Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कॉलनी फोरमचे पदाधिकारी ‘मातोश्री’वर, आदित्य ठाकरेंसोबत चर्चा

माजी नगरसेविका लीना गरड अध्यक्ष असलेल्या कॉलनी फोरम संस्थेने पनवेल पालिकेने आकारलेल्या मालमत्ता करा विरोधात सातत्याने भूमिका घेतली.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Apr 06, 2024 | 11:41 AM
कॉलनी फोरमचे पदाधिकारी ‘मातोश्री’वर, आदित्य ठाकरेंसोबत चर्चा
Follow Us
Close
Follow Us:

पनवेल : पालिका हद्दीतील दुहेरी मालमत्ता कराचा मुद्दा उचलून लढत असलेल्या कॉलनी फोरमच्या पदाधिकाऱ्यांनी काल “मातोश्री “वर युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. या वेळी फोरमच्या पदाधिकाऱ्यांनी आदित्य ठाकरे यांच्याशी मालमत्ता कर तसेच पालिका हद्दीतील विविध समस्या बाबत चर्चा केल्याचे समजते. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) रायगड जिल्हा ह्यांच्या वतीने, मावळ लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे ह्यांना पाठींबा देण्यासाठी कॉलनी फोरमकडे मागणी करण्यात आली होती. त्या अनुषंगाने ही भेट घेण्यात आली असल्याचे या वेळी सांगण्यात आले.

माजी नगरसेविका लीना गरड अध्यक्ष असलेल्या कॉलनी फोरम संस्थेने पनवेल पालिकेने आकारलेल्या मालमत्ता करा विरोधात सातत्याने भूमिका घेतली. पालिका हद्दीतील खारघर, कामोठे वसाहती सोबतच इतर वसाहती मध्ये कॉलनी फोरमच्या माध्यमातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते कार्यरत असून, महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना कॉलनी फोरमचा पाठिंबा मिळाल्यास महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पनवेल विधानसभा क्षेत्रात बळ मिळण्याची शक्यता आहे.

शुक्रवारी घडलेल्या भेटी दरम्यान शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, जिल्हाप्रमुख शिरीष घरत, बबन पाटील, कॉलनी फॉरमच्या अध्यक्ष लीना गरड तसेच त्यांचे सर्व सहकारी उपस्थित होते. तसेच शिवसेना उपनेते आमदार सचिन अहिर, शिवसेना विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर, तालुका संपर्कप्रमुख योगेश तांडेल आणि गणेश म्हात्रे देखील या वेळी उपस्थित होते. शुक्रवारी झालेल्या बैठकीनंतरच कॉलनी फोरमच्या वतीने योग्य निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती फोरमच्या वतीने देण्यात आली.

Web Title: Discussion with aditya thackeray on colony forum officer matoshree maharashtra government maharashtra political party panvel shivsena thackeray group

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2024 | 11:41 AM

Topics:  

  • Aditya Thackeray
  • maharashtra
  • Maharashtra Government
  • Shivsena Thackeray Group

संबंधित बातम्या

Maharashtra Government: “कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल…”; मंत्री आदिती तटकरेंची मागणी
1

Maharashtra Government: “कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल…”; मंत्री आदिती तटकरेंची मागणी

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय
2

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?
3

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर
4

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.