Efforts for conduct postmortem at the District Hospital in Aundh along with Sassoon Hospital
पुणे : शहर आयुक्तालयात नव्याने सुरू झालेली सात पोलीस ठाणी, परिमंडळांची फेर रचनासोबतच आता सात पोलीस ठाण्यांकडे दाखल होणाऱ्या मृत्यूचे पीएम (शवविच्छेदन) आर्म्ड फोर्सेज मेडिकल कॉलेज (एएफएमसी) येथील रुग्णालयात होणार आहे. ससून रुग्णालयावर पडणारा भार कमी करण्यासाठी व पोलिसांना लागणारा वेळ व होणारा त्रास कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात नुकतीच पोलीस आयुक्तालयात ससून रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांचे शिष्टमंडळ व पुणे पोलिसांची बैठक पार पडली. औंध येथील जिल्हा रुग्णालयात देखील पीएम होण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. शहर पोलीस आयुक्तालयात आता 39 पोलीस ठाणी आहेत.
शहर आयुक्तालयात नुकतेच नव्याने ७ पोलीस ठाणी सुरू झाली आहेत. परिमंडळांची फेररचना देखील करण्याचे काम सुरू असून, त्यासोबतच पोलीस तपास व वेगवेगळ्या पातळीवर कामाचे विभाजन करण्यात येत आहेत. परिमंडळ चार व पाचमध्ये सर्वाधिक पोलीस ठाणे आहेत. परिमंडळ चारमध्ये 09 तर परिमंडळ पाचमध्ये 10 पोलीस ठाणे आहेत. शहरात पोलीस होणाऱ्या वेगवेगळ्या गुन्ह्यातील मृतदेहाचे पोस्ट मोर्टम हे ससून रुग्णालयात केले जाते. पण, त्यामुळे ससून रुग्णालयावर ताण पडत आहे. दुसरीकडे पोलिसांचा पीएमसाठी बराच वेळ जातो. आकस्मित मृतदेह तसेच खून, अपघात, आत्महत्या, वेगवेगळ्या घटनांत मृत झाल्यांनंतर शवविच्छेदन केले जाते. त्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होते. मगच, पोलिसांचा तपास सुरू होतो.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
सध्या सर्वच पोलीस ठाण्यांकडून पीएमसाठी ससून रुग्णालय गाठले जाते. पण, आता परिमंडळ पाचमधील ७ पोलीस ठाण्यांना एएफएमसी रुग्णालयात शवविच्छेदन करता येणार आहे. त्याबाबतचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. पुर्वीही एएफएमसीकडून शवविच्छेदन होत होते. पण, ते ठराविक वेळेसाठी होते. मात्र, आता पुर्णवळ पीएम होणार आहे.
पश्चिमनमहाराष्ट्रातील सर्वाधिक मोठे असलेले शासकीय रुग्णालय म्हणून ससूनची ओळख आहे. ससूनमध्ये दिवसाला तब्बल २० ते २५ शवविच्छेदन होत असल्याचे सांगण्यात आले, तर, वेगवेगळ्या प्रकारात जखमी झालेले तब्बल ५० ते १०० जन येथे दररोज दाखल होतात. त्यांच्यावर उपचार केले जातात. या सर्वांचा ताण ससून रुग्णालयावर पडतो.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
औध जिल्हा रुग्णालयातही पोस्ट मार्टमची सुचना लवकरच परिमंडळ पाचमधील पोलीस ठाण्यांकडील शवविच्छेदन एएफएमली रुग्णालयात होणार आहे. सोबतच परिमंडल चारसाठी देखील औंध जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन व्हावे, यासाठी प्रशासन पातळीवर हालवाली केल्या जात आहेत. जेणेकरून ससून रुग्णालयावरील ताण तसेच पोलीस दलाला लागणारा वेळ आणि अंतर कमी होईल, लवकरच त्यासाठी प्रत्तासकीय प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.