Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 23 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Eknath Shinde: दुष्काळग्रस्त बळीराजासाठी एकनाथ शिंदेंचे आवाहन; ‘सणांवरील खर्च कमी करा, बचतीतून शेतकऱ्यांना मदत करा’

Eknath Shinde: राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवरात्रोत्सवासह आगामी सण साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन केले आहे. उत्सवांवरील अनावश्यक खर्च टाळून बचत झालेला निधी दुष्काळग्रस्त शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी द्यावा, असे आवाहन शिंदे यांनी केले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 01, 2026 | 06:02 PM
दुष्काळग्रस्त बळीराजासाठी एकनाथ शिंदेंचे आवाहन; ‘सणांवरील खर्च कमी करा, बचतीतून शेतकऱ्यांना मदत करा’

दुष्काळग्रस्त बळीराजासाठी एकनाथ शिंदेंचे आवाहन; ‘सणांवरील खर्च कमी करा, बचतीतून शेतकऱ्यांना मदत करा’

Follow Us
Follow Us:
  • नवरात्रोत्सवासह आगामी सण साधेपणाने साजरे करा
  • बचत झालेला निधी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना द्या
  • उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन
मुंबई: राज्यात निर्माण झालेल्या भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, आपल्या अन्नदात्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी आगामी नवरात्रोत्सव आणि इतर धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रम अत्यंत साधेपणाने साजरे करावेत, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केले आहे. या उत्सवांमधून बचत झालेला निधी थेट दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून द्यावा, असेही आवाहन त्यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना, सार्वजनिक मंडळांना आणि नागरिकांना केले आहे.

बहुतांश ठिकाणी दुष्काळाचे सावट

यंदा विदर्भ, मराठवाडा आणि राज्यातील इतर भागांत पावसाने ओढ दिल्यामुळे बहुतांश ठिकाणी दुष्काळाचे सावट पसरले आहे. निसर्गाच्या कोपामुळे उभी पिके करपून गेल्याने हजारो शेतकरी हवालदिल झाले आहेत. या बिकट परिस्थितीवर बोलताना “राज्याच्या तिजोरीवर पहिला हक्क आमच्या बळीराजाचा आहे,” या भूमिकेचा पुनरुच्चार शिंदे यांनी केला. अशा संकटकाळात महायुती सरकार आणि शिवसेना पक्ष पूर्ण ताकदीने शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. शासकीय पातळीवर सर्वतोपरी मदतीच्या उपाययोजना सुरू आहेतच; परंतु एक समाज म्हणूनही प्रत्येकाने पुढे येऊन या परिस्थितीत योगदान देणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

पावसामुळे शाळांच्या परिसराती बसथांबा कोसळला, मनसे आक्रमक; महापालिका आयुक्तांकडे केली ‘ही’ मागणी

शेतकरी बांधव संकटात आणि चिंतेत असताना आगामी सण-उत्सव मोठ्या थाटामाटात व धुमधडाक्यात साजरे करणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे सार्वजनिक मंडळे, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी उत्सव अगदी साधेपणाने साजरे करावेत. उत्सवांवर होणाऱ्या अवाढव्य खर्चाला फाटा देऊन वाचलेला निधी दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांच्या थेट मदतीसाठी आणि पुनर्वसनासाठी वर्ग करावा, असे ते म्हणाले.

नैसर्गिक आपत्तीवर मात

आपला अन्नदाता संकटात असताना आपण सर्वजण त्याच्या मदतीला धावून गेलो, तर या नैसर्गिक आपत्तीवर मात करणे सहज शक्य होईल. उत्सवाच्या खर्चात बचत करून जर आपण एका जरी शेतकऱ्याच्या डोळ्यांतील अश्रू पुसू शकलो आणि त्याच्या चेहऱ्यावर हास्य आणू शकलो, तर तीच आदिशक्ती जगदंबेची खरीखुरी सेवा ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

आता याला काय म्हणावं? जिवंत होण्याच्या आशेने मृतदेह तब्बल 4 वर्षे फ्रीजरमध्ये; दरमहा 1.60 लाखही दिले

Web Title: Eknath shinde appeals celebrate navratri festivals simply donate savings to drought hit farmers sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2026 | 06:02 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Farmers
  • Navratri 2026

संबंधित बातम्या

Warana Milk Price Hike: गोकुळपाठोपाठ वारणा दूध संघाचीही दरवाढ; म्हशीचे दूध ३, गायीचे २ रुपयांनी महागले, ग्राहकांना झटका!
1

Warana Milk Price Hike: गोकुळपाठोपाठ वारणा दूध संघाचीही दरवाढ; म्हशीचे दूध ३, गायीचे २ रुपयांनी महागले, ग्राहकांना झटका!

Maharashtra Politics : भरत गोगावलेंनी मंत्रिपदाची ऑफर दिली अन् दुसऱ्याच दिवशी शिंदें थेट आमदाराच्या घरी! पंढरपुरात नेमकं काय घडलं?
2

Maharashtra Politics : भरत गोगावलेंनी मंत्रिपदाची ऑफर दिली अन् दुसऱ्याच दिवशी शिंदें थेट आमदाराच्या घरी! पंढरपुरात नेमकं काय घडलं?

कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने एकनाथ शिंदेंची सपत्नीक शासकीय महापूजा; शिंदेंकडून तब्बल ‘इतक्या’ तोळ्यांचा हार विठूरायाला अर्पण
3

कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने एकनाथ शिंदेंची सपत्नीक शासकीय महापूजा; शिंदेंकडून तब्बल ‘इतक्या’ तोळ्यांचा हार विठूरायाला अर्पण

विठुरायाच्या नगरीत स्वच्छतेचा जागर; प्लास्टिकमुक्त वारीसाठी MPCB ची विशेष मोहीम; एकनाथ शिंदेंच्या हस्ते प्रचार बसचे उद्घाटन
4

विठुरायाच्या नगरीत स्वच्छतेचा जागर; प्लास्टिकमुक्त वारीसाठी MPCB ची विशेष मोहीम; एकनाथ शिंदेंच्या हस्ते प्रचार बसचे उद्घाटन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.