Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

करमाळा तालुक्यातील केतुर येथे वादळी वाऱ्याचा फटका; अंगावर भिंत कोसळून वयोवृद्ध दाम्पत्याचा मृत्यू

पती-पत्नी संध्याकाळी जेवण्यासाठी बसले असता अचानक वादळी वाऱ्याला सुरुवात झाली व सदरची भिंत त्यांच्या अंगावर पडली. परंतु, आजूबाजूला कोणाचीही वस्ती नसल्याने कोणालाही काहीच माहित नव्हते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 02, 2026 | 07:36 AM
करमाळा तालुक्यातील केतुर येथे वादळी वाऱ्याचा फटका; अंगावर भिंत कोसळून वयोवृद्ध दाम्पत्याचा मृत्यू

करमाळा तालुक्यातील केतुर येथे वादळी वाऱ्याचा फटका; अंगावर भिंत कोसळून वयोवृद्ध दाम्पत्याचा मृत्यू

Follow Us
Follow Us:

करमाळा : करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील केतुर नंबर एक येथे रविवारी (दि.31) रात्रीच्या सुमारास अचानक वादळी वारा आला. या वादळी वाऱ्याचा तडाखा एका वृद्ध दाम्पत्याला बसला. या वादळात घराची भिंत अंगावर कोसळून वृद्ध पती-पत्नीचा मृत्यू झाला.

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील केत्तूर,1 तसेच करमाळा तालुक्याच्या उजनी लाभक्षेत्रातील पोमलवाडी येथील वृद्ध दाम्पत्य उजनी जलाशया जवळील आपल्या वस्तीवर राहत होते. रविवार (ता.31) रोजी रात्री नऊ ते साडेनऊच्या दरम्यान अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने सिमेंट विटा एकावर एक रचून तयार केलेल्या भिंत अंगावर कोसळून जागीच दोघा नवले दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

मृत दाम्पत्याचे नाव जगन्नाथ मारुती नवले (वय 80) व त्यांच्या पत्नी शालन जगन्नाथ नवले (वय 75) असे आहे. हे पती-पत्नी संध्याकाळी जेवण्यासाठी बसले असता अचानक वादळी वाऱ्याला सुरुवात झाली व सदरची भिंत त्यांच्या अंगावर पडली. परंतु, आजूबाजूला कोणाचीही वस्ती नसल्याने कोणालाही काहीच माहित नव्हते. मात्र, त्यांच्या नातूने करमाळावरून फोन करून पाहिले असता आजोबाने फोन उचलला नाही. त्यामुळे तो सकाळी वस्तीवर आला असता त्याला सर्व प्रकार समजला. अचानक झालेल्या वादळी वाऱ्याच्या तडाख्याने नवले दाम्पत्याचा अचानकपणे मृत्यू झाल्याने केतुर तसेच परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

केळी पिकाचे मोठे नुकसान

उजनी लाभक्षेत्र परिसरातील पोमलवाडी, हिंगणी, गुलमोहरवाडी, केत्तूर, वाशिंबे परिसरात जोरदार वादळी वारे वाहत होते. या वाऱ्यात शेतकऱ्यांच्या शेकडो एकर केळी पिकाचे मोठे नुकसान झाले असून, संपूर्ण केळी जमीनदोस्त झाली आहे तर गावरान आंब्याची झाडे ही पूर्णपणे मोकळी झाली आहेत. अचानक झालेल्या वादळी वाऱ्याच्या तडाख्याने पश्चिम भागातील अनेक घराचे नुकसान झाले असून, फळबागाचे देखील लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

अवकाळी पावसाचा शेतीपिकांना फटका

अवकाळी पावसाचा मोठा फटका रब्बी पिके, फळबागा (जसे की आंबा, द्राक्ष) आणि भाजीपाल्याला बसला आहे. शेतात काढणीला आलेले गहू, हरभरा आणि कांदा भिजल्याने शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.

Ramakant Dayma : सिनेसृष्टीचा आणखीन एक दिग्गज चेहरा हरपला! ‘Chak De India’ फेम अभिनेत्याचं निधन, सिनेविश्व शोकाकुल

Web Title: Elderly couple dies after wall collapses on them in karmala solapur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2026 | 07:36 AM

Topics:  

  • Solapur News

संबंधित बातम्या

दिल्ली लाठीचार्जचे महाराष्ट्रात पडसाद; माढ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा संतप्त एल्गार
1

दिल्ली लाठीचार्जचे महाराष्ट्रात पडसाद; माढ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा संतप्त एल्गार

‘माऊली’च्या गजरात संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात जल्लोषात स्वागत
2

‘माऊली’च्या गजरात संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात जल्लोषात स्वागत

चार महिन्यांनंतर परिवहन समितीला मुहूर्त; २० जुलैला १२ सदस्यांची घोषणा, भाजपचे १०, एमआयएम व शिवसेनेला प्रत्येकी एक जागा
3

चार महिन्यांनंतर परिवहन समितीला मुहूर्त; २० जुलैला १२ सदस्यांची घोषणा, भाजपचे १०, एमआयएम व शिवसेनेला प्रत्येकी एक जागा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.