काय केलं सियाने १ कोटी रुपयांचं?
सियाने हे १ कोटी रुपयांत स्वतःच्या लग्नासाठी न वापरता, तिचा प्रियकर चेतन चौधरी याला दिले. चेतन चौधरी हा आर्थिकदृष्ट्या कमकुवत पार्श्वभूमीचा होता. त्याने स्वतःचा व्यवसाय आणि करिअर स्थिर करण्यासाठी सियाकडे 3 वर्षांचा वेळ मागितला होता. त्यामुळे दोघांनी ठरवले होते की, केतनचा काटा काढल्यानंतर सिया संशय टाळण्यासाठी पुढील 3 वर्षे लग्न करणार नाही. एकदा का हे प्रकरण शांत झाले आणि चेतन आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला की, घरच्यांच्या संमतीने ते लग्न करणार होते.
सिया-चेतनने आधीच केली हत्येची रिहर्सल
हत्येच्या एक दिवस आधी सिया आणि चेतनने पुण्याच्या लुल्लानगरमधील एका कॅफेमध्ये बसून केतनचा काटा काढण्याची पूर्ण स्क्रिप्ट तयार केली होती. हत्या करण्याच्या पूर्वी दोघांनी लोहगड किल्ल्यावर येऊन हत्येसाठी योग्य जागेची निवड देखील केली होती. एवढेच नाही तर तिथे गुन्ह्याचा सराव म्हणजेच रिहर्सल देखील करण्यात आला होता. पोलीस आता त्या सराव केलेल्या जागेचा शोध घेत आहेत.
खाली पडतांना पकडू नये म्हणून…
१८ जूनला लोहगडावरून पोहोचल्यावर सियाने पाणी पिण्याच्या किंवा बुटाची लेस बांधण्याच्या बहाण्याने खाली बसून मागे चालणाऱ्या चेतन चौधरीला इशारा केला. पोलिसांच्या मते केतन दरीत कोसळत असतांना त्याने स्वतःला वाचवण्यासाठी सियाला पकडू नये म्हणून ती खाली बसली होती. सियाचा इशारा मिळताच चेतनने केतनला थेट ४०० फूट खोल दरीत ढकलून दिले.
सियाच्या मैत्रिणीला चौकशीसाठी बोलावले
सिया गोयल हिच्या अत्यंत जवळच्या दोन मैत्रिणींसह रेणू मित्तल, नरेंद्र मित्तल आणि त्यांचा मुलगा यश मित्तल यांना लोणावळा पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. सिया आपल्या मैत्रिणीसोबत वैयक्तिक आयुष्य आणि गुप्त गोष्टी शेअर करत होती. त्यामुळे या मैत्रणीच्या चौकशीतून हत्येच्या कटाचे आणखी काही खुलासे होण्याची शक्यता पोलिसांना आहे.
Ans: पोलिसांच्या तपासानुसार, आर्थिक फसवणूक आणि पूर्वनियोजित कटामुळे हत्या करण्यात आल्याचा दावा आहे.
Ans: लग्नाच्या तयारीच्या नावाखाली सुमारे 1 कोटी रुपये घेतल्याचे तपासात समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.
Ans: लोहगड किल्ल्यावर संकेत देऊन केतनला कड्यावरून ढकलण्याचा कट रचल्याचा पोलिसांचा दावा आहे.






