
जिल्ह्याला परतीच्या मुसळधार पावसाचा दणका
भात उत्पादक शेतकरी मेटाकुटीला
आंबा, काजू हंगामासह मासेमारीवरही परिमाण
Ratnagiri Rain Update: जिल्ह्याला परतीच्या पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टधामुळे शुक्रवारी मध्यरात्रीपासून जिल्हाभरात पावसाचा जोर वाढाला, शनिवारी दुपारपर्यंत पावसाने अक्षरशः धुमाकुळ घातला. लांबलेल्या पावसाचा फटका भातशेती, आंबा, काजू, मासेमारी आणि पर्यटनाला बसला आहे. सध्या कापलेली भातशेती पूर्णपणे वाया गेली असून शेतात उभी असलेली भातशेती वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. तर पाऊस लांबल्याने आंबा, काजूचा हंगाम लांचणीवर गेला आहे. समुद्र खवळलेल्या स्थितीत असल्याने मासेमारीवरही परिमाण होतोय.
जेसीबी माध्यमातून पाण्याचा केला निचरा
वहाळ बुजवल्याने पाणी तुंबले असून पाच घरात मध्यरात्री तीन फुटांपर्यंत पाणी शिरले आहे. तर दोन चारचाकी गाडवा आणि दोन दुचाकी गाड्या पाण्याखाली गेल्या आहेत. ही घटना घडल्यानंतर स्थानिक नगरसेवक मदतीला धावले असून जेसीबी आणि क्रेनच्या माध्यमातून पाण्याचा निचरा करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेत पाच घरात पाणी शिरल्याने मोठं नुकसान झाले असून आमदार किरण सामंत यांनी या ठिकाणी तत्काळ भेट दिली.
काही भागांमध्ये पाणी साचल्याने पूरस्थिती
शुक्रवारपासून जिल्हाभरात परतीच्या पावसाचा जऔर पुन्हा वाढला. शनिवारी पहाटे पावसाने अक्षरश घुमाकुळ घातला. शनिवारी दुपारपर्यंत पावसाचा जोर कायम होता. मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी उतळीमध्ये पुन्हा वाढ झाली असून काही भागांमध्ये पाणी साचल्याने पूरस्थिती निर्माण झाली होती. रत्नागिरी मुंबई गोवा महामार्गांवरच्या ठेकेदाराचा निश्काळजीपणाचा फटका लांजावासीधांना बसला आहे. घुवाधार पाऊस आणि अर्धवट कामामुळे श्रीरामपूल वैभव वसाहती जवळच्या पाच धरात पावसाचे पाणी शिरले आहे.
Maharashtra Rain Alert: आता जा रे बाबा! राज्यात काही तास भयानक पाऊस असणार; IMD चा अलर्ट काय?
भात उत्पादक शेतकरी मेटाकुटीला
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे रानागिरीत सातत्याने गेले काही दिवस परतीचा पाऊस कोसळत आहे. या लांबलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील भात उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आले असून अनेक ठिकाणी कापलेले भात शेती वाया गेली आहे. तर आंबा आणि काजूचा हंगाम देखील लांबणीवर गेला आहे.
पुढील काही दिवस जिल्ह्यात पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे, त्यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे. शेतकरी बांधवांचा समस्यांशी कायम सामना सुरू असतोच, त्यात आता यंदा वर्षभर पावसाने झोडपल्याने ही आणखी एक समस्या त्याना सतावते आहे.