Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिवाळीत बाजारपेठेवर दुष्काळाचे सावट! ग्राहकांनी पाठ फिरविल्याने जतमधील व्यापाऱ्यात चिंतेचे वातावरण

दिवाळी सन दोन दिवसावर येऊन ठेपला तरी जत शहरातील प्रमुख बाजारपेठेत दिवाळीचा उत्साह दिसत नाही. सर्वच व्यापाऱ्यांनी दिवाळी सणासाठी विविध वस्तूंनी आपआपली दुकाने सजविली आहेत. परंतु गत वर्षी तालुक्यातील खरिप हंगाम वाया गेल्याने व रब्बीची पेरणी करूनही अद्याप पाऊस न झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. त्यातच साखर कारखान्याचा हंगाम सुरू झाल्याने हजारो उसतोडणी कामगार आपल्या कुटुंबियासह रोजगारासाठी बाहेर पडले आहेत.

  • By Aparna
Updated On: Nov 09, 2023 | 06:18 PM
दिवाळीत बाजारपेठेवर दुष्काळाचे सावट! ग्राहकांनी पाठ फिरविल्याने जतमधील व्यापाऱ्यात चिंतेचे वातावरण
Follow Us
Follow Us:

जत : दिवाळी सन दोन दिवसावर येऊन ठेपला तरी जत शहरातील प्रमुख बाजारपेठेत दिवाळीचा उत्साह दिसत नाही. सर्वच व्यापाऱ्यांनी दिवाळी सणासाठी विविध वस्तूंनी आपआपली दुकाने सजविली आहेत. परंतु गत वर्षी तालुक्यातील खरिप हंगाम वाया गेल्याने व रब्बीची पेरणी करूनही अद्याप पाऊस न झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. त्यातच साखर कारखान्याचा हंगाम सुरू झाल्याने हजारो उसतोडणी कामगार आपल्या कुटुंबियासह रोजगारासाठी बाहेर पडले आहेत. याचा परिणामबाजारपेठेवर दिसून येत आहे.

जत शहरातील प्रमुख बाजारपेठेत तर कापड दुकानदारांमध्ये जाहीरातींवरून चढाओढ लागली आहे. कापड दुकानदार आपल्या चारचाकी वाहनावर व रिक्षावर एवढेच नव्हेतर आपल्या दुकानांसमोर मोठमोठे स्पीकर बाॅक्स लाऊन आपल्या दुकानाची जाहीरात करताना दिसत आहेत. यामुळे बाजारपेठेत जणू यात्राच सुरू आहे का? याचा भास होत आहे. कापड व्यापाऱ्यांनी सोडलेल्या या स्पीकरच्या आवाजामुळे बाजारातील इतर व्यावसायिक व ग्राहक वैतागले आहेत. एकंदरीत जत बाजार पेठेवर दुष्काळाचे सावट दिसून येत असून व्यापारी चिंतेत आहेत.

साहित्य खरेदी करणारे तुरळक
जत शहरातील पेठेतील हनुमान मंदिर ते महाराणा प्रताप चौक, जयहींद चौक ते मटण मार्केट या मार्गावर व्यापाऱ्यांनी दिवाळीचे स्टाॅल लावले असले तरी दिवाळीचे साहित्य खरेदी करणारे ग्राहक तुरळक प्रमाणात दिसून येत असल्याने व्यापारी चिंताग्रस्त दिसून येत आहेत.

Web Title: Drought hits markets during diwali traders in jat are worried as customers turn their backs nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2023 | 06:18 PM

Topics:  

  • maharashtra
  • sangli news

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: ऊस उत्पादकांसाठी मोठी बातमी! 15 ऑक्टोबरपासून राज्यात गाळप हंगामाला सुरुवात
1

Devendra Fadnavis: ऊस उत्पादकांसाठी मोठी बातमी! 15 ऑक्टोबरपासून राज्यात गाळप हंगामाला सुरुवात

Dharashiv News: धाराशिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात विनापरवानगी वृक्षतोड? जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
2

Dharashiv News: धाराशिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात विनापरवानगी वृक्षतोड? जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

Pratap Sarnaik: ॲप टॅक्सी चालकांसाठी मोठी बातमी! कंपन्यांना 3 महिन्यांत द्यावी लागणार चालकांची संपूर्ण माहिती
3

Pratap Sarnaik: ॲप टॅक्सी चालकांसाठी मोठी बातमी! कंपन्यांना 3 महिन्यांत द्यावी लागणार चालकांची संपूर्ण माहिती

Gondiya News: रोजगाराचा शोध काळाने रस्त्यावरच संपवला!  गोंदियामध्ये ट्रकच्या धडकेत मध्य प्रदेशातील ६ मजुरांचा मृत्यू
4

Gondiya News: रोजगाराचा शोध काळाने रस्त्यावरच संपवला!  गोंदियामध्ये ट्रकच्या धडकेत मध्य प्रदेशातील ६ मजुरांचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.