Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Drought 2026: धाराशिवला दुष्काळाचा विळखा! आठही तालुक्यांचा Trigger-1 मध्ये समावेश, शेतकऱ्यांना मोठ्या मदतीची अपेक्षा

Maharashtra Drought 2026: खरीप हंगाम 2026 मध्ये Trigger-1 (प्रथम कळ) लागू झालेल्या राज्यातील 265 तालुक्यांत दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव, कळंब, भूम, वाशी, तुळजापूर, लोहारा, परंडा आणि उमरगा या आठही तालुक्यांचा समावेश आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 26, 2026 | 04:02 PM
धाराशिवला दुष्काळाचा विळखा! आठही तालुक्यांचा Trigger-1 मध्ये समावेश, शेतकऱ्यांना मोठ्या मदतीची अपेक्षा

धाराशिवला दुष्काळाचा विळखा! आठही तालुक्यांचा Trigger-1 मध्ये समावेश, शेतकऱ्यांना मोठ्या मदतीची अपेक्षा

Follow Us
Follow Us:
  • धाराशिव जिल्ह्यातील आठही तालुक्यांत दुष्काळ जाहीर
  • शेतकऱ्यांना मोठ्या मदतीची अपेक्षा
  • धाराशिव, तुळजापूर ते उमरगापर्यंत दुष्काळ जाहीर
  • धाराशिव जिल्ह्यातील आठही तालुक्यांत दुष्काळ जाहीर
धाराशिव : महाराष्ट्रात अनियमित पावसामुळे शेतकऱ्यांच्या समस्या अधिकच गंभीर झाल्या असताना, राज्य सरकारने महत्त्वपूर्ण दिलासा दिला आहे. दुष्काळग्रस्त भागांना भेट दिल्यानंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभरातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. २६५ तालुक्यांमध्ये राज्य सरकारने ‘ट्रिगर १’ लागू केला आहे, तिथे दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. एकूण, महाराष्ट्रातील ३५८ पैकी २६५ तालुके दुष्काळाचा सामना करत आहेत, म्हणजेच राज्याचा ७५% भाग दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आला आहे. सरकारने दुष्काळातून दिलासा देण्यासाठी अनेक उपाययोजना जाहीर केल्या आहेत.

शेतकऱ्यांसाठी सुनेत्रा पवारांची मोठी ग्वाही; ‘वाऱ्यावर सोडणार नाही’, नांदेडमध्ये नेमकं काय म्हणाल्या?

धाराशिवला दुष्काळाचा विळखा

खरीप हंगाम २०२६ मध्ये ट्रिगर-१ Trigger-1 (प्रथम कळ) लागू झालेल्या राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव, कळंब, भूम, वाशी, तुळजापूर, लोहारा, परंडा आणि उमरगा या आठही तालुक्यांचा समावेश आहे.

शासनाच्या २५ सप्टेंबरच्या निर्णयानुसार संबंधित तालुक्यांत तातडीने पीक पंचनामे सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन, शेती कर्जवसुलीस स्थगिती, कृषी पंपांच्या वीजबिलात सूट, परीक्षा शुल्क माफी, रोजगार हमीची कामे वाढविणे, टँकरद्वारे पाणीपुरवठा, चारा उपलब्ध करून देणे आणि जलसंधारणाची कामे सुरू करण्यासह विविध सवलती लागू करण्यात आल्या आहेत. पीक नुकसानीची आर्थिक मदत मात्र स्वतंत्र शासन निर्णयाद्वारे जाहीर केली जाणार आहे.

जमीन महसूल माफी, पीक कर्जाची पुनर्रचना,कृषी कर्जाच्या वसुलीवर स्थगिती

कृषी पंपांच्या सध्याच्या वीज बिलांवर माफी (७.५ एचपी क्षमतेच्या विद्युत पंपांची बिले यापूर्वीच माफ करण्यात आली आहेत; आता त्या मर्यादेपेक्षा जास्त क्षमतेच्या पंपांसाठीही माफी दिली जाईल).

शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी परीक्षा शुल्कात सूट.

गरजेनुसार भागांमध्ये पिण्याच्या पाण्याचे टँकर पाठवले जातील.

ज्या गावांमध्ये पाणीटंचाई जाहीर झाली आहे, तेथील शेतकऱ्यांच्या शेती पंपांचे वीज कनेक्शन तोडले जाणार नाही.

शेतकरी आणि शेतीवर अवलंबून असलेल्या शेतमजुरांना धान्य पुरवले जाईल.

जनावरांसाठी चाऱ्याची व्यवस्था केली जाईल.

मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे हाती घेतली जातील.

पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या पाणीपुरवठा योजना पूर्वीच्या आदेशानुसार सुरू राहतील.

सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पंचनामा प्रक्रिया तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पिकांची स्थिती दर्शवणारे फोटो आणि जीपीएस डेटा गोळा करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी दोन दिवस दुष्काळग्रस्त भागांची पाहणी केली.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांचा दोन दिवस दौरा आणि पाहणी केली. यादरम्यान, मुख्यमंत्र्यांनी अनेक शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि सरकार त्यांच्या हिताचा आणि गरजांचा विचार करून निर्णय घेईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर त्यांनी दुष्काळासंबंधी आदेश जारी करून शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत आपले आश्वासन पूर्ण केले.

एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये; पालकमंत्री मकरंद पाटील यांचे निर्देश; चिखली-सिंदखेडराजा तालुक्यातील गावांना भेट

Web Title: Drought declared in all eight talukas of dharashiv district trigger 1 kharif 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2026 | 04:02 PM

Topics:  

  • Dharashiv
  • drought news
  • Tuljapur

संबंधित बातम्या

maharashtra drought : ही चक्क शेतकऱ्यांची फसवणूक; दुष्काळाच्या घोषणेतील त्रुटींवर विजय वडेट्टीवार संतापले
1

maharashtra drought : ही चक्क शेतकऱ्यांची फसवणूक; दुष्काळाच्या घोषणेतील त्रुटींवर विजय वडेट्टीवार संतापले

शेतकऱ्यांसाठी सुनेत्रा पवारांची मोठी ग्वाही; ‘वाऱ्यावर सोडणार नाही’, नांदेडमध्ये नेमकं काय म्हणाल्या?
2

शेतकऱ्यांसाठी सुनेत्रा पवारांची मोठी ग्वाही; ‘वाऱ्यावर सोडणार नाही’, नांदेडमध्ये नेमकं काय म्हणाल्या?

Maharashtra Drought 2026: ‘शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू, तरी कोकण मदतीपासून वंचित का?’ भास्कर जाधवांची सरकारकडे मागणी
3

Maharashtra Drought 2026: ‘शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू, तरी कोकण मदतीपासून वंचित का?’ भास्कर जाधवांची सरकारकडे मागणी

Maharashtra Drought-Affected Takula List:  राज्य सरकारकडून दुष्काळग्रस्त तालुक्यांची यादी  वाचा एका क्लिकवर
4

Maharashtra Drought-Affected Takula List:  राज्य सरकारकडून दुष्काळग्रस्त तालुक्यांची यादी  वाचा एका क्लिकवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.