Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

डॉ. श्रीकांत शिंदे यांना या वर्षीचा संसद रत्न पुरस्कार केला प्रदान

केंद्रीय मंत्री, निवडणूक आयोगाचे माजी सहसंचालक आदी या पुरस्कारासाठी नावांची शिफारस करतात. हा एक प्रकारचा नागरिक सन्मान समजला जातो.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Feb 18, 2024 | 01:10 PM
डॉ. श्रीकांत शिंदे यांना या वर्षीचा संसद रत्न पुरस्कार केला प्रदान
Follow Us
Close
Follow Us:

महाराष्ट्रातील कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांना यंदाचा संसद रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. दिल्ली येथील महाराष्ट्र सदन येथे हा पुरस्कार सोहळा पार पडला. लोकसभेतील कामगिरीवरून संसद रत्न पुरस्कार देण्यात येतो. कल्याण लोकसभा मतदारसंघांमध्ये विकासाचा वेगळा पॅटर्न राबवणारे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे लोकसभेतही सर्वच कामकाजात सहभाग घेत असतात. त्यांच्या याच कामगिरीवरून यंदाचा पुरस्कार डॉ. शिंदे यांना जाहीर करण्यात आला आहे. तर हा संसद रत्न पुरस्कार मिळणे अत्यंत आनंदाची बाब असून मिळालेला पुरस्कार माझ्या मतदारसंघातील जनतेला समर्पित करत असल्याच्या भावना यावेळी डॉ. शिंदे यांनी व्यक्त केल्या आहेत.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे १७ व्या लोकसभेतील सर्वोत्कृष्ट कामगिरी असलेल्या पाच सदस्यांपैकी एक ठरले आहेत. २०१९ ते २०२३ या कार्यकाळात डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ५५६ प्रश्न उपस्थित केले आहेत. ६७ चर्चांमध्ये त्यांनी सहभाग घेतला आहे आणि १२ खासगी विधेयके त्यांनी मांडली आहेत. १९९९ या वर्षात स्थापन झालेल्या प्राईम पॉइंट फाउंडेशन या एनजीओला डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी संसद रत्न पुरस्काराबाबत सूचना केल्या होत्या. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या सूचनेनुसार, २०१० पासून लोकसभेतील आणि राज्यसभेतील सदस्यांना त्यांच्या उत्तम कामगिरीबद्दल संसद रत्न पुरस्कार देण्यात येतो. दरवर्षी संसद रत्न पुरस्कार प्रदान केला जातो. तर संसद महारत्न पुरस्कार दर पाच वर्षातून एकदा दिला जातो. केंद्रीय मंत्री, निवडणूक आयोगाचे माजी सहसंचालक आदी या पुरस्कारासाठी नावांची शिफारस करतात. हा एक प्रकारचा नागरिक सन्मान समजला जातो.

लोकसभा आणि राज्यसभा यातील कामकाजामध्ये घेतलेला सहभाग, उपस्थित केलेले प्रश्न, मांडलेले प्रस्ताव, संसदेतील उपस्थिती आणि एकूण कामगिरीबद्दल हे पुरस्कार दिले जातात, यंदाचा हा पुरस्कार कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांना जाहीर झाला होता. आज, शनिवारी, मान्यवरांच्या मुख्य उपस्थितीत दिल्ली येथील महाराष्ट्र सदन येथे हा पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना संसद रत्न तर शिवसेनेचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांना संसद उत्कृष्ट महारत्न पुरस्कार पुरस्काराने गौरविण्यात आले. लोकसभेतील कामकाजात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे नियमितपणे सहभागी होत असतात.

आतापर्यंत अनेक महत्त्वाच्या आणि सर्वसामान्यांच्या दृष्टीने गरजेच्या मुद्द्यांवर डॉ. शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघातही पायाभूत सुविधा उभारण्यापासून सर्वच टप्प्यांवर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची कामगिरी उल्लेखनीय राहिली आहे. त्यांच्या याच कामगिरीची दखल घेऊन त्यांना यापूर्वी अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. २०१४च्या लोकसभेत निवडून आलेले डॉ. श्रीकांत शिंदे हे तरुण खासदारांपैकी एक खासदार होते. २०१९ च्या निवडणुकीतही डॉ. श्रीकांत शिंदे मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ते सुपुत्र आहेत. संसद रत्न पुरस्कार मिळाल्यामुळे डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कामगिरीच्या शिरपेच्यात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे.

लोकसभेत केलेल्या चांगल्या कामगिरीबद्दल मला संसदरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून याबाबत आनंद आहे. या गौरवामुळे अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळते. माझ्या कल्याण लोकसभा मतदारसंघातील नागरिकांनी मला २०१४ आणि २०१९ साली मोठ्या मताधिक्याने निवडून दिले. यामुळेच आज मी त्यांचे प्रश्न संसदेत सादर करू शकलो. यामुळे मला मिळालेला हा आजचा पुरस्कार मी माझ्या मतदारसंघातील नागरिकांना समर्पित करतो. तसेच सर्व नागरिकांचे आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचे देखील मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो.

Web Title: Dr shrikant shinde was awarded this years parliament ratna award kalyan lok sabha constituency in maharashtra maharashtra government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2024 | 01:10 PM

Topics:  

  • Dr Shrikant shinde
  • maharashtra
  • Maharashtra Government
  • thane

संबंधित बातम्या

महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकॉनमीच्या मार्गावर;  पॉवर-पॅक MH 1st Conclave 2025 साठी मंच सज्ज
1

महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकॉनमीच्या मार्गावर; पॉवर-पॅक MH 1st Conclave 2025 साठी मंच सज्ज

Devendra Fadnavis: “शासकीय सेवेच्या माध्यमातून…”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आवाहन
2

Devendra Fadnavis: “शासकीय सेवेच्या माध्यमातून…”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आवाहन

Devendra Fadnavis: “विकसित महाराष्ट्र २०४७ चे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी…”; काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?
3

Devendra Fadnavis: “विकसित महाराष्ट्र २०४७ चे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी…”; काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?

मोठी बातमी! मराठा आंदोलनाआधी सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; OBC समाजामध्ये 29 जातींचा समावेश होणार?
4

मोठी बातमी! मराठा आंदोलनाआधी सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; OBC समाजामध्ये 29 जातींचा समावेश होणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.