Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शाळेमध्ये मिळणारे शिक्षण आणि संस्कार हे प्रगतीचे खरे टप्पे – प्रशांत यादव

भविष्यातील प्रगती अवलंबून असल्याचे प्रतिपादन चिपळूण येथील वशिष्ठ डेअरीचे अध्यक्ष आणि चिपळूण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत यादव यांनी केले.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jan 14, 2024 | 05:29 PM
शाळेमध्ये मिळणारे शिक्षण आणि संस्कार हे प्रगतीचे खरे टप्पे – प्रशांत यादव
Follow Us
Follow Us:

चिपळूण : प्राथमिक शाळा असो अथवा माध्यमिक या शाळांमधून मिळणारे शिक्षण आणि गुरुजनांकडून होणारे संस्कार हेच विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे खरे टप्पे आहेत. शाळेमध्ये शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी स्वतःला सर्व टप्प्यांवर चौकस करणे ही काळाची गरज आहे. शिक्षण हे ज्ञानाने माणसाला समृद्ध बनवते. या समृद्धीच्या जोरावरच भविष्यातील प्रगती अवलंबून असल्याचे प्रतिपादन चिपळूण येथील वशिष्ठ डेअरीचे अध्यक्ष आणि चिपळूण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत यादव यांनी केले.

व्यापारी पैसा फंड संस्था संचलित पैसा फंड इंग्लिश स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून प्रशांत यादव हे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उद्योजक शकील सावंत, माजी बांधकाम सभापती विजय देसाई, संस्था अध्यक्ष अनिल शेट्ये, उपाध्यक्ष किशोर पाथरे, सचिव धनंजय शेट्ये, सदस्य संदीप सुर्वे, रमेश झगडे, मुख्याध्यापक सचिनदेव खामकर, पर्यवेक्षक दिलीप मोरगे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्रशांत यादव पुढे म्हणाले की, सध्या कृषी क्षेत्रामध्ये करियर करण्याची खूप मोठी संधी आहे. वशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून आम्ही नुकताच कृषी महोत्सव आयोजित केला होता. या महोत्सवाला असंख्य शाळांनी भेट दिली आणि विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्राशी निगडित विविध भागांची ओळख करून दिली, ही बाब नक्कीच अभिनंदनीय आहे. असंख्य शाळा आपल्या सहली घेऊन हा कृषी महोत्सव पाहण्यासाठी आल्या होत्या. संगमेश्वर येथील व्यापारी पैसा फंड संस्थेचे शिक्षण क्षेत्रातील कार्य खूप मोठे आहे. या संस्थेला आपले नेहमीच सहकार्य असेल, असे आश्वासन यादव यांनी यावेळी दिले.

रत्नागिरी येथील उद्योजक शकील सावंत आपल्या मनोगतात म्हणाले की, शालेय स्तरावरच विद्यार्थ्यांनी कोणत्या क्षेत्रात शिक्षण घ्यायचे आहे, हे नक्की केले पाहिजे. सध्या शिक्षणाची विविध तंत्र उपलब्ध आहेत, विद्यार्थ्यांनी याचा आपल्या शैक्षणिक प्रवासात वापर करणे ही काळाची गरज आहे असे सावंत यांनी स्पष्ट केले.

Web Title: Education and sanskar are the real steps of progress prashant yadav maharashtra political party maharashtra government congress

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 14, 2024 | 05:29 PM

Topics:  

  • Congress
  • Maharashtra Government
  • Prashant Yadav
  • Ratnagiri News Update

संबंधित बातम्या

Gadchiroli News : गडचिरोलीत उभा राहणार हरित पोलादाचा प्रकल्प; महाराष्ट्र सरकारचा जॉन कॉकरिलसोबत मोठा करार
1

Gadchiroli News : गडचिरोलीत उभा राहणार हरित पोलादाचा प्रकल्प; महाराष्ट्र सरकारचा जॉन कॉकरिलसोबत मोठा करार

अनुसूचित जातींच्या उमेदवारांना मोठा दिलासा; MPSC मुलाखतीच्या तयारीसाठी BARTI कडून मिळणार 10 हजारांची मदत
2

अनुसूचित जातींच्या उमेदवारांना मोठा दिलासा; MPSC मुलाखतीच्या तयारीसाठी BARTI कडून मिळणार 10 हजारांची मदत

Pune News : पुणे ठरतेय GCC चे हब; वर्षभरात 800 पेक्षा अधिक ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स होणार, मुख्यमंत्री फडणवीसांचा विश्वास
3

Pune News : पुणे ठरतेय GCC चे हब; वर्षभरात 800 पेक्षा अधिक ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स होणार, मुख्यमंत्री फडणवीसांचा विश्वास

Maratha Reservation : मराठा आरक्षण आंदोलनाला मोठं यश? जरांगेंच्या मागण्यांवर सरकारच्या शिष्टमंडळाची चर्चा
4

Maratha Reservation : मराठा आरक्षण आंदोलनाला मोठं यश? जरांगेंच्या मागण्यांवर सरकारच्या शिष्टमंडळाची चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.