Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Drought 2026: ‘शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू, तरी कोकण मदतीपासून वंचित का?’ भास्कर जाधवांची सरकारकडे मागणी

Maharashtra Drought 2026: महाराष्ट्रातील पावसाच्या अपुऱ्या प्रमाणामुळे आणि अनियमिततेमुळे निर्माण झालेल्या दुष्काळाची झळ शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण भागाला तीव्रतेने बसत आहे. या दुष्काळाची झळ आता कोकणालाही बसत असून, शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यासंदर्भात भास्कर जाधव यांनी सरकारकडे महत्त्वाची मागणी केली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 26, 2026 | 03:15 PM
‘शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू, तरी कोकण मदतीपासून वंचित का?’ भास्कर जाधवांची सरकारकडे मागणी (फोटो सौजन्य-एएनआय) (फोटो सौजन्य-ChatGPT)

‘शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू, तरी कोकण मदतीपासून वंचित का?’ भास्कर जाधवांची सरकारकडे मागणी (फोटो सौजन्य-एएनआय) (फोटो सौजन्य-ChatGPT)

Follow Us
Follow Us:
  • भात-नाचणी पिकांना मोठा फटका
  • दुष्काळाच्या निर्णयात कोकणाचा विचार का नाही?
  • भास्कर जाधवांचा प्रश्न
Maharashtra Drought 2026: राज्यातील परिस्थिती पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच 265 तालुक्या दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. राज्यातील 358 पैकी 265 तालुक्यात दुष्काळ याचा अर्थ 75 टक्के महाराष्ट्रात जाहीर करण्यात आला आहे. याचदरम्यान आता राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कोकणातील शेतकऱ्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते तथा आमदार भास्कर जाधव यांनी कोकणातील शेतीच्या नुकसानीकडे राज्य सरकारचे लक्ष वेधत शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी केली आहे. अनियमित पावसामुळे कोकणातील भात आणि नाचणी पिकांवर मोठा परिणाम झाल्याचे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

दुष्काळाची झळ आता कोकणालाही बसत असून, शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू असताना दुष्काळाच्या निर्णयात कोकणाचा अपेक्षित विचार का करण्यात आला नाही, असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते तथा आमदार भास्कर जाधव यांनी उपस्थित केला आहे.

दुष्काळ जाहीर करुन सरकारने केलं शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम : संजय शिरसाट

‘कोकणालाही मदतीचा हात द्या’

कोकणात यंदा पावसाच्या अनियमिततेचा आणि प्रतिकूल हवामानाचा मोठा फटका शेतीला बसला आहे. भातासह विविध पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थितीत शासनाने दुष्काळग्रस्त भाग निश्चित करताना कोकणातील परिस्थितीचाही गांभीर्याने विचार करून शेतकऱ्यांना मदतीचा हात देणे आवश्यक असल्याचे आमदार जाधव यांनी म्हटले आहे.“कोकणाला दुष्काळाची झळ बसत असताना मदतीपासून कोकण वंचित का? शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत, पिकांचे नुकसान झाले आहे. तरीही दुष्काळाच्या निर्णयात कोकणाचा अपेक्षित विचार का झाला नाही?” असा सवाल त्यांनी केला. कोकणातील शेतकऱ्यांच्या अडचणींकडे दुर्लक्ष करून त्यांना दुय्यम वागणूक दिली जात असल्याची भावना निर्माण होत आहे. त्यामुळे शासनाने कोकणातील प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत आणि आवश्यक सवलती जाहीर कराव्यात, अशी मागणी आमदार भास्कर जाधव यांनी केली आहे.

कोकणातील शेतकरीही प्रतिकूल हवामानाचा सामना करत असताना सरकारने प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेऊन नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत आणि नुकसानभरपाई द्यावी, अशी जाधव यांची मागणी आहे. त्यांनी यापूर्वीही कोकणातील भातशेती व फळबागांच्या नुकसानीबाबत सरकारकडे मदतीची मागणी केली होती. मार्च 2026 मध्ये सरकारने आंबा-काजू उत्पादकांसाठी हेक्टरी 22 हजार रुपयांच्या मदतीची घोषणा केल्यानंतरही जाधव यांनी मदतीच्या प्रमाणावर टीका केली होती.

Breaking News: मोठी बातमी! अखेर राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय

Web Title: Bhaskar jadhav questions maharashtra government over drought relief for konkan farmers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2026 | 03:15 PM

Topics:  

  • Bhaskar Jadhav
  • Konkan
  • maharashtra

संबंधित बातम्या

Maharashtra Drought 2026: धाराशिवला दुष्काळाचा विळखा! आठही तालुक्यांचा Trigger-1 मध्ये समावेश, शेतकऱ्यांना मोठ्या मदतीची अपेक्षा
1

Maharashtra Drought 2026: धाराशिवला दुष्काळाचा विळखा! आठही तालुक्यांचा Trigger-1 मध्ये समावेश, शेतकऱ्यांना मोठ्या मदतीची अपेक्षा

Maharashtra Drought-Affected Takula List:  राज्य सरकारकडून दुष्काळग्रस्त तालुक्यांची यादी  वाचा एका क्लिकवर
2

Maharashtra Drought-Affected Takula List:  राज्य सरकारकडून दुष्काळग्रस्त तालुक्यांची यादी  वाचा एका क्लिकवर

Ahilyanagar News: अहिल्यानगरमध्ये दुष्काळसदृश स्थिती; चापडगाव परिसरात खरीप पिके उद्ध्वस्त
3

Ahilyanagar News: अहिल्यानगरमध्ये दुष्काळसदृश स्थिती; चापडगाव परिसरात खरीप पिके उद्ध्वस्त

Breaking News: मोठी बातमी! अखेर राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय
4

Breaking News: मोठी बातमी! अखेर राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.