Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: रोह्यात धोकादायक लोखंडी कॉईल वाहतूक सुरूच; नागरिकांच्या तक्रारीनंतरही कारवाई नाही

रोहा शहरात अवजड लोखंडी कॉईल वाहतुकीमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. तक्रारी असूनही वाहतूक सुरूच राहिल्याने स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 03, 2026 | 12:41 PM
Raigad News: रोह्यात धोकादायक लोखंडी कॉईल वाहतूक सुरूच; नागरिकांच्या तक्रारीनंतरही कारवाई नाही

Raigad News: रोह्यात धोकादायक लोखंडी कॉईल वाहतूक सुरूच; नागरिकांच्या तक्रारीनंतरही कारवाई नाही

Follow Us
Close
Follow Us:
  • रोहा रेल्वे यार्डमधून 24 टन वजनाच्या लोखंडी कॉईलची अवजड वाहतूक सुरू असून स्थानिक नागरिकांनी ती धोकादायक असल्याची तक्रार केली आहे.
  • नगराध्यक्षा आणि मुख्याधिकाऱ्यांनी पोलिसांकडे लेखी तक्रार करूनही वाहतुकीवर अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
  • कंपनीने दुसरीकडे CSR निधीतून ओपन जिम उभारल्यामुळे स्थानिकांमध्ये प्रश्न आणि नाराजी वाढली आहे.
रोहा रेल्वे स्टेशन यार्डमधून विळे येथील पास्को कंपनी येथे मातेश्वरी ट्रान्सपोर्टच्या ट्रेलरमधून अवजड, धोकादायक लोखंडी कॉईल वाहतूक गेल्या वर्षभरापासून करण्यात येते. याचा सर्व प्रकारचा धोका व त्रास रेल्वे स्टेशन लगतचा रोहिदास नगरमधील रहिवास्यांसह रोहे अष्टमीकारांना सहन करावा लागत आहे. असे असताना याच कंपन्याच्या सामाजिक दायित्व निधीतून वरसे ग्रामपंचायतमधील एकता नगर येथे तेथील नागरिकांच्या सुविधेसाठी ओपन जिम उभारण्यात आली आहे.

मुंबईत शिक्षकांच्या थकीत देयकांचा प्रश्न गंभीर; आमदार अभ्यंकरांनी मागितला तातडीचा अहवाल

या अवजड, धोकादायक, जीवघेण्या व वाहतूकीस अडथळा निर्माण करणाऱ्या समस्येची तक्रार रोहा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा वनश्री शेडगे यांच्याकडे रोहिदास नगरसह सर्वच रोहे अष्टमीकर नागरिकांनी करताच त्यांनी तातडीने या गंभीर समस्येकडे आपले लक्ष वेधले. आपल्या शहरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी त्यांनी व मुख्याधिकारी यांनी लेखी पत्र पोलीस उपविभागीय अधिकारी यांना देत यावर कारवाई करण्याची मागणी केली. मात्र आजवर या अवजड वाहतुकीवर कोणतेही निर्बंध न येता ती दिवसेंदिवस वाढत आहे.

नगराध्यक्षा यांच्या अर्जाची अशी दखल रात्री अपरात्री होणारी ही वाहतूक सर्वच प्रकरच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक ठरत आहे. मात्र असे असताना नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांच्या सामाजिक जाणीवेतून केलेल्या तक्रारी अर्जाचा फायदा वरसे ग्रामपंचायतला होत त्यांना ओपन जिम पास्को व सहयोगि कंपनीने आपल्या सामाजिक दायित्व निधीतून दिली असल्याचे दिसत आहे. आपल्या नागरिकांच्या सर्व प्रकारच्या सुरक्षेसाठी जागृत असणाऱ्या नगराध्यक्षा यांच्या अर्जाची अशी दखल पास्को कंपनीने कोणाच्या आदेशानुसार वा मागणीने घेतली? याचा खुलासा कंपनीने करावा, अशी मागणी रोहिदास नगर मधील स्थानिकांचे सह रोहेअष्टमीकर नागरिकांमधून होत आहे. पिंगळसई मधील धामणसई, सोनगाव, गावठाण, मालसई, मूठवली, गावठाण गावातील नागरिकांसह अष्टमीमधील नागरिकांना रुंद व सुरक्षित रस्ते या कंपन्यानी द्यावे त्यानंतरच ही अवजड व धोकादायक वाहतूक येथून करावी, अशी मागणी नागरिक करत आहे.

२४ टनच्या लोखंडी कॉईलची वाहतूक

रोहा रेल्वे स्थानकालगत जेएसडब्लू कंपनीचे स्वतंत्र रेल्वे यार्ड आहे. याठिकाणी सुरुवातीला लोखंडासाठी लागणारा कच्चा माल भुकटी, गोटी उतरून त्याची वाहतूक डोलवी, साळाव येथे करण्यात येत होती. रस्ते वाहतूक व नागरिकांचे आरोग्य यासाठी धोकादायक असणाऱ्या या वाहतूकीस वेळोवेळी स्थानिकांनी विरोध करत यावर योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली होती, या वाहतूकीस समीर शेडगे यांनी लोकभावानेतून नेहमीच विरोध करत तत्कालीन प्रांत, पोलीस अधिकारी यांच्या समोर ही समस्या मांडली, त्यानंतर आरोग्यासाठी हानिकारक वाहतूक आजवर पूर्णतः बंद झाली. आता याच यार्डातून २४ टन वजनाच्या लोखंडी कॉईलची वाहतूक येथून मोठ्या प्रमाणात सुरु आहे.

मनुष्यबळ कमतरतेमुळे डासजन्य आजारांमध्ये वाढ! मंजूर २,२०० पदांपैकी सुमारे ४० टक्के पदे रिक्त असल्याची माहिती

ओपन जीमचे नक्की गौडबंगाल काय आहे ?

एक ट्रेलर काही महिन्यापूर्वी येथील एका वळणावर पलटला होता. मात्र सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र रेल्वे स्टेशन ते अष्टमी पूल, बायपास रोड या दरम्यान या वाहतुकीमुळे अनेक अपघात होत जीवितहानी झाल्याच्या घटना घडू लागल्या. रोहा उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे मार्च महिन्यात अर्ज करत पास्को व मातेश्वरी ट्रान्सपोर्ट यांची वाहतूक तात्काळ बंद करावी, अशी मागणी केली होती. मात्र यावर कोणतीही कारवाई न होता वरसे ग्रामपंचायतीसाठी कंपनी ओपन जिम उपलब्ध करून दिली. यामध्ये नक्की गौडबंगाल काय आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचार्‍यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Heavy steel coil transport raises safety concerns in roha locals question lack of action raigad news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2026 | 12:13 PM

Topics:  

  • Marathi News
  • NAVARASHTRA
  • raigad

संबंधित बातम्या

Twisha Sharma Death मिस पुणे ते मृत्यूचं रहस्य! ट्विशा-दीपिका मृत्यूंचं गूढ अधिक गडद!
1

Twisha Sharma Death मिस पुणे ते मृत्यूचं रहस्य! ट्विशा-दीपिका मृत्यूंचं गूढ अधिक गडद!

Parbhani : परभणी-हिंगोली विधान परिषद जागा शिवसेनेचीच
2

Parbhani : परभणी-हिंगोली विधान परिषद जागा शिवसेनेचीच

Karjat News : ग्रामीण भागात सरकारी रुग्णवाहिकेची गैरसोय; विषबाधेमुळे रुग्णाला ॲम्बुलन्स मिळता मिळेना
3

Karjat News : ग्रामीण भागात सरकारी रुग्णवाहिकेची गैरसोय; विषबाधेमुळे रुग्णाला ॲम्बुलन्स मिळता मिळेना

LPG Shortage Report : देशात गॅस सिलेंडरचा पुन्हा तुटवडा? व्हायरल रिपोर्टवर केंद्र सरकारची नेमकी काय भूमिका?
4

LPG Shortage Report : देशात गॅस सिलेंडरचा पुन्हा तुटवडा? व्हायरल रिपोर्टवर केंद्र सरकारची नेमकी काय भूमिका?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.