Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar news: अहिल्यानगरच्या कर्जतमध्ये पर्यावरणपूरक उपक्रम; आईच्या नावाने लावली ७० झाडे

Ahilyanagar news: अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथे 'एक झाड आईच्या नावाने' या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपल्या मातांच्या नावाने तब्बल ७० झाडांचे वृक्षारोपण करत पर्यावरण संवर्धनासोबतच मातृऋण व्यक्त करण्याचा अनोखा संदेश दिला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 07, 2026 | 05:39 PM
अहिल्यानगरच्या कर्जतमध्ये पर्यावरणपूरक उपक्रम; आईच्या नावाने लावली ७० झाडे

अहिल्यानगरच्या कर्जतमध्ये पर्यावरणपूरक उपक्रम; आईच्या नावाने लावली ७० झाडे

Follow Us
Follow Us:
  • अहिल्यानगरच्या कर्जतमध्ये पर्यावरणपूरक उपक्रम
  • आईच्या नावाने लावली ७० झाडे
  • वर्षभरापासून विशेष संगोपन
पोपट पिटेकर, कर्जत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात सुरू केलेल्या ‘एक झाड आईच्या नावाने’ या पर्यावरणपूरक अभियानाला अहिल्यानगरच्या कर्जत शहरात भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन पोटरे यांनी एक वेगळा आणि भावूक स्पर्श दिला आहे. पोटरे यांनी कर्जत शहरात थेट पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या आईच्या नावाने ७० विविध झाडांची लागवड केली असून, केवळ झाडे लावून न थांबता गेल्या वर्षभरापासून त्यांचे मुलाप्रमाणे संगोपनही केले आहे.

​पर्यावरणाचा समतोल- राखण्यासोबतच येत्या काळात प्रवाशांना सावली मिळावी आणि शहराचे सौंदर्य वाढावे, या दुहेरी उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला आहे. शहराच्या मुख्य रस्त्याच्या दुतर्फा पिंपळ, करंजी, चिंच आणि वड यांसारख्या दीर्घायुषी व सावली देणाऱ्या देशी वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.

Pune Nashik Railway Route: खेड विमानतळ पुरंदरला अन् पुणे-नाशिक रेल्वे शिर्डीमार्गे? उत्तर पुण्यावर अन्यायाची भावना

​वर्षभरापासून विशेष संगोपन

अनेकदा वृक्षारोपण केल्यानंतर झाडांकडे दुर्लक्ष होते. मात्र, सचिन पोटरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गेल्या वर्षभरापासून या सर्व ७० झाडांना नियमित पाणी देणे, खते घालणे आणि त्यांच्या संरक्षणाची योग्य ती खबरदारी घेतली आहे. त्यामुळे आज ही झाडे उत्तम प्रकारे जगली असून ती वाढू लागली आहेत. पंतप्रधानांच्या संकल्पनेतून प्रेरणा घेऊन शहराला हिरवेगार बनवण्याचा हा प्रयत्न स्थानिक नागरिकांच्या कौतुकास पात्र ठरत आहे.

​”पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक झाड आईच्या नावाने’ हे अभियान सुरू करून पर्यावरणाशी नातं जोडण्याचा संदेश दिला. या अभियानाला प्रतिसाद म्हणून आम्ही कर्जत शहरात नेत्यांच्या आईच्या नावाने ७० झाडे लावली. गेल्या वर्षभरापासून आम्ही या झाडांचे नियमित संगोपन करत आहोत. मुख्य रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांना आगामी काळात या झाडांची उत्तम सावली मिळेल आणि शहराच्या सौंदर्यातही भर पडेल असं सचिन पोटरे, जिल्हा उपाध्यक्ष, भाजप यांनी सांगितलं.

‘एक झाड आईच्या नावाने’ हा उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ जून २०२४ रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सुरू केला. पर्यावरण संवर्धनाला चालना देतानाच प्रत्येकाने आपल्या आईप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तिच्या नावाने किमान एक झाड लावावे, असा संदेश या मोहिमेतून देण्यात आला.

या उपक्रमामागे दोन महत्त्वाचे उद्देश आहेत. एक म्हणजे वाढत्या हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करून पर्यावरणाचे संरक्षण करणे आणि दुसरे म्हणजे आईबद्दलचा आदर, प्रेम आणि कृतज्ञता कृतीतून व्यक्त करणे.

पंतप्रधान मोदी यांनी देशातील नागरिक, विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना, स्थानिक स्वराज्य संस्था आणि विविध शासकीय विभागांना या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या आवाहनानंतर देशभरात लाखो नागरिकांनी आपल्या आईच्या नावाने झाडे लावून त्यांचे संगोपन करण्याचा संकल्प केला.

Mumbai Handloom Exhibition 2026: राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त नाबार्डचा उपक्रम; मुंबईत तीन दिवसीय हातमाग प्रदर्शनाचे आयोजन

Web Title: Ek jhad aichya navane drive ahilyanagar karjat 70 trees planted in mothers name

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2026 | 05:39 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • BJP
  • maharashtra

संबंधित बातम्या

ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी शकुंतला नगरकर यांचं निधन; 50 वर्षांहून अधिक काळ लावणी गाजवल्यानंतर घेतला अखेरचा श्वास
1

ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी शकुंतला नगरकर यांचं निधन; 50 वर्षांहून अधिक काळ लावणी गाजवल्यानंतर घेतला अखेरचा श्वास

Gondiya News: बाळापाठोपाठ मातेचाही मृत्यू! गंगाबाई रुग्णालयातील घटना; डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप!
2

Gondiya News: बाळापाठोपाठ मातेचाही मृत्यू! गंगाबाई रुग्णालयातील घटना; डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप!

Pratap Sarnaik: रस्ते अपघात रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचे निर्देश
3

Pratap Sarnaik: रस्ते अपघात रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचे निर्देश

Rahul Bondre : राहुल गांधींचा एक फोन अन् राहुल बोंद्रेंचा भाजप प्रवेश थांबला? यशोमती ठाकूरांनी सांगितलं काय घडलं
4

Rahul Bondre : राहुल गांधींचा एक फोन अन् राहुल बोंद्रेंचा भाजप प्रवेश थांबला? यशोमती ठाकूरांनी सांगितलं काय घडलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.