Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऐन सणासुदीत बजेट काेलमडणार, डाळींचा भाव तेजीत; खर्चाचा ताळमेळ जुळवताना करावी लागणार कसरत

पावसाने ओढ दिल्यामुळे बाजारपेठेवर दुष्काळाचे सावट असताना ऐन सणासुदीच्या काळात डाळींचे भाव वाढल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मात्र मोठी झळ बसणार आहे. कुटुंबाचे मासिक बजेट कोलमडणार आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 14, 2023 | 02:02 PM
ऐन सणासुदीत बजेट काेलमडणार, डाळींचा भाव तेजीत; खर्चाचा ताळमेळ जुळवताना करावी लागणार कसरत
Follow Us
Close
Follow Us:

कुर्डुवाडी : पावसाने ओढ दिल्यामुळे बाजारपेठेवर दुष्काळाचे सावट असताना ऐन सणासुदीच्या काळात डाळींचे भाव वाढल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मात्र मोठी झळ बसणार आहे. कुटुंबाचे मासिक बजेट कोलमडणार आहे. आर्थिक ताळमेळ जुळवताना मोठी कसरत करावी लागणार आहे. यंदा पाऊस नसल्याकारणाने खरीप वाया गेला.शेतकरी वर्ग पुरता अडचणीत सापडला आहे. बाजारातील ग्राहकांची रेलचल कमी झाली आहे. महागाईमात्र आ वासून पुढे उभी राहीली आहे. सणसूद सुरु आहेत आणि सर्वच प्रकारच्या तुर डाळ, मुग डाळ, हरभरा डाळ, उडीद दाळ महाग झाल्या असून यांच्यासह उडीद, तुरीला देखील चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे कहीं खुशी कहीं गम अशी अवस्था झाली.

तुरडाळीची वाटचाल २०० च्या दिशेने तर हरभरा दाळ १००, उडीद दाळ १५०, मुगदाळ १२० असे दर झाले असून उडीदाचा भाव १०० पर्यंत गेला आहे. त्यात आणखी एक भर म्हणजे व्हायरल इन्फेक्शन मुळे अनेकांकडे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याने दवाखाना, विविध चाचण्या, औषधे याचाच खर्च भागवता भागवता नागरिक मेटाकुटीला आले आहेत.

सणासुदीमुळे प्रत्येक घरात डाळींचा वापर अधिक होत असतो. नेमके काही दिवसापूर्वी सिलेंडर दोनशेने काय स्वस्त झाले मात्र डाळीचे व इतर अन्नधान्याचे भाव कडाडल्यामुळे यंदाची दिवाळी सर्वसामान्यांसाठी दिवाळं ठरू नये म्हणजे झाले.

बाजारपेठेत मंदीचा परिणाम

सध्या बाजारात पूर्णपणे मंदी आहे. हौसमौस किंवा चैनेच्या वस्तू खरेदी करणे तर लांबच पण जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठीही नागरिकांना चारवेळा विचार करावा लागत आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तू सोडल्या तर बाजारात कसलीच रेलचेल दिसून येत नाही.

दैनंदिन खर्चात मोठी वाढ

महागाईमुळे नागरिकांचे मासिक बजेट कोलमडले आहे. जीवनावश्यक सर्वच वस्तंच्या किंमतीत वाढ झाल्याने दैनंदिन खर्चात मोठी वाढ झाली आहे. सरकारने यावर योग्य ती उपाययोजना करुन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

[blockquote content=”सध्या पाऊसपाणी नसल्याकारणाने समाधानकारक असे उत्पादन न झाल्याने बाजारात डाळींची आवक कमी झाल्याने भविष्यात डाळींचा दर २०० रुपयांपर्यंत जाऊ शकतो.” pic=”” name=”- रवींद्र ठोकडे, आडत व्यापारी”]

[blockquote content=”भाजीपाला, फळे, डाळी व सर्वच अन्नधान्यांच्या किंमतीत वाढ झाली असून, सरकारने धोरणात्मक निर्णय घेऊन लवकरात लवकर उपाययोजना करावी व डाळींचे इतर अन्नधान्यांचे दर आटोक्यात आणून सर्वसामान्य व मध्यमवर्गीयांना दिलासा द्यावा.” pic=”” name=”- सुहासिनी भोरे, गृहिणी”]

शेंगदाणा १३०-१५०
गहू ३०-४०
ज्वारी ४५-७०
तांदूळ. ४५-१५०
साखर. ४२
हरभरा डाळ ८५
मुग डाळ. १२०-१३०
तुर डाळ. – १८०
उडीद दाळवाले – १२०
मसूर डाळ. – १००
तुर. – १३०
उडीद. – ११०
गोडतेल. ९० -१२५
शाबुदाणा ९० -१००

Web Title: During the festive season the budget will collapse the price of pulses will increase reconciliation of expenses has to be done nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2023 | 02:02 PM

Topics:  

  • cmomaharashtra
  • Kurduvadi
  • maharashtra
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

हुडहुडी कमी होणार! पण तापमानातील ‘हा’ खेळ कसा असणार? ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
1

हुडहुडी कमी होणार! पण तापमानातील ‘हा’ खेळ कसा असणार? ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती

काळोखे हत्या प्रकरणात सुधाकर घारेंच्या विरोधात षडयंत्र, शिवसेना उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांचा महेंद्र थोरवे यांच्यावर आरोप
2

काळोखे हत्या प्रकरणात सुधाकर घारेंच्या विरोधात षडयंत्र, शिवसेना उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांचा महेंद्र थोरवे यांच्यावर आरोप

Dharashiv Airport : धाराशिव विमानतळ होणार विकासाचे ‘रीजनल हब’ , आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
3

Dharashiv Airport : धाराशिव विमानतळ होणार विकासाचे ‘रीजनल हब’ , आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

जिल्हा परिषद निवडणूक कधी? आचारसंहिता कधी लागणार? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
4

जिल्हा परिषद निवडणूक कधी? आचारसंहिता कधी लागणार? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.