Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्र कायद्याचे राज्य, इथे गुन्हेगारांना अभय नाही, नसरापूर हत्या प्रकरणातल्या निकालावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा इशारा

नसरापूर बालिका बलात्कार व हत्या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले. महिलांच्या सुरक्षेसाठी सरकार कटिबद्ध असून गुन्हेगारांना कोणतेही अभय दिले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

  • By विवेक
Updated On: Jun 29, 2026 | 02:53 PM
महाराष्ट्र कायद्याचे राज्य, इथे गुन्हेगारांना अभय नाही, नसरापूर हत्या प्रकरणातल्या निकालावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा इशारा

महाराष्ट्र कायद्याचे राज्य, इथे गुन्हेगारांना अभय नाही, नसरापूर हत्या प्रकरणातल्या निकालावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा इशारा

Follow Us
Follow Us:

मुंबई : नसरापूर बालिका बलात्कार व हत्या प्रकरणात न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली. या निकालावर शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाधान व्यक्त केले. “न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा ठोठावल्याने महाराष्ट्र हे कायद्याचे राज्य आहे आणि इथे गुन्हेगारांना कोणतेही अभय नाही,” असा इशारा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला. विधीमंडळाच्या आवारात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

नसरापूर प्रकरणातील निकालावर उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, “या निकालाने न्याय मिळाला असून, महिलांवर आणि बालिकांवर अत्याचार करणाऱ्यांना स्पष्ट इशारा आहे. यापुढे कुणी असे घृणास्पद कृत्य करण्यास धजावणार नाही, असा हा कडक इशारा आहे. अशा नराधमांना समाजात किंवा कायद्याच्या राज्यात कोणतीही जागा नाही. त्यांना जगण्याचा अधिकारच नाही! महिला, मुली आणि लहान बालिकांविरुद्ध होणाऱ्या अत्याचारांविरोधात महायुती सरकारची भूमिका सदैव कठोर राहिली आहे,” असे ते म्हणाले.

जलद तपास आणि कठोर शिक्षेसाठी सरकार कटिबद्ध

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्य सरकारने महिलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. प्रत्येक मुलगी आणि महिला सुरक्षित वातावरणात जगावी, यासाठी सरकार सातत्याने प्रभावी उपाययोजना राबवत आहे. जलद तपास, फास्ट ट्रॅक न्यायालयीन प्रक्रिया आणि कठोर शिक्षा यांसाठी सरकार कटिबद्ध आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. नसरापूर प्रकरणात आज न्याय झाल्याची भावना सर्वांमध्ये निर्माण झाल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

Nasrapur Crime: ‘आता फासावर चढाव लागेल…’,न्यायाधीशांनी आरोपीला सुनावले, पुणे हादरवणाऱ्या नसरापूर प्रकरणात मोठा निकाल

महिलांच्या सुरक्षेबाबत सरकारची भूमिका स्पष्ट

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, “महायुती सरकार महिलांच्या आणि बालिकांच्या सुरक्षेबाबत शून्य सहनशीलतेचे धोरण अवलंबत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महिलांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असून, प्रत्येक महिला आणि मुलगी सुरक्षित वातावरणात जीवन जगू शकेल यासाठी सरकार विविध उपाययोजना राबवत आहे.”

‘आता फासावर चढाव लागेल…’,न्यायाधीशांनी आरोपीला सुनावले

नसरापूर प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला (वय ६५) मरेपर्यंत फाशीची शिक्षा न्यालयाने सुनावली आहे. आरोपीने भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिचा निर्दयीपणे हत्या केली. या प्रकरणावर आज कोर्टाकडून महत्वाचा निकाल देण्यात आला. न्यायालयाचा हा ऐतिहासिक निकाल ऐकताच न्यायालयात उपस्थित असलेल्या पीडितेच्या कुटुंबियांना अश्रू अनावर झाले. संपूर्ण राज्यात त्याला फाशी होणार कि जन्मठेप याकडे नजरा लागल्या होत्या. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयात खटला सुरु होता. २५ जून रोजी झालेल्या सुनावणीत आरोपीला दोषी ठरवण्यात आले होते. आता आज अखेर त्याला फाशी देण्यात आली असून अखेर चिमुकलीला न्याय मिळाला. निकाल वाचन झाल्यांनतर न्यायाधीशाने आरोपीला विटनेस बॉक्समध्ये उभं केलं आणि त्याला म्हंटल आता फासावर चढाव लागेल. अवघ्या ५५ दिवसात या प्रकरणाचा निकाल लागला. सर्वात जलदगतीने निकाल लागणारा हा राज्यातील पहिलाच खटला ठरला आहे.

Ketan Agrawal Case: लग्नाच्या खरेदीसाठी 1 कोटी घेतले; सियाने एवढ्या पैश्यांचा काय केलं?

Web Title: Eknath shinde on nasarapur murder case death sentence reaction

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2026 | 02:53 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Eknath Shinde
  • Nasrapur Case

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
1

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

‘मुंबई इन मिनिट्स’! ५९ मिनिटांचा प्रवास, ३५ लाख घरे अन् नव्या रोजगार केंद्रांचा आराखडा; उपमुख्यमंत्र्यांनी मांडली रूपरेषा
2

‘मुंबई इन मिनिट्स’! ५९ मिनिटांचा प्रवास, ३५ लाख घरे अन् नव्या रोजगार केंद्रांचा आराखडा; उपमुख्यमंत्र्यांनी मांडली रूपरेषा

Devendra Fadnavis On Maharashtra Drought: अनावश्यक खर्च टाळा, पाणी जपून वापरा’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आवाहन
3

Devendra Fadnavis On Maharashtra Drought: अनावश्यक खर्च टाळा, पाणी जपून वापरा’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आवाहन

Breaking News: मोठी बातमी! अखेर राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय
4

Breaking News: मोठी बातमी! अखेर राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.