Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘व्यवस्था सुधारली तरच जनतेचा विश्वास वाढेल’; डॉ. नीलम गोऱ्हेंचे ‘महाराजस्व अभियान’वर मोठे विधान

साताऱ्यातील पत्रकार परिषदेत डॉ. नीलम गोऱ्हे यांनी 'महाराजस्व अभियान' हे नागरिकांची प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी महत्त्वाचे पाऊल असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी शेतकरी कर्जमाफी, विद्यार्थी आंदोलन आणि कायदा-सुव्यवस्थेवरही स्पष्ट भूमिका मांडली.

  • By विवेक
Updated On: Jul 26, 2026 | 09:13 PM
'व्यवस्था सुधारली तरच जनतेचा विश्वास वाढेल'; डॉ. नीलम गोऱ्हेंचे 'महाराजस्व अभियान'वर मोठे विधान

'व्यवस्था सुधारली तरच जनतेचा विश्वास वाढेल'; डॉ. नीलम गोऱ्हेंचे 'महाराजस्व अभियान'वर मोठे विधान

Follow Us
Follow Us:

सातारा / प्रतिनिधी : महसूल विभागाकडे वर्षानुवर्षे प्रलंबित असलेली सामान्य नागरिकांची कामे वेगाने मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेले ‘महाराजस्व अभियान’ हे लोकाभिमुख पाऊल असून, या अभियानातून प्रशासन अधिक गतिमान करण्याचा प्रयत्न आहे. मात्र, केवळ व्यक्तींना लक्ष्य करून प्रश्न सुटत नाहीत, तर व्यवस्था अधिक पारदर्शक आणि सक्षम करणे हीच काळाची गरज आहे, असे प्रतिपादन विधान परिषदेच्या माजी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले. त्यांनी विद्यार्थी आंदोलन, शेतकरी कर्जमाफी, कायदा-सुव्यवस्था आणि महसूल विभागाच्या विविध योजनांवरही सडेतोडपणे भूमिका मांडली.

साताऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, जिल्हाप्रमुख रणजितसिंह भोसले, प्रभारी रेश्मा जगताप, सुनीता मोरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

डॉ. निलम गोऱ्हे म्हणाल्या, राज्य सरकारने १८ फेब्रुवारी २०२६ रोजी काढलेल्या शासन निर्णयातून महसूल विभागाकडे प्रलंबित असलेल्या ३५ प्रकारच्या नागरिकांच्या कामांचा एकत्रित निपटारा करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मे महिन्यात या जीआरमध्ये सुधारणा करण्यात आली असून, विधान परिषदेतील काही आमदारांवर विविध जिल्ह्यांमध्ये ‘महाराजस्व अभियान’ प्रभावीपणे राबविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्याअंतर्गत सातारा जिल्ह्याच्या समन्वयाची जबाबदारी माझ्याकडे देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

माण-खटाव विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षपदी अभ्यासू युवा नेतृत्व महेश करचे यांची निवड

कराड, पाटण आणि वाई तालुक्यांमध्ये अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी २३ जुलै रोजी जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी आणि सर्व तहसीलदारांसोबत ऑनलाइन बैठक घेतल्याचे त्यांनी सांगितले. त्या बैठकीत अनेक सूचना करण्यात आल्या असून काही मुद्दे अंतिम जीआरमध्ये नसले तरी त्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासन सकारात्मक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज साताऱ्यात अभियानाला सुरुवात करण्यात आली.

या अभियानामध्ये पाणंद रस्त्यांचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा असून, शासन निर्णयात काही त्रुटी असल्याचेही त्यांनी नमूद केले. त्या दुरुस्त करण्याबाबत चर्चा सुरू असल्याचे सांगत त्यांनी महसूल विभागाच्या नव्या योजनेची माहिती दिली. बचत गटांमार्फत शेती करू इच्छिणाऱ्या महिलांना नाममात्र एक रुपया दराने शासकीय जमीन उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, त्यासाठी लवकरच प्रस्ताव मागविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शिवसेना पक्ष संघटनात्मकदृष्टया अधिक बळकट करण्यासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई, जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव आणि अन्य पदाधिकारी सातत्याने प्रयत्नशील असून, स्थानिक व वरिष्ठ नेतृत्वामध्ये चांगला समन्वय असल्याचेही त्यांनी नमूद केले.

शेतकरी कर्जमाफीबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, सरकारने कर्जमाफीची घोषणा करून लाभार्थ्यांची संख्या जाहीर केली असली तरी ती अपुरी आहे. अधिकाधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू असून पुढील काळात याबाबत पाठपुरावा केला जाणार आहे.

त्या म्हणाल्या, युवकांच्या अपेक्षांना न्याय देण्यासाठी सरकारने योग्य निर्णय घेणे गरजेचे आहे. एखादा प्रश्न गंभीर स्वरूप धारण केल्यानंतर मंत्र्यांचे राजीनामे घेणे, ही लोकशाहीतील संवेदनशील सरकारची ओळख असते. १९९५ ते २००० या काळातील युती सरकारचे उदाहरण देत त्यांनी सांगितले की, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी त्यावेळी समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनानंतर तीन मंत्र्यांचे राजीनामे घेतले होते. त्यामुळे राजीनामा म्हणजे संबंधित व्यक्ती दोषी ठरली असा अर्थ होत नाही, तर चौकशी निष्पक्षपणे व्हावी म्हणून ती प्रक्रिया असते.

सहकारामध्ये ग्रामीण भागाच्या विकासात पुणे जिल्हा बँकेचे मोठे योगदान : सुनेत्रा पवार

कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी सांगितले की, आज अनेक गुन्ह्यांमध्ये साक्षीदारांवर दबाव येत असल्याने आरोपी पुराव्याअभावी सुटतात. गुन्हेगारांना शंभर टक्के शिक्षा झाली तरच समाजात कायद्याचा धाक निर्माण होईल. त्यासाठी तपास यंत्रणा, न्यायव्यवस्था आणि समाज या तिन्ही घटकांनी पीडितांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

जंतर-मंतर आंदोलनातील विद्यार्थ्यांवर दाखल होणाऱ्या गुन्ह्यांबाबत विचारले असता त्या म्हणाल्या, अशा आंदोलनांतील गुन्हे अनेकदा सरकारकडून मागे घेतले जातात. या आंदोलनात सहभागी झालेले विद्यार्थी देशद्रोही नसून लोकशाही पद्धतीने आंदोलन करणारे नागरिक आहेत. त्यामुळे केंद्र सरकार सकारात्मक निर्णय घेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दिल्लीच्या आंदोलनाकडे सरकारने संवेदनशीलतेने पहावे

दिल्लीतील जंतर-मंतरवरील विद्यार्थी आंदोलनाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, ‘मी स्वत: विद्यार्थी चळवळीतून घडलेली कार्यकर्ती आहे. प्रत्येक दशकानंतर नवीन पिढी नवीन अपेक्षा घेऊन पुढे येते. त्या अपेक्षांकडे सरकारने संवेदनशीलतेने पाहणे आवश्यक असते.’

Web Title: Dr neelam gorhe on maharajasva abhiyan satara

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2026 | 09:13 PM

Topics:  

  • Dr. Nilam Gorhe
  • Satara
  • Satara News

संबंधित बातम्या

Satara News : ‘वाघ्या घेवड्याचा पीकविम्यात समावेश करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविणार,’ जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आश्वासन
1

Satara News : ‘वाघ्या घेवड्याचा पीकविम्यात समावेश करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविणार,’ जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आश्वासन

पेडगावच्या शेतकरी भगिनींच्या जिद्दीला सलाम! भांडवल उभारण्यासाठी बैलगाडी शर्यतीत स्टॉल; जिद्द पाहून अधिकारीही प्रभावित
2

पेडगावच्या शेतकरी भगिनींच्या जिद्दीला सलाम! भांडवल उभारण्यासाठी बैलगाडी शर्यतीत स्टॉल; जिद्द पाहून अधिकारीही प्रभावित

Shivendrasinhraje Bhosale: उंब्रज विश्रामगृह भूमिपूजनात शिवेंद्रसिंहराजेंची टोलेबाजी! कराड उत्तरच्या राजकारणावर सूचक भाष्य
3

Shivendrasinhraje Bhosale: उंब्रज विश्रामगृह भूमिपूजनात शिवेंद्रसिंहराजेंची टोलेबाजी! कराड उत्तरच्या राजकारणावर सूचक भाष्य

Satara News: ‘तपासणी करा, नाहीतर कायद्याच्या कचाट्यात’; ग्रामपंचायतींच्या कारभारावर जनहक्क समितीची नजर
4

Satara News: ‘तपासणी करा, नाहीतर कायद्याच्या कचाट्यात’; ग्रामपंचायतींच्या कारभारावर जनहक्क समितीची नजर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.