
Digital and internet use by school student must be useful pune news
पुणे : सोनाजी गाढवे : डिजिटल युगाने जगण्याची संकल्पनाच बदलून टाकली आहे. टिव्ही, कॉम्प्युटर, लॅपटॉप, मोबाईल, रेडिओ यांसारखी साधने आज मानवी जीवनातील मूलभूत गरजांमध्ये गणली जातात. तंत्रज्ञानामुळे ज्ञानाचा महासागर सर्वांसाठी उघडला असला, तरी याच तंत्रज्ञानाचे दुष्परिणामही दिवसेंदिवस स्पष्ट होताना दिसत आहेत. डिजिटल तंत्रज्ञानचा ‘गुलाम’ बनू न देता, त्याचा ‘मालक’ बनण्यास शिकवणे हे गरजेचे आहे आसे मत शिक्षक अमोल हंकारे यांनी व्यक्त केले. डिजिटल तंत्रज्ञानाचा वाढता वापरामुळे शाळेतील विद्यार्थ्यांवर होणारे परिणाम त्यांनी अधोरेखित केले.
तंत्रज्ञान हे एका दुधारी शस्त्रासारखे आहे. ते चांगले की वाईट, हे पूर्णपणे आपण ते कसे वापरतो यावर ठरते. एकीकडे ते ज्ञानाचे भांडार उघडते, तर दुसरीकडे अतिवापरामुळे ते मुलांचे लक्ष विचलित करते आणि त्यांना मैदानी खेळांपासून दूर नेते. एक शिक्षक म्हणून, आजच्या युगात मुलांना तंत्रज्ञान ‘वापरण्यापासून’ रोखणे हा उपाय नाही, कारण तेच भविष्य आहे. त्याऐवजी, त्याचा ‘योग्य’, ‘सुरक्षित’ आणि ‘जबाबदार’ वापर कसा करायचा, याचे मार्गदर्शन करणे हीच आपली खरी जबाबदारी आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
टिव्ही, कॉम्प्युटर, लॅपटॉप, रेडिओ,मोबाईल ही महत्वाची डिजिटल साधने मनुष्याच्या मूलभूत गरजा बनल्या आहेत असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. या डिजिटल साधनाच्या मायाजाळातून बालकेही सुटलेली नाहीत. बालके तासनतास टिव्ही, मोबाईल मधून डोके वर काढत नाहीत. यामुळे बालकांना विविध आजार आणि समस्यांना सामोरे जावे लागत आहे. डिजिटल साधनांच्या अतिवापराने डोळ्यांचे आजार,चिडचिडेपणा, स्वमग्नता या समस्या भेडसावू लागल्या आहेत. यावर वेळीच उपाययोजना करणे काळाची गरज आहे.
शरीरावर होणारा परीणाम
डोळ्यांवर परिणाम, रेटिनावर परिणाम, नैराश्य, हायपरएक्टिव्हिटी डिसऑर्डर, एडीएसडी, ऑटिझम, झोपेचा अभाव, मुलांना झोप बरोबर येत नाही, मुल चिडचिड करायला लाग मनशिक संतुलन ठीक राहत नाही मुलांमध्ये असे आजार निर्माण होतात.
याबाबत शिक्षकअमोल हंकारे म्हणाले की, डिजिटल तंत्रज्ञान मुळे अभ्यास, मैदानी खेळ आणि स्क्रीन-टाईम यांच्यात ‘संतुलन’ साधणे, हेच आजच्या काळातील सर्वात मोठे आव्हान आहे. मुलांना तंत्रज्ञानाचे ‘गुलाम’ बनू न देता, त्याचा ‘मालक’ बनण्यास शिकवणे, हेच माझे ध्येय आहे. आणि आपल्या सगळ्यनचे असले पाहिजे. अशी भावना त्यांनी सांगितली.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
गोपाळकृष्ण प्राथमिक विद्यामंदिरातील उपक्रमशील व तंत्रस्नेही शिक्षक रणजित बोत्रे म्हणाले की, डिजिटल तंत्रज्ञानाची विविध साधने माहिती आदान प्रदानाची अत्यंत प्रभावी माध्यमे आहेत. परंतु कोणत्याही गोष्टीचा अतिरेक किंवा अतिवापर हा घातक असतो. म्हणूनच बालकांना डिजिटल साधनांचे फायदे तोटे समजणे आवश्यक आहे. याकरिता घरातून, शाळेतून प्रयत्न होणे आवश्यक आहे असे वाटते.असे मत त्यांनी सांगितले.