Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोयना धरणातून विसर्ग पुर्णतः बंद; पाणीसाठ्याची निच्चांकी पातळीकडे वाटचाल

जून महिना संपत आला तरी कोयना धरण पाणलोट क्षेत्रात दमदार पावसाला सुरूवात झालेली नाही. त्यामुळे धरणातील पाणीसाठा निच्चांकी पातळीकडे चालला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 25, 2023 | 01:26 PM
कोयना धरणातून विसर्ग पुर्णतः बंद; पाणीसाठ्याची निच्चांकी पातळीकडे वाटचाल
Follow Us
Close
Follow Us:

सातारा : जून महिना संपत आला तरी कोयना धरण पाणलोट क्षेत्रात दमदार पावसाला सुरूवात झालेली नाही. त्यामुळे धरणातील पाणीसाठा निच्चांकी पातळीकडे चालला आहे. आजमितीला धरणातील पाणीसाठ्याची स्थिती गंभीर बनली आहे. यापुर्वी जून महिन्यात १९९६ मध्ये ६१८.३६३ मीटर आणि २०१९ मध्ये ६१८.४६५ मीटर इतकी कमालीची पाणी पातळी खालावली होती.

विसर्ग बंद, पाणी कपात सुरू 

कोयना धरणातून पुर्वेकडील सिंचन आणि पिण्याच्या पाण्यासाठी पायथा वीजगृहातून सुरू असलेला विसर्ग पुर्णतः बंद करण्यात आला आहे. त्यामुळे कराड, सांगली भागातील सिंचन आणि पिण्याच्या पाण्याची परिस्थिती गंभीर बनली आहे. कराड शहरात पंधरा मिनिटांची पाणी कपात करण्यात आली आहे. कोयनेतील वीजनिर्मितीचा प्रश्न गंभीर बनला आहे.

पाण्याचे अभूतपूर्व संकट 

पावसाने ओढ दिल्याने यंदा पाण्याचे अभूतपूर्व संकट उभे राहिले आहे. महाराष्ट्राची वरदायिनी असलेल्या कोयना धरणातील पाणी पातळी निच्चांकी पातळीकडे वाटचाल करीत आहे. मागील वर्षी याच दिवशी (दि. २४ जून) धरणातील पाणी पातळी ६२१.७९२ मीटर आणि पाणीसाठा १४.१६ टीएमसी होता. पायथा वीजगृहातून २१०० क्युसेक विसर्ग देखील सुरू होता.

कोयनेतील पाण्याच्या ऐतिहासिक नोंदी

पावसाअभावी यंदा कोयना धरणातील पाणीसाठा ऐतिहासिक पातळीकडे खालावत चालला आहे. यापुर्वी १९९६ मध्ये १८ जून रोजी धरणातील पाण्याची पातळी ६१८.३६३ मीटर आणि पाणीसाठा १०.६६ टीएमसी होता. २०१९ मध्ये २६ जून रोजी पाणी पातळी ६१८.४६५ मीटर आणि पाणीसाठा १०.७५ टीएमसी होता. मागील वर्षी देखील २४ जूनपर्यंत पाऊस नव्हता. परंतु, १४.१६ टीएमसी पाणी शिल्लक होते.

पाणी उपशावर बंदी

कोयना धरणातून पाणी सोडणे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे नदीपात्रातील उपसा सिंचन योजनांना पाणी उपसा बंदी करण्यात आली आहे. पिण्याच्या पाणी उपशावर अद्याप बंदी नाही. मात्र, नगरपालिकांनी पाणी कपात सुरू केली आहे. त्यामुळे पाण्याचे अभूतपूर्व संकट निर्माण झाले आहे.

Web Title: Discharge from koyna dam completely closed movement towards low level of water storage nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2023 | 01:24 PM

Topics:  

  • cmomaharashtra
  • Koyna Dam
  • maharashtra
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

बदलत्या हवामानामुळे आरोग्यावर टांगती तलवार; कधी कडाक्याचे ऊन, तर कधी थंडी
1

बदलत्या हवामानामुळे आरोग्यावर टांगती तलवार; कधी कडाक्याचे ऊन, तर कधी थंडी

Thane News: 35 वर्षीय जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळला, तीन जण जखमी; पालिकेने केली संपूर्ण इमारत रिकामी
2

Thane News: 35 वर्षीय जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळला, तीन जण जखमी; पालिकेने केली संपूर्ण इमारत रिकामी

पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे ॲक्शन मोडवर; सुरक्षा व्यवस्थेवरुन अधिकाऱ्यांना फटकारले
3

पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे ॲक्शन मोडवर; सुरक्षा व्यवस्थेवरुन अधिकाऱ्यांना फटकारले

Amravati News : बालविवाहमुक्तीसाठी ३८ हजार नागरिकांची शपथ, अमरावतीत विशेष मोहीम
4

Amravati News : बालविवाहमुक्तीसाठी ३८ हजार नागरिकांची शपथ, अमरावतीत विशेष मोहीम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.