Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

डिझेल चोरणारी टोळी जेरबंद; १७ लाखांचा मुद्देमाल जप्त

जुन्नर व आंबेगाव तालुक्यात डिझेल चोरणाऱ्या टोळीस आळेफाटा पोलीसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून १७ लाख ५२ हजार ४११ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 16, 2024 | 12:56 PM
डिझेल चोरणारी टोळी जेरबंद; १७ लाखांचा मुद्देमाल जप्त
Follow Us
Follow Us:

पुणे : जुन्नर (Junnar) व आंबेगाव (Ambegaon) तालुक्यात डिझेल चोरणाऱ्या टोळीस आळेफाटा पोलीसांनी (Police) जेरबंद केले. त्यांच्याकडून १७ लाख ५२ हजार ४११ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी कुणाल रोहीदास बोंबले, ओमकार काळुराम देवकर, राहुल संजय हिंगे ( सर्व रा. राजगुरूनगर ता. खेड जि. पुणे), यांना ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे.

आळेफाटा पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळेफाटा पोलीस ठाण्यात रूपेश ज्ञानेश्वर वाळुंज (वय ३० व्यवसाय ट्रान्सपोर्ट रा. वडगांव आनंद) यांनी ८ एप्रिल रोजी फिर्याद दिली की, ३ एप्रिल रात्री १ वाजण्याच्या सुमारास आळेफाटा या ठिकाणी असलेल्या भोसले पेट्रोल पंपाच्या समोर स्वताच्या मालकीचा हायवाचे (ट्रक नं. एम.एच.४०, सीडी, ५०३८) अज्ञात चोरट्‌याने टाकीचे झाकण तोडुन टाकीमध्ये असणारे ६० लिटर डिझेल, तसेच योगेश मुरलीधर पाडेकर व सुदर्शन संजय जाधव यांचेसुध्दा बायपास ब्रीजचे जवळ लावलेल्या गाडयांमधुन डिझेल चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली होती.

त्यानुसार तपासादरम्यान दाखल गुन्ह्याचे विश्लेषण करीत असतांना गोपनिय बातमीदारामार्फत माहीती मिळाली की कुणाल रोहीदास बोंबले, ओमकार काळुराम देवकर, राहुल संजय हिंगे ( सर्व रा. राजगुरूनगर ता. खेड जि. पुणे) हे डिझेल चोरीचे गुन्हे करतात. त्यांनीच हा गुन्हा केल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी राजगुरूनगर (ता. खेड) येथे जाऊन संशयित आरोपींचा घेतला. त्यांच्याकडे कसुन चौकशी केली असता त्यांनी आळेफाटा येथे डिझेल संदर्भाने गुन्हा केला असल्याची कबुली दिली. त्यानंतर आरोपींना ताब्यात घेतले.

५७५ लिटर डिझेल जप्त

चौकशीदरम्यान, त्यांनी आळेफाटा पोलीस स्टेशनचे हद्दीत डिझेल चोरल्याचे कबुल केले. तसेच त्यांच्यावर मंचर व पारगाव कारखाना पोलीस स्टेशनमध्ये देखील गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडुन ५७५ लिटर डिझेल वाकळवाडी (ता. खेड) येथील रुममधुन जप्त केले. तसेच गुन्ह्यात वापरलेली इनोव्हा व इर्टीगा कार सुध्दा जप्त करण्यात आली आहे. तर ४ गुन्हे उाडकीस आले असून एकुण १७,५२,४११ रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक सुनिल बडगुजर, सहायक पोलीस उपनिरीक्षक चंद्रा डुंबरे, पोलीस हवालदार विनोद गायकवाड, पोलीस हवालदार भिमा लोंढे यांनी केली आहे.

Web Title: Diesel stealing gang jailed 17 lakhs worth seized nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2024 | 12:56 PM

Topics:  

  • Disel
  • maharashtra
  • Pune Crime
  • Rajgurunagar

संबंधित बातम्या

पिंपरी-चिंचवड नगरसेवकांसाठी ‘धन्वंतरी गोल्ड’ योजना लागू; मानधनातून दरमहा ‘इतके’ रुपये होणार कपात
1

पिंपरी-चिंचवड नगरसेवकांसाठी ‘धन्वंतरी गोल्ड’ योजना लागू; मानधनातून दरमहा ‘इतके’ रुपये होणार कपात

Devendra Fadnavis: ‘सामायिक मूल्ये, संस्कृती आणि संवादातून जग अधिक चांगले बनवूया’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2

Devendra Fadnavis: ‘सामायिक मूल्ये, संस्कृती आणि संवादातून जग अधिक चांगले बनवूया’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
3

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

School Girls Video: तेच विद्यार्थी, तोच खड्डेमय रस्ता! खांडपे-कोंदिवडे रस्त्यावर पुन्हा खड्डे, ‘राजकारण्यांची आश्वासने कुठे गेली?’
4

School Girls Video: तेच विद्यार्थी, तोच खड्डेमय रस्ता! खांडपे-कोंदिवडे रस्त्यावर पुन्हा खड्डे, ‘राजकारण्यांची आश्वासने कुठे गेली?’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.