मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर शिवसेना आमदारांना भावनिक साद घालत पुन्हा माघारी येण्याचं आवाहन केल्यानंतर आता शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी मुंबईमधील शिवसेनेच्या नेत्यांची भूमिका दुटप्पी असल्याची टीका केली आहे. एकीकडे उद्धव ठाकरेंचे पुत्र आणि मुख्य प्रवक्ते शिवसैनिकांना वाटेल त्या शब्दांमध्ये बोलून अपमान करत आहेत. तर दुसरीकडे याच शिवसैनिकांना समेटाची हाक दिली जात आहे, याचा काय अर्थ घ्यायचा?, असा प्रश्न एकनाथ शिंदेंनी विचारला आहे.
शिवसेना पक्षप्रमुखांच्या भावनिक आवाहनाला शिंदे यांनी ट्विटरवरुन उत्तर देताना उद्धव ठाकरेंचे पुत्र म्हणजेच मंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेनेचे प्रवक्ते म्हणजेच संजय राऊत हे बंडखोर आमदारांविरोधात वादग्रस्त भाषा वापरत असल्याचा मुद्दा उपस्थित करत उद्धव ठाकरेंनाच सवाल केला