जालना जिल्हा वारकरी साहित्य संमेलन नोव्हेंबरमध्ये होणार असून संमेलनाध्यक्षपदी डॉ. सतीश बडवे यांची निवड करण्यात आली (फोटो - सोशल मीडिया)
Jalna News : छत्रपती संभाजीनगर : मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व विशाल बहुउद्देशीय प्रतिष्ठान, पैठण यांच्या वतीने शुक्रवार (२८), शनिवार (२९) नोव्हेंबर रोजी पैठण तालुक्यातील आपेगाव येथे पहिले जिल्हा वारकरी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी संत साहित्याचे ज्या अभ्यासक डॉ. सतीश बडवे यांची निवड करण्यात आली आहे. संत ज्ञानेश्वर महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या आपेगाव येथे येत्या २८ नोव्हेंबर रोजी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे संमेलनाचे उद्घाटन करणार आहेत. संमेलनाचे अध्यक्ष साहित्यिक डॉ. सतीश बडवे असून, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज कोलहापूरकर स्वागताध्यक्ष आणि प्रा. संतोष तांबे कार्यवाह आहेत. तहसीलदार ज्योती पवार व राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य डॉ. आशुतोष पटील यांच्या हस्ते ग्रंथवारकरी दिंडीचे उद्घाटन होईल.
बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय कुलारी, जयू भाटकर, डॉ. दादा गोरे उपस्थित राहण्णार आहेत. ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन कथाकार डॉ. भास्कर बड़े आणि शिक्षणाधिकारी अश्विनी लाटकर करणार आहेत. दुपारच्या सत्रात डॉ. राम रचनेकर यांच्या अध्यक्षतेखाली ‘प्राचीन व मध्ययुगीन साहित्यातील प्रतिज्ञान या परिसंवादात जयवंत पाटील, डॉ. हंसराज जाधव, डॉ. राधाकृष्ण अकोलकर सहभागी होतील, बारसा ज्ञान, विज्ञान आणि प्रबोधना’चा या परिचर्चेत ह.भ.प. विजय गवळी, ह.भ.प. नाना महाराज कदम, ह.भ.प. श्यामसुंदर महाराज सोन्नर आणि डॉ. दत्तात्रय हुंबरे सहभागी होतील.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
जिल्हाधिकारी स्वामी यांचीही राहणार उपस्थिती
डॉ. संजीवनी लडेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली सायंकाळी कविसंमेलन होणार आहे. पैठण तालुक्यातील भजनी मंडळासाठी रात्री भजन स्पर्धाही आयोजित करण्यात आली आहे. शनिवारी सकाळच्या सत्रात डॉ. सदानंद मोरे यांची मुलाखत गणेश मोहिते आणि संदीप जगदी घेणार आहेत. डॉ. विद्यासागर पाटांगणकर यांच्या अध्यक्षतेखाली ‘ज्ञानेश्वरीतील तत्वज्ञान आणि दृष्टिकोन’ या परिसंवादात डॉ. न. व. कदम, डॉ. सुभाष खेत्रे आणि डॉ. सीत्य गोविलकर सहभागी होणार आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
डॉ. सजेंगव जिगे यांच्या अध्यक्षतेखाली संत साहित्य विषयावरील परिसंवादात डॉ. शिरीष लांडगे, डॉ. दीपा क्षीरसागर, अपू भाटकर सहभागी होतील. समारोप समारंभाला जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, आमदार विलास भुमरे आणि पुष्कर गोसावी उपस्थित राहणार आहेत. या संमेलनाला रसिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करणयात आले आहे.






