न्यायालय म्हणाले ‘रिअरेस्ट ऑफ रेअर केस
पुणे जिल्हा सत्र न्यायालयात विशेष न्यायाधीश एस. आर. साळूंखे यांनी या प्रकरणाचा अंतिम निकाल वाचन करताना म्हटलं की, घटनेच्या वेळी आरोपी पीडितेसोबत होता. तो तिच्यासोबत का होता? याची समाधानकारक उत्तर देण्यात आरोपी अपयशी ठरला आहे. या प्रकरणी सगळे बिंदू जोडण्यात तपास यंत्रणांना यश आलेले आहे. आता हे प्रकरण रिअरेस्ट ऑफ रेअर प्रकरणात मोडत का? हा प्रश्न आहे. कट रचून शांत डोक्याने केलेली हत्या गुन्ह्याची गंभीरता दर्शवते आणि त्यात फाशीच्या शिक्षेची तरतुद असल्याच सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालांमध्ये याआधीच स्पष्ट केलं आहे. कट रचून हत्या करण्यात आली असेल आणि त्यात क्रूरता असेल तर त्यात फाशीच्या शिक्षेची तरतुद असल्याचंही न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
आरोपी विरोधात सबळ पुरावे
कट रचून हत्या करणे, बलात्कार या सगळ्याला फाशीच्या शिक्षेची तरतुद आहे. त्या घटनेने समाजावर दूरगामी परिणाम होणार असतील तर तसा आरोपी देखील फाशीच्या शिक्षेचा पात्र आहे, असंही निकाल वाचताना न्यायाधीशांनी म्हटलं आहे. शांत डोक्याने केलेली हत्या त्यातील क्रूरता तसेच त्या घटनेमुळे समाजाला बसलेला धक्का असे सगळे फाशीच्या शिक्षेसाठी पात्र असतात. याप्रकरणी आरोपी विरोधात सबळ पुरावे आहे. आरोपीचा गंभीर पूर्व इतिहास होता आणि टेस्ट या प्रकरणी सिद्ध होते. मुलीला टॉर्चर करण्यात आला आहे. मुलगी असहाय्य (helpless) होती. स्वतःची वासना (lust) पूर्ण करण्यासाठी ही आरोपीने हे कृत्य केलं आहे. याने समाजाला धक्का बसला आहे.
माफी देण्यालायक काहीही नाही…
आरोपीचा वयाच्या व्यतिरिक्त त्याला माफी देण्यालायक काहीही नाही. आरोपीने तीन वर्षांच्या मुलीसोबत अमानवी कृत्य केलं. त्याला भीती नव्हती. त्याचा पूर्व इतिहास होता, त्याची कल्पना होती की, त्याला काही होणार नाही म्हणून तो ही कृती करायला धजावला नाही. निर्भया प्रकरणानंतर बालकांचं लैंगिक अत्याचारापासून संरक्षणाचा कायदा करण्यात आला आहे. आरोपीने तीन वर्षांच्या मुलीसोबत कृत्य केलेलं, हे कृत्य अतिशय निर्दयी होतं आणि त्यामुळे समाज मनावर गंभीर आणि दूरगामी परिणाम झाले आहेत. या घटनेनंतर कुटुंबीयांचा कायद्यावरील विश्ववास उडाल्याची परिस्थिती होती, त्यांनी मुंबई बंगळूर हायवे रोखून धरला होता आणि आरोपीला त्यांच्या हवाली करण्याची मागणी केली एवढी ही गंभीर घटना आहे.
समाजामध्ये उमटलेल्या प्रक्रियेचा आम्ही आदर करतो, मात्र आम्हाला कायद्यानुसार चालायला हवं. अनेक प्रकरणामध्ये चुकीचा तपास होतो. कधी न्याय मिळण्यात होणारी दिरंगाई यामुळे समाजाच न्याय प्रक्रियेसंदर्भात चुकीचा समज होतो. याप्रकरणी १६ दिवसात आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं. उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर कोर्टाचा पूर्ण वेळ या प्रकरणाला देण्यात आला होता. १६ दिवसात खटला पूर्ण करण्यात आला. यादरम्यान ५५ साक्षीदार तपासण्यात आले. हे सगळ्या प्रकरणामध्ये झालं पाहिजे. मात्र ते एक स्वप्न असेल सगळ्या प्रकरणामध्ये ते शक्य नाही, असंही न्यायाधिशांनी निकाल वाचताना म्हटलं आहे.
त्याने चिमुकलीला जिवंत राहण्याचा कोणताच पर्याय दिला नाही
सादर केलेले पुरावे आरोपीनेच कृत्य केल्याचं सिद्ध करण्यासाठी पुरेसे आहेत. पीडित मुलगी अवघ्या तीन वर्षांची होती, पोस्टमार्टममध्ये तिच्या लैंगिक अत्याचार झाल्याचं स्पष्ट झालं आहे. आरोपी फाशीच्या शिक्षेचा पात्र आहे, असंही न्यायाधिशांनी म्हटलं आहे. सीसीटीव्ही (CCTV)मध्ये आरोपी चित्रित झाला आहे. त्याच कृत्य अमानुष आहे. हत्येनंतर देखील त्याने तिच्या लैंगिक अत्याचार केले. त्याने चिमुकलीला जिवंत राहण्याचा कोणताच पर्याय दिला नाही. तिच्यासोबत ओरल सेक्स करण्याचा प्रयत्न केला. त्याला फाशीची शिक्षा देखील पुरेशी नाही, असंही न्यायाधिशांनी म्हटलं आहे.
रिअरेस्ट ऑफ रेअर केस
याआधी ५३ वर्षांचा असताना देखील आरोपीने आपल्या कुटुंबातील एका मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हा ती मुलगी अल्पवयीन होती. एका म्हातारीवर देखील त्याने हल्ला केला आहे. तसेच त्याने आणखीनही एका महिलेवर शारीरिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला कोणताही पश्चात्ताप नाही, असंही न्यायाधिशांनी निकालाचं वाचन करताना म्हटलं आहे. आरोपीने सुधारण्याची पातळी ओलांडली आहे. ही केस एक रिअरेस्ट ऑफ रेअर केस (Rarest of the Rare) आहे. मुलीच्या अंगावरती १८ जखमा होत्या. तीची पॅंन्ट तिच्या तोंडात २१ सेंटिमर आत कोंबण्यात आली होती. मुलीने या दरम्यान अनेक वेदना सहन केल्या. जे काही मुलीच्या कुटुंबीयांनी सहन केलं असेल, याची कोर्टाला जाणीव आहे.
आरोपी फाशीच्या शिक्षेसाठी पात्र
याप्रकरणी पोलिसांनी उत्कृष्ट तपास केला, त्यासंदर्भात ते अभिमानासाठी पात्र आहेत. हे सगळ्यांसाठी एक उदाहरण आहे. तपासातील सगळे अभिनंदनासाठी पात्र आहेत. विशेष सरकारी वकील यांनी देखील या प्रकरणाचा सचोटीने पाठपुरावा केला आणि तात्काळ प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी त्यांनी देखील खूप मेहनत घेतली, असंही न्यायाधिशांनी म्हटलं आहे. याप्रकरणी डॉक्टर, सायबर एक्स्पर्ट, फॉरेन्सिक तज्ञांनी देखील वाखाणण्याजोगी जबाबदारी पार पाडली आणि हे एक टीम वर्कच काम आहे. आरोपी फाशीच्या शिक्षेसाठी पात्र आहे असंही न्यायाधिशांनी यावेळी म्हटलं आहे .बलात्कार आणि हत्ये प्रकरणी पॉक्सो प्रकरणी फाशी.
Ans: आरोपी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
Ans: CCTV फुटेज, DNA अहवाल, वैद्यकीय पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे दोष सिद्ध झाला.
Ans: हा खटला जलदगतीने पूर्ण झाल्यामुळे आणि क्रूर गुन्ह्यामुळे ‘रिअरेस्ट ऑफ रेअर’ प्रकरण म्हणून चर्चेत आला.






