाठबळ – हर्षवर्धन सपकाळ

महिला आयोगाने महिला शोषणाच्या विरोधात काम करणे अपेक्षित आहे पण महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी अशोक खरातची पाद्यपूजा केली हे त्यांचे कृत्य खरातसारख्या भोंदूना पाठबळ देणारे आहे. असा प्रकार त्यांच्याकडून पहिल्यांदाच झालेला नाही तर पुण्यातील हगवणे प्रकरण असो वा साताऱ्यातील महिला डॉक्टरचे प्रकरण, चाकणकर आरोपीची पाठराखण करताना दिसल्य़ा आहेत. खरे तर त्यांचे कामकाज पाहता आतापर्यंत त्यांचा राजीनामा व्हायला पाहिजे होता, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

राज्य महिला आयोगाच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह?

महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या घटनात्मक पदावरील व्यक्तीचे अशा वादग्रस्त व्यक्तीशी संबंध असणे, हे नैतिकदृष्ट्या चुकीचे असल्याचे मत अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे. या प्रकरणामुळे महिला आयोगाच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. आता चाकणकर यांचा राजीनामा झाल्यास, या प्रकरणाला मोठे राजकीय वळण लागण्याची शक्यता आहे.

Captain Ashok Kharat च्या साम्राज्यावर हातोडा; बंगल्यातून सहा लाख अन् मीरगाव येथून पिस्तूल हस्तगत

Web Title: Did the chief minister order womens commission chairperson rupali chakankar to resign

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2026 | 08:00 PM

Topics:  

  • Ashok Kharat
  • CM Devedra Fadnavis
  • maharashtra news
  • rupali chakankar

संबंधित बातम्या

Satara News : गोडोलीत पालिकेचा हातोडा; रस्त्यावरील १५ फलक हटविले !
1

Satara News : गोडोलीत पालिकेचा हातोडा; रस्त्यावरील १५ फलक हटविले !

बारामतीत ‘बुलेट’ चोरट्यांचा धुमाकूळ, तीन बुलेट लंपास; CCTV फुटेज पोलिसांच्या हाती
2

बारामतीत ‘बुलेट’ चोरट्यांचा धुमाकूळ, तीन बुलेट लंपास; CCTV फुटेज पोलिसांच्या हाती

मोशी दुर्घटनेतील मृत कामगारांच्या कुटुंबीयांना 55 लाखांची मदत; नोकरी, मोफत शिक्षण अन्…
3

मोशी दुर्घटनेतील मृत कामगारांच्या कुटुंबीयांना 55 लाखांची मदत; नोकरी, मोफत शिक्षण अन्…

दारु नका बनवू, रोजगार करा! पुणे ग्रामीण पोलीस ‘त्या’ शंभर कुटुंबांना दाखवणार नवी वाट
4

दारु नका बनवू, रोजगार करा! पुणे ग्रामीण पोलीस ‘त्या’ शंभर कुटुंबांना दाखवणार नवी वाट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.