Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सातारा जिल्हा परिषदेत राडा; सत्ताधारी-विरोधक आमनेसामने, गोंधळात सभा गुंडाळली

विशेष सर्वसाधारण सभेत सुरुवातीला सर्व काही सुरळीत असल्याचा आभास होता. विविध समित्यांवर सदस्यांची निवड एकमताने जाहीर होताच ‘महायुती’तील समन्वयाचे चित्र रंगवले गेले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 18, 2026 | 09:05 AM
Satara News: झेडपीच्या रुग्णवाहिका वाहनांचा 'स्पेशल ऑडिट' होणार?

Satara News: झेडपीच्या रुग्णवाहिका वाहनांचा 'स्पेशल ऑडिट' होणार?

Follow Us
Follow Us:

सातारा : सातारा जिल्हा परिषदेत महायुतीतील एकीचा दावा प्रत्यक्षात किती पोकळ आहे, याचा प्रत्यय शुक्रवारी आलेल्या गोंधळातून आला. विषय समित्यांची निवड बिनविरोध पार पडूनही, सभागृहात मात्र सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने भिडले. अखेर वाढत्या वादाच्या पार्श्वभूमीवर सभा अचानक गुंडाळावी लागल्याने सत्ताधाऱ्यांची कोंडी झाल्याचे चित्र दिसले.

विशेष सर्वसाधारण सभेत सुरुवातीला सर्व काही सुरळीत असल्याचा आभास होता. विविध समित्यांवर सदस्यांची निवड एकमताने जाहीर होताच ‘महायुती’तील समन्वयाचे चित्र रंगवले गेले. मात्र, पुढील चर्चेतच हा समन्वय कागदोपत्रीच असल्याचे स्पष्ट झाले. चर्चेदरम्यान विरोधकांकडून पारदर्शकतेचा मुद्दा पुढे येताच वातावरण तापू लागले. काही सदस्यांनी अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेवर अप्रत्यक्ष प्रश्न उपस्थित करताच सत्ताधारी सदस्य आक्रमक झाले. “ठरलेल्या विषयापुरतेच बोला” असा इशारा देण्यात आला; मात्र त्यामुळे वाद शमण्याऐवजी अधिकच वाढला.

सभागृहात आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच काही सदस्यांमध्ये थेट शब्दिक चकमक झाली. विरोधकांनी आपला आवाज दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करताच घोषणाबाजीला सुरुवात झाली. यामुळे सभेचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात येताच अध्यक्षस्थानाकडून अचानक सभा समाप्ती जाहीर करण्यात आली. या निर्णयावर विरोधकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत ‘लोकशाही पद्धतीला धक्का’ असल्याचे सांगितले.

सभा संपल्यानंतर सत्ताधारी गट सभागृहाबाहेर पडला; मात्र विरोधकांनी जागा न सोडता तिथेच ठिय्या देत आपली भूमिका मांडली. “विरोधी मतांना संधीच दिली जात नाही,” असा आरोप करत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली.

राजकीय अर्थ; समन्वयाचा अभाव ठळक

या संपूर्ण प्रकारामुळे महायुतीतील अंतर्गत विसंवाद पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. वरकरणी एकमत दाखवले जात असले, तरी प्रत्यक्षात निर्णयप्रक्रियेत मतभेद कायम असल्याचे स्पष्ट झाले. जिल्हा परिषदेत पुढील काळात अशाच संघर्षमय बैठका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Satara Zilla Parishad : सातारा जिल्हा परिषद सभेकडे सर्वांच्याच नजरा; सभा शांततेत होणार की वादळी होणार?

Web Title: Dispute between the ruling and opposition parties in the satara zilla parishad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2026 | 08:36 AM

Topics:  

  • political news
  • Satara News
  • Satara Zilla Parishad

संबंधित बातम्या

सातारा एमआयडीसीच्या विकासाला वेग; उद्योगमंत्री सामंत यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली उच्चस्तरीय बैठक
1

सातारा एमआयडीसीच्या विकासाला वेग; उद्योगमंत्री सामंत यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली उच्चस्तरीय बैठक

मोठी बातमी ! ठाकरेंना सोडून गेलेल्या ‘त्या’ सहा खासदारांच्या अडचणींत होणार वाढ? सर्वोच्च न्यायालयातच धाव
2

मोठी बातमी ! ठाकरेंना सोडून गेलेल्या ‘त्या’ सहा खासदारांच्या अडचणींत होणार वाढ? सर्वोच्च न्यायालयातच धाव

Devendra Fadnavis Birthday: संघ स्वयंसेवक ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री; देवेंद्र फडणवीस यांनी कसा गाजवलाय आपला दबदबा?
3

Devendra Fadnavis Birthday: संघ स्वयंसेवक ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री; देवेंद्र फडणवीस यांनी कसा गाजवलाय आपला दबदबा?

केंद्रीयमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचं मोठं विधान; म्हणाले, ‘राहुल गांधी विद्यार्थ्यांचा घेत आहेत गैरफायदा, केवळ राग…’
4

केंद्रीयमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचं मोठं विधान; म्हणाले, ‘राहुल गांधी विद्यार्थ्यांचा घेत आहेत गैरफायदा, केवळ राग…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.