Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आले गणराय… गणेशमूर्ती साकारण्यासाठी लगबग; इको फ्रेंडली मूर्तींना मोठी मागणी

यंदाचा गणेशोत्सव शनिवारी (दि. ७ सप्टेंबर) सुरू होत आहे. त्यामुळे कुंभार बांधवांची गणेशमूर्ती बनविण्यासाठी लगबग सुरू आहे. श्री गणेशाच्या आगमनाला आता अवघा एक महिना राहिल्याने कुंभारवाड्यात लगबग सुरू झाली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 11, 2024 | 11:29 AM
आले गणराय… गणेशमूर्ती साकारण्यासाठी लगबग; इको फ्रेंडली मूर्तींना मोठी मागणी
Follow Us
Follow Us:

सातारा : यंदाचा गणेशोत्सव शनिवारी (दि. ७ सप्टेंबर) सुरू होत आहे. त्यामुळे कुंभार बांधवांची गणेशमूर्ती बनविण्यासाठी लगबग सुरू आहे. श्री गणेशाच्या आगमनाला आता अवघा एक महिना राहिल्याने कुंभारवाड्यात लगबग सुरू झाली आहे. कुंभार बांधवांचे हात आकर्षक गणेशमूर्ती साकारण्यात गुंतले आहेत. शहरासह जिल्ह्यातील कुंभारवाड्यात घरोघरी व कारखान्यात गणेशमूर्ती बनवण्याची हातघाई दिसून येऊ लागली आहे.

सातारा शहरातील मंगळवार पेठेतील शाहू कला मंदिरा नजीकच्या श्री गवई विठ्ठल मंदिरामध्ये पुणे येथील उरुळी कांचन येथून आलेल्या अतिशय सुबक आणि देखण्या गणेशमूर्ती पाहून अगोदरच बुकिंग करण्यासाठी सातारकरांची भर पावसातही लगबग दिसून येत आहे. श्री बालाजी रूप, माखन चोर, दहीहंडी फोडणारा, सिंहासनावर बसलेला, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, विठ्ठल मूर्तीतील गणेश, गरुडावर, मोरा सोबत खेळताना अशा अनेक प्रकारच्या विविध प्रकारच्या गणेश मूर्ती विक्रीस उपलब्ध झाल्या आहेत. प्लास्टर ऑफ पॅरिस बरोबरच घरगुती पूजेसाठी शाडू मातीच्या गणेश मूर्ती येथे मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्या आहेत.

यंदा डायमंड, फेटा व धोतर रेडिमेड नेसवलेल्या गणेश मूर्तीना बाजारपेठेत मागणी वाढली आहे. उत्सवाला अवघा एक महिना राहिल्याने कुंभार बांधवांच्या घराघरांत, कारखान्यात वेगवेगळ्या स्वरूपांतील आकर्षक गणेशमूर्ती आकाराला येत आहेत. सध्या तयार गणेशमूर्तीवर अखेरचा हात फिरवण्याचे काम सुरू आहे. घरगुती आणि मंडळांच्या गणेशमूतीचे कोरीव काम केले जात आहे. अनेक कुंभारांकडून कच्च्या गणेशमूर्ती परगावी पाठवल्या जात आहेत. मोजक्या घरांमध्ये मूर्तीचे रंगकाम सुरू झाले आहे. शहरात काही ठिकाणी मूर्ती विक्रेत्यांचे स्टोल लागले आहेत.

यंदा नवनवीन संकल्पनेतील मुर्ती

यावर्षी घरगुती मूर्ती या एक फुटांपासून ते तीन फुटापर्यंत आहेत. यंदा साधारणपणे दीड हजार ते दहा हजार, तर मंडळांच्या मूर्ती दहा हजार ते लाखापर्यंत तयार होत आहेत. शाडू मातीच्या मूर्तीची यंदा संख्या वाढली आहे. भाविकांना आकर्षित करण्यासाठी बाप्पांच्या नवनवीन संकल्पनेतील मुर्ती तयार करण्यात येतात. यामुळे कोऱ्या मूर्ती कारखान्यांमधून दाखल झाल्या आहेत. ऑर्डरनुसार या मूर्तीना गणेशभक्त व मंडळ कार्यकर्ते रंगकाम करून मूर्ती आकर्षक करण्यावर भर देत आहेत.

बालगणेशा, तांडव अवतार, शिवअवतार

प्रबोधन झाल्याने गेल्या काही वर्षांत शाडूच्या आणि कागदाच्या लगद्याच्या मूर्तीना मागणी वाढली आहे. लालबाग, दगडूशेठ, मोरावरील गणेश, तुतारीवरील गणेश, झोपाळा गणेश, स्वामी समर्थ अवतार, चौरंग गणेश अशा फेटा, घोतर आणि डायमंड वर्क केलेल्या गणेशमूर्तीना सध्या मागणी मोठ्या प्रमाणात आहे. तर फेटाधारी, जय मल्हार, बालगणेशा, तांडव अवतार, शिवअवतार अशा गणेश मूर्तीना बच्चे कंपनीकडून घरगुती गणेश उत्सवासाठी विशेष मागणी आहे.

Web Title: Eco friendly ganesha idols are in great demand nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2024 | 11:29 AM

Topics:  

  • ganesh utsav
  • maharashtra

संबंधित बातम्या

मुंबईकरांनो, आता तुरुंगवासासाठीही तयार राहा! २० दिवसांत राँग साईडने गाडी चालवल्याबद्दल ३४३ चालकांवर गुन्हा दाखल
1

मुंबईकरांनो, आता तुरुंगवासासाठीही तयार राहा! २० दिवसांत राँग साईडने गाडी चालवल्याबद्दल ३४३ चालकांवर गुन्हा दाखल

Mumbai News: मोहिमेचा धडाका १४ दिवसांत ६८ किलोमीटरचे पदपथ अडथळामुक्त! मुंबईत पालिकेचे ‘पादचारी प्रथम’ अभियान
2

Mumbai News: मोहिमेचा धडाका १४ दिवसांत ६८ किलोमीटरचे पदपथ अडथळामुक्त! मुंबईत पालिकेचे ‘पादचारी प्रथम’ अभियान

Mumbai University: मुंबई विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद; समस्या, अपेक्षा आणि शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा
3

Mumbai University: मुंबई विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद; समस्या, अपेक्षा आणि शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा

Eknath Shinde: ठाण्याचा होणार कायापालट! मेट्रो, बोरिवली बोगद्यासह अत्याधुनिक सुविधांना वेग, उपमुख्यमंत्र्यांची माहिती
4

Eknath Shinde: ठाण्याचा होणार कायापालट! मेट्रो, बोरिवली बोगद्यासह अत्याधुनिक सुविधांना वेग, उपमुख्यमंत्र्यांची माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.