dcm eknath shinde jay Gujarat Announcement in pune Gujarat bhavan
Eknath Shinde ShivSena Melava Live: आज शिवसेनेचा 59 वा वर्धापन दिन सोहळा पार पडला. मुंबईच्या वरळी येथे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात हा सोहळा पार पडला. यावेळेस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांना संबोधित केले. आपल्या लाडक्या शिवसेनेचा 59 वा वर्धापन दिन आहे. हा मेळावा बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा आहे तर दुसरा सत्तेसाठी लाचार झाले त्यांचा आहे, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली.
सभेला संबोधित करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “खरी शिवसेना आज तुमच्यासमोर आहे. हिंदुत्वाचा भगवा तुमच्याकडे आहे. शिवसेनेचा धनुष्यबाण आणि जनतेचा आशीर्वाद आपलयाकडे आहे. हिंदुत्वाचा अंगार म्हणजे शिवसेना, मराठी माणसाचा बुलंद आवाज म्हणजे शिवसेना. शिवसेना म्हणजे शौर्य. शिवसेना म्हणजे स्वाभिमान आणि अभिमान आणि शिवसेना म्हणजे एकजूट होय. शिवसेना म्हणजे आपला प्राण.”
“2024 मध्ये आपण 80 पैकी 60 जागा जिंकल्या. तर उबाठाने 85 पैकी अवघ्या 20 जागा जिंकल्या. आपल्या पक्षाच्या एक तृतीयांश मते त्यांना मिळाली नाही. त्यांनी त्यांच्या जागा कॉँग्रेसच्या व्होट बँकेवर, कॉँग्रेसच्या मेहेरबानीवर जिंकल्या. जनतेने या निवडणुकीमध्ये बिन पाण्याची हजामत करून टाकली. आपलयाकडे आत्मविश्वास तर त्यांच्याकडे अहंकार आहे. अहकांरी लोकांचा फणा 2024 मध्ये जनतेने ठेचला आहे, ” असे शिंदे म्हणाले.
पुढे बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी कोणी केली हे जनतेला माहिती आहे. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा घात केला. हिंदुत्वाचा विश्वासघात केला. सरडा रंग बदलतो. मात्र इतक्या वेगाने रंग बदलणारा सरडा देखील या महाराष्ट्राने पाहीला. मुख्यमंत्रिपदासाठी झाले लाचार ते काय होणार बाळासाहेबांचे वारसदार. हिंदुत्वासाठी बाळासाहेबांनी मतदानाचा अधिकार गमावला.”
श्रीकांत शिंदेंचे ऑपरेशन सिंदूरवर टीका करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर
जगभरातील देशांना पाकिस्तानने केलेल्या भ्याड हल्याबद्दल आणि भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दिलेले सडेतोड प्रत्युत्तर याबाबत माहिती देण्याची जबाबदारी खासदार श्रीकांत शिंदे आणि अन्य सदस्यांची होती. याबाबत त्यांना प्रश्न विचारला असता, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले, “हे शिष्टमंडळ तयार झाले तेव्हा यामध्ये अनेक अनुभवी लोक होते. अनुभवी लोकांमध्ये एका तरुण चेहऱ्याला संधी देणे, त्यांना पुढे आणण्याचे काम पंतप्रधान मोदी यांनी केले आहे.”
तुम्ही जगभरात ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यासाठी गेले असता, तुम्हाला साधे कुणी भेटायला देखील आले नाही, अशी टीका भारतातील काही राजकारणी मंडळींनी केली. त्याबाबत प्रश्न विचारला असता, खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले, “इथे बसून कोणाला टीका करायची आहे त्यांनी ती टीका केलेली आहे. मात्र भारताला, 140 कोटी देशवासियांना जो संदेश जगाला द्यायचा होता, ते काम आम्ही केले आहे. जे लोक गल्लीमध्ये बसून बरळत आहेत त्यांना, बरळूद्या. आम्हाला जे काय करायचे होते ते आम्ही करून आलो आहे.”
“जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादी हल्ले बंद करणार नाही तोपर्यंत त्यांच्याशी कोणत्याही प्रकारची चर्चा होणार नाही. जर पाकिस्तानने पुन्हा भारतावर दहशतवादी हल्ले केले तर भारत असेच चोख प्रत्युत्तर देईल, हे आम्ही जगाला सांगितले आहे,” असे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले.