Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 20 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लग्न ठरलं, दुसऱ्याच दिवशी बघण्याचा कार्यक्रम; क्रिकेट खेळताना ३५ वर्षीय तरुणाचा अचानक मृत्यू, रत्नागिरीत हळहळ

आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात होणार होती, लग्न ठरलं होतं आणि सोमवारी घरी मुलीकडची मंडळीही येणार होती. मात्र, या आनंदाच्या क्षणाआधीच चवंडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. मित्रांसोबत क्रिकेट खेळताना अचानक चक्कर येऊन ३५ वर्षीय स्मित चवंडे कोसळला. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे रत्नागिरीत हळहळ व

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 20, 2026 | 04:30 PM
लग्न ठरलं, दुसऱ्याच दिवशी बघण्याचा कार्यक्रम; क्रिकेट खेळताना ३५ वर्षीय तरुणाचा अचानक मृत्यू, रत्नागिरीत हळहळ

लग्न ठरलं, दुसऱ्याच दिवशी बघण्याचा कार्यक्रम; क्रिकेट खेळताना ३५ वर्षीय तरुणाचा अचानक मृत्यू, रत्नागिरीत हळहळ

Follow Us
Follow Us:
  • लग्नाच्या तयारीत असतानाच काळाचा घाला
  • क्रिकेट खेळताना चक्कर येऊन कोसळला
  • उपचारांपूर्वीच ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू
 

रत्नागिरी : आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात होण्यापूर्वीच एका तरुणाचा दुर्दैवी अंत झाल्याची हृदयद्रावक घटना रत्नागिरीत घडली आहे. लग्न ठरलेल्या ३५ वर्षीय स्मित नरेंद्र चवंडे याचा मित्रांसोबत क्रिकेट खेळताना अचानक चक्कर येऊन मृत्यू झाला. सोमवारी, १९ ऑक्टोबर रोजी त्याच्या घरी मुलीकडची मंडळी बघण्याच्या कार्यक्रमासाठी येणार होती. मात्र, त्याच्या मृत्यूमुळे चवंडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

क्रिकेट खेळताना अचानक कोसळला

ही दुर्दैवी घटना रविवार, १८ ऑक्टोबर रोजी सकाळी रत्नागिरी शहरातील गाडीतळ परिसरातील लक्ष्मी चौक येथे घडली. स्मित चवंडे हा सकाळी मित्रांसोबत क्रिकेट खेळण्यासाठी गेला होता. खेळ सुरू असतानाच त्याला अचानक चक्कर आली आणि तो जमिनीवर बेशुद्ध होऊन कोसळला. स्मित अचानक कोसळल्याने त्याच्या मित्रांमध्ये घबराट पसरली. त्याचा मित्र युगेश सावंत याने तातडीने स्मितचा भाऊ सुशांत चवंडे यांना फोन करून घटनेची माहिती दिली. त्यानंतर स्मितला तातडीने रत्नागिरीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.

हेही वाचा: बहिणीला घटस्फोट दिल्याचा राग, मेव्हण्याची हत्या करून मृतदेह रेल्वे रुळांवर फेकला; २८ वर्षांनी मुख्य आरोपीला अटक

सोमवारी घरी येणार होती मुलीकडची मंडळी

स्मितचे अलीकडेच लग्न ठरले होते. त्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. लग्नाच्या पुढील प्रक्रियेतील महत्त्वाचा भाग असलेला बघण्याचा कार्यक्रम सोमवारी, १९ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला होता. यासाठी मुलीकडची मंडळी घरी येणार होती. मात्र, या आनंदाच्या क्षणाच्या आदल्याच दिवशी स्मितचा मृत्यू झाला. ज्या घरात लग्नाची तयारी आणि नव्या आयुष्याची स्वप्नं रंगत होती, तिथे आता शोककळा पसरली आहे. स्मितच्या अकाली निधनामुळे कुटुंबीयांसह मित्रपरिवारालाही मोठा धक्का बसला आहे.

मृत्यूचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट

स्मित चवंडे हा रत्नागिरीतील चतंडेवठार येथे राहत होता. तो खंडाळा येथील अर्थन बँकेत कामाला होता. त्याच्या पश्चात आई-वडील आणि विवाहित बहीण असा परिवार आहे. या घटनेची माहिती त्याचा भाऊ सुशांत चवंडे यांनी रत्नागिरी शहर पोलिसांना दिली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. क्रिकेट खेळताना स्मितला अचानक चक्कर का आली आणि त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस या घटनेची नोंद घेऊन पुढील कार्यवाही करत आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: स्मित चवंडे यांचा मृत्यू कसा झाला?

    Ans: क्रिकेट खेळताना त्यांना अचानक चक्कर आली आणि ते बेशुद्ध होऊन कोसळले. रुग्णालयात उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.

  • Que: स्मित चवंडे यांचा मृत्यू कुठे झाला?

    Ans: रत्नागिरी शहरातील गाडीतळ परिसरातील लक्ष्मी चौक येथे क्रिकेट खेळताना ते अचानक कोसळले.

  • Que: स्मित चवंडे यांचे लग्न ठरले होते का?

    Ans: होय. त्यांचे अलीकडेच लग्न ठरले होते आणि १९ ऑक्टोबर रोजी बघण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

Web Title: Ratnagiri sm it chawande death while playing cricket sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2026 | 04:30 PM

Topics:  

  • Death
  • Ratnagiri
  • Ratnagiri News Update

संबंधित बातम्या

Carrom Tournament : एमआयजी कॅरम स्पर्धेत समृद्धी घाडिगावकर, प्रशांत मोरे यांची बाजी!
1

Carrom Tournament : एमआयजी कॅरम स्पर्धेत समृद्धी घाडिगावकर, प्रशांत मोरे यांची बाजी!

Carrom Tournament : एमआयजी कॅरम स्पर्धेत सोनाली कुमारी, आकांक्षा कदमची उपांत्य फेरीत धडक
2

Carrom Tournament : एमआयजी कॅरम स्पर्धेत सोनाली कुमारी, आकांक्षा कदमची उपांत्य फेरीत धडक

रिक्षाचा धक्का लागला अन् थेट खड्ड्यात पडले! पुण्यात 55 वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू
3

रिक्षाचा धक्का लागला अन् थेट खड्ड्यात पडले! पुण्यात 55 वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू

ड्रेनेजच्या खड्ड्यात पडून ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, येरवड्यातील दुर्घटनेने खळबळ; नागरिकांचा संताप
4

ड्रेनेजच्या खड्ड्यात पडून ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, येरवड्यातील दुर्घटनेने खळबळ; नागरिकांचा संताप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.