Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navbharat Healthcare Conclave 2026: ‘नवभारत हेल्थकेअर कॉन्क्लेव्ह २०२६’ मध्ये डॉ. पूजा शिंदे-कदम यांना ‘नवभारत आरोग्य पुरस्कार’

नवभारत हेल्थकेअर कॉन्क्लेव्ह २०२६ मध्ये उंब्रज येथील विघ्नहर्ता क्लिनिकच्या कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. पूजा शिंदे-कदम यांना 'नवभारत आरोग्य पुरस्कार' प्रदान करण्यात आला. उत्कृष्ट आरोग्यसेवा, समाजसेवा आणि रुग्णांप्रती असलेल्या संवेदनशील कार्याची दखल घेत हा राज्यस्तरीय सन्मान देण्यात आला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 30, 2026 | 01:54 PM
'नवभारत हेल्थकेअर कॉन्क्लेव्ह २०२६' मध्ये डॉ. पूजा शिंदे-कदम यांना 'नवभारत आरोग्य पुरस्कार'

'नवभारत हेल्थकेअर कॉन्क्लेव्ह २०२६' मध्ये डॉ. पूजा शिंदे-कदम यांना 'नवभारत आरोग्य पुरस्कार'

Follow Us
Follow Us:
  • उंब्रजच्या डॉ. पूजा शिंदे-कदम यांच्या आरोग्यसेवेचा राज्यस्तरीय गौरव
  • उल्लेखनीय सेवेसाठी ‘नवभारत आरोग्य पुरस्कार’
  • समाजसेवा आणि रुग्णांप्रती असलेल्या संवेदनशील कार्याचा राज्यस्तरीय सन्मान
उंब्रज: उंब्रज येथील विघ्नहर्ता क्लिनिकच्या डॉ. पूजा सुनील शिंदे-कदम (BAMS, MS, ENT) यांना आरोग्य क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य, रुग्णसेवा, वैद्यकीय कौशल्य आणि समाजाप्रती असलेल्या निस्वार्थ योगदानाची दखल घेत ‘नवभारत हेल्थकेअर कॉन्क्लेव्ह २०२६’ अंतर्गत प्रतिष्ठेचा ‘नवभारत आरोग्य पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. मुंबई येथील हॉटेल ताज प्रेसिडेन्सी, कुलाबा येथे २९ जुलै २०२६ रोजी झालेल्या राज्यस्तरीय समारंभात हा सन्मान प्रदान करण्यात आला असून, आरोग्यसेवेतील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याचे नवभारत समूहाच्या निमंत्रण पत्रात नमूद आहे.

डॉ. पूजा शिंदे-कदम यांनी २०१८ मध्ये बीएएमएस पदवी संपादन केली. २०१९ मध्ये कोल्हापूर महापुराच्या काळात त्यांनी वैद्यकीय मदत शिबिरांमध्ये सहभागी होत पूरग्रस्तांना आरोग्यसेवा दिली. २०२१ मध्ये मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) कोविड लसीकरण केंद्रात त्यांनी महत्त्वपूर्ण सेवा बजावत नागरिकांच्या आरोग्य रक्षणासाठी मोलाचे योगदान दिले. विविध स्वयंसेवी संस्थांसोबत अनेक मोफत वैद्यकीय शिबिरांमध्ये सहभाग घेऊन त्यांनी समाजसेवेची परंपरा सातत्याने जपली.

Navbharat Healthcare Summit: आरोग्य क्षेत्रात क्रांतिकारक बदल – शायना N.C, अभिनेत्री हरनाझ कौरची विशेष उपस्थिती

२०२२ ते २०२५ या कालावधीत त्यांनी कान-नाक-घसा (ENT) विषयातील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. एप्रिल २०२५ मध्ये एमएस (ENT) पदवी प्राप्त केल्यानंतर ऑगस्ट २०२५ मध्ये उंब्रज येथे ‘विघ्नहर्ता क्लिनिक’ सुरू करून ग्रामीण भागातील रुग्णांना अत्याधुनिक व दर्जेदार ईएनटी उपचार उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली. गणेशोत्सवाच्या काळात तीन मोफत ईएनटी तपासणी शिबिरे, १ जानेवारी २०२६ रोजी विशेष मोफत तपासणी शिबिर तसेच मार्च २०२६ मध्ये आणखी एक शिबिर आयोजित करून त्यांनी शेकडो रुग्णांना उपचाराचा लाभ मिळवून दिला.

डॉ. पूजा शिंदे-कदम यांच्या वैद्यकीय कारकिर्दीतील सर्वात हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी घटनांपैकी एक म्हणजे कानाने ऐकू न येणाऱ्या एका चिमुकल्या मुलाला नवजीवन देण्याची घटना. जन्मजात श्रवणदोषामुळे त्रस्त असलेल्या त्या मुलाच्या उपचारासाठी सुमारे ३० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित होता. मुलाच्या पालकांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने हा खर्च त्यांच्या आवाक्याबाहेर होता. त्यांनी शेवटचा पर्याय म्हणून डॉ. पूजा शिंदे-कदम यांची भेट घेऊन मदतीची विनंती केली.

रुग्णाच्या परिस्थितीची जाणीव ठेवत डॉ. कदम यांनी स्वतः पुढाकार घेत एका स्वयंसेवी संस्थेशी समन्वय साधला. त्यांच्या प्रयत्नांमुळे त्या मुलावर अत्यल्प खर्चात शस्त्रक्रिया होऊ शकली आणि उपचारानंतर त्या मुलाला व्यवस्थित ऐकू येऊ लागले. या यशस्वी उपचारामुळे त्या मुलाच्या आई-वडिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. या अनुभवाविषयी बोलताना डॉ. पूजा शिंदे-कदम म्हणाल्या, “माझ्या वैद्यकीय कारकिर्दीतील हा सर्वात मोठा आणि समाधान देणारा क्षण आहे. एका सामान्य कुटुंबातील आई-वडिलांना आपल्या मुलाला पुन्हा ऐकू येऊ लागल्याचा जो आनंद झाला, तो शब्दांत व्यक्त करणे अशक्य आहे. डॉक्टर म्हणून यापेक्षा मोठा पुरस्कार दुसरा असू शकत नाही.” रुग्णांच्या गोपनीयतेच्या वैद्यकीय नियमांचे पालन करत संबंधित मुलाचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही.

९२ वर्षांची परंपरा असलेल्या ‘नवभारत समूहा’ तर्फे आयोजित ‘नवभारत हेल्थकेअर कॉन्क्लेव्ह २०२६’ हा महाराष्ट्रातील आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉक्टर, रुग्णालये, आरोग्य संस्था आणि समाजसेवकांचा गौरव करणारा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय उपक्रम आहे. या व्यासपीठावर डॉ. पूजा शिंदे-कदम यांच्या कार्याचा गौरव झाल्याने उंब्रज, कराड आणि सातारा जिल्ह्याच्या वैद्यकीय क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. या पुरस्काराबद्दल विविध सामाजिक संस्था, वैद्यकीय क्षेत्रातील सहकारी, रुग्ण आणि नागरिकांनी डॉ. पूजा शिंदे-कदम यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील सामाजिक व वैद्यकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Navbharat Healthcare Summit: ‘माझे गाव आरोग्य संपन्न’ प्रत्येक गावाला निरोगी बनवेल – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

Web Title: Dr pooja shinde kadam honoured with navbharat health award 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2026 | 01:54 PM

Topics:  

  • Health News
  • maharashtra
  • Navbharat Conclave

संबंधित बातम्या

ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी शकुंतला नगरकर यांचं निधन; 50 वर्षांहून अधिक काळ लावणी गाजवल्यानंतर घेतला अखेरचा श्वास
1

ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी शकुंतला नगरकर यांचं निधन; 50 वर्षांहून अधिक काळ लावणी गाजवल्यानंतर घेतला अखेरचा श्वास

Gondiya News: बाळापाठोपाठ मातेचाही मृत्यू! गंगाबाई रुग्णालयातील घटना; डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप!
2

Gondiya News: बाळापाठोपाठ मातेचाही मृत्यू! गंगाबाई रुग्णालयातील घटना; डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप!

Pratap Sarnaik: रस्ते अपघात रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचे निर्देश
3

Pratap Sarnaik: रस्ते अपघात रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचे निर्देश

Fire Fighter System: राष्ट्रीय महामार्गांवर स्वतंत्र ‘फायर फायटर’ यंत्रणा हवी; टोलसोबत सुरक्षेची जबाबदारीही महत्त्वाची
4

Fire Fighter System: राष्ट्रीय महामार्गांवर स्वतंत्र ‘फायर फायटर’ यंत्रणा हवी; टोलसोबत सुरक्षेची जबाबदारीही महत्त्वाची

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.