Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिल्ली लाठीचार्जचे महाराष्ट्रात पडसाद; माढ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा संतप्त एल्गार

"लोकशाहीत प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्तर देण्याऐवजी त्यांच्यावर लाठ्या चालवल्या जात असतील, तर तो केवळ विद्यार्थ्यांवरील हल्ला नसून लोकशाहीच्या मूल्यांवर झालेला प्रहार आहे," अशी तीव्र भूमिका मांडली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 21, 2026 | 07:27 AM
दिल्ली लाठीचार्जचे महाराष्ट्रात पडसाद; माढ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा संतप्त एल्गार

दिल्ली लाठीचार्जचे महाराष्ट्रात पडसाद; माढ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा संतप्त एल्गार

Follow Us
Follow Us:

कुर्डुवाडी / हर्षल बागल : दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सुरू असलेल्या आंदोलनावर झालेल्या लाठीचार्ज आणि अश्रुधूराच्या माऱ्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटू लागले असून, त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने सोमवारी माढा येथे संतप्त आंदोलन करण्यात आले. विद्यार्थ्यांवरील कारवाईचा तीव्र निषेध नोंदवत प्रशासनामार्फत केंद्र सरकारला निवेदन सादर करण्यात आले.

यावेळी आंदोलनकर्त्यांनी, “लोकशाहीत प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्तर देण्याऐवजी त्यांच्यावर लाठ्या चालवल्या जात असतील, तर तो केवळ विद्यार्थ्यांवरील हल्ला नसून लोकशाहीच्या मूल्यांवर झालेला प्रहार आहे,” अशी तीव्र भूमिका मांडली. विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे दुर्लक्ष करून दडपशाहीचा मार्ग स्वीकारणे ही लोकशाहीला न शोभणारी बाब असल्याचेही त्यांनी नमूद केले. या संपूर्ण घटनेची निष्पक्ष चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करावी, तसेच विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.

CJP Protest : जंतर-मंतरवरील आंदोलन म्हणजे राजकीय कटकारस्थान, काँग्रेसकडून विद्यार्थ्यांचा वापर; शिंदे नेत्यांचा घणाघाती आरोप

या आंदोलनात तालुकाध्यक्ष ॲड. बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सौदागर जाधव, माढा शहराध्यक्ष राजकुमार पालकर, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील घाटणेकर, राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष पल्लवी पाटील, विनोद गोटे, भारत खंडागळे, विशाल कामगे, विराज जाधव, वैभव गोरे, बाबासाहेब मोहोळ, दत्तात्रय सावंत, आदित्य हनवते, अक्षय शिंदे, नंदेश कदम, सत्यवान लटके, दयानंद जाधव यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तर द्या; लाठ्या नव्हे !

याच घोषणांनी आंदोलन परिसर दणाणून गेला. विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. यावेळी सरकार देशात शिक्षण व्यवस्था संपवत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचा गैरवापर

दुसरीकडे, शिवसेनेचे प्रवक्ते संजय निरुपम यांनी संसदेचे पावसाळी अधिवेशन, जंतर मंतर येथील आंदोलन आणि अयोध्या राम मंदिरातील नैवेद्य चोरी प्रकरणावरून विरोधी पक्षांवर निशाणा साधला. ते म्हणाले की, सार्वजनिक मुद्द्यांवर आवाज उठवणे हा लोकशाहीचा भाग आहे, परंतु आता काही पक्ष स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचा गैरवापर करत आहेत.

Web Title: Repercussions of the delhi lathi charge felt in maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2026 | 07:27 AM

Topics:  

  • CJP Protest
  • Solapur News

संबंधित बातम्या

Purva Kaushik : तरुणांचे आंदोलन पाहून अभिनेत्रीला अश्रू अनावर! ढसाढसा रडत म्हणाली “लोकशाही असलेल्या…”
1

Purva Kaushik : तरुणांचे आंदोलन पाहून अभिनेत्रीला अश्रू अनावर! ढसाढसा रडत म्हणाली “लोकशाही असलेल्या…”

“जालियनवाला बागची आठवण झाली”; विद्यार्थी लाठीचार्जनंतर संसद परिसरात चंद्रशेखर आझाद यांचे धरणे आंदोलन
2

“जालियनवाला बागची आठवण झाली”; विद्यार्थी लाठीचार्जनंतर संसद परिसरात चंद्रशेखर आझाद यांचे धरणे आंदोलन

Rahul Gandhi: राजधानी तापली! पंतप्रधान निवासाबाहेर ३ तास ठिय्या मांडणारे राहुल गांधी अन् अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात
3

Rahul Gandhi: राजधानी तापली! पंतप्रधान निवासाबाहेर ३ तास ठिय्या मांडणारे राहुल गांधी अन् अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात

Chhatrapati Sambhajinagar Protest: दिल्लीतील लाठीमाराचे पडसाद! छत्रपती संभाजीनगर पेटले; एकाच दिवशी ५ ठिकाणी तीव्र आंदोलने
4

Chhatrapati Sambhajinagar Protest: दिल्लीतील लाठीमाराचे पडसाद! छत्रपती संभाजीनगर पेटले; एकाच दिवशी ५ ठिकाणी तीव्र आंदोलने

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.