Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

E-Peek Pahani Survey: ई-पिक पाहणी न झालेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासा; ऑफलाईन पिक पाहणीसाठी 24 डिसेंबरपर्यंत अर्ज

महत्त्वाचे म्हणजे, ही ऑफलाईन पिक पाहणीची सुविधा फक्त त्या शेतकऱ्यांसाठीच लागू राहणार आहे, ज्यांनी खरीप हंगाम २०२५ मध्ये ई-पिक पाहणीची नोंद केलेली नाही.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 23, 2025 | 04:53 PM
Kharif season 2025, e-Crop survey Maharashtra, e-Peek Pahani offline,

Kharif season 2025, e-Crop survey Maharashtra, e-Peek Pahani offline,

Follow Us
Close
Follow Us:
  • ई-पिक पाहणी न झालेल्या शेतकऱ्यांना ऑफलाईन अर्जाची संधी
  • तासगाव तहसीलदारांकडून ई-पिक नोंद नसलेल्या शेतकऱ्यांनी तात्काळ अर्ज करण्याचे आवाहन
  • शासनाच्या योजनांचा लाभ, नुकसानभरपाई, विमा व इतर कृषीविषयक मदतीसाठी पीक नोंद अत्यंत महत्त्वाची
Kharif season 2025: खरीप हंगाम २०२५ मध्ये ज्या शेतकऱ्यांची ई-पिक पाहणी विहीत मुदतीत नोंद झाली नाही, अशा शेतकऱ्यांसाठी शासनाने ऑफलाईन पिक पाहणीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी दिनांक २४ डिसेंबर २०२५ पर्यंत आपआपल्या गावातील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांच्याकडे अर्ज सादर करावा, असे आवाहन तासगावचे तहसीलदार अतुल पाटोळे यांनी केले आहे. (E-Peek Pahani Survey) 

ई-पिक पाहणी नोंद न झाल्यामुळे अनेक शेतकरी विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यापासून वंचित राहण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेऊन ऑफलाईन पद्धतीने पिकांची स्थळ पाहणी करून नोंद करण्याची ही विशेष तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांची ई-पिक पाहणी राहून गेली आहे, त्यांनी ही संधी न दवडता तात्काळ अर्ज करावा, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

राहुल गांधी हे भारताच्या सर्वात मोठ्या शत्रूंपैकी एक…: लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्यांवर कोणी केला आरोप?

शेतकऱ्यांनी अर्ज केल्यानंतर मंडळ अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीत मंडळ अधिकारी अध्यक्ष म्हणून, तर ग्राम महसूल अधिकारी, ग्रामविकास अधिकारी व सहायक कृषी अधिकारी सदस्य म्हणून असतील. ही समिती संबंधित शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन प्रत्यक्ष स्थळ पाहणी करणार असून, त्यानंतर सविस्तर अहवाल उपविभागीय स्तरीय समितीकडे सादर करण्यात येणार आहे. या अहवालाच्या आधारे पुढील कार्यवाही केली जाणार आहे.  (Farmers News) 

महत्त्वाचे म्हणजे, ही ऑफलाईन पिक पाहणीची सुविधा फक्त त्या शेतकऱ्यांसाठीच लागू राहणार आहे, ज्यांनी खरीप हंगाम २०२५ मध्ये ई-पिक पाहणीची नोंद केलेली नाही. ज्या शेतकऱ्यांची पीक नोंदणी आधीच गाव नमुना क्रमांक १२ वर प्रतिबिंबित झाली आहे, त्यांच्या नोंदींमध्ये कोणतीही दुरुस्ती केली जाणार नाही, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ! उन्हाळीस ९४९ रुपये, तर लाल कांद्याच्या बाजारभावात ५०० रुपयांची घसरण

तहसीलदार अतुल पाटोळे यांनी शेतकऱ्यांना आवाहन करताना सांगितले की, शासनाच्या योजनांचा लाभ, नुकसानभरपाई, विमा व इतर कृषीविषयक मदतीसाठी पीक नोंद अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह २४ डिसेंबरपूर्वी अर्ज करून आपली पिक पाहणी करून घ्यावी व प्रशासनास सहकार्य करावे. या निर्णयामुळे तासगाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून, राहून गेलेल्या पीक नोंदी पूर्ण करून भविष्यातील शासकीय लाभ मिळवण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

 

Web Title: E peek pahani survey relief for farmers offline crop survey facility for those who missed e peek pahani

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 23, 2025 | 04:39 PM

Topics:  

  • Agriculrture News
  • Farmers News
  • Farmers Scheme

संबंधित बातम्या

Farmers’ Day 2025: राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त जाणून घेऊया केंद्र सरकारच्या शेतीत नफा वाढवणाऱ्या प्रमुख योजना
1

Farmers’ Day 2025: राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त जाणून घेऊया केंद्र सरकारच्या शेतीत नफा वाढवणाऱ्या प्रमुख योजना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.