Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चार महिन्यांनंतर परिवहन समितीला मुहूर्त; २० जुलैला १२ सदस्यांची घोषणा, भाजपचे १०, एमआयएम व शिवसेनेला प्रत्येकी एक जागा

सोलापूर महापालिकेच्या परिवहन समितीच्या सदस्य निवडीला चार महिन्यांनंतर अखेर मुहूर्त मिळाला आहे. २० जुलैच्या सभेत १२ सदस्यांची घोषणा होण्याची शक्यता असून, ई-बस सेवा सुरू करण्याच्या तयारीला यामुळे वेग मिळणार आहे.

  • By विवेक
Updated On: Jul 17, 2026 | 08:49 PM
चार महिन्यांनंतर परिवहन समितीला मुहूर्त; २० जुलैला १२ सदस्यांची घोषणा, भाजपचे १०, एमआयएम व शिवसेनेला प्रत्येकी एक जागा

चार महिन्यांनंतर परिवहन समितीला मुहूर्त; २० जुलैला १२ सदस्यांची घोषणा, भाजपचे १०, एमआयएम व शिवसेनेला प्रत्येकी एक जागा

Follow Us
Follow Us:

सोलापूर : सोलापूर महापालिकेच्या परिवहन समितीच्या सदस्य निवडीला तब्बल चार महिन्यांनंतर अखेर मुहूर्त मिळाला असून, २० जुलै रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत १२ सदस्यांच्या नावांची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. केंद्र शासनाच्या निधीतून १५ ऑगस्टपर्यंत शहरात नवीन ई-बस दाखल होणार असल्याने परिवहन विभाग सक्षम करण्यासाठी सत्ताधारी भाजपने ही प्रक्रिया गतीने पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे.

महापालिकेतील संख्याबळानुसार परिवहन समितीवर एकूण १२ सदस्यांची निवड होणार आहे. त्यामध्ये भाजपचे १०, एमआयएमचा एक आणि शिवसेनेचा एक सदस्य असे पक्षनिहाय प्रतिनिधित्व राहणार आहे. भाजपमध्ये १० जागांसाठी तब्बल २० इच्छुकांची नावे अंतिम यादीसाठी प्रदेश नेतृत्वाकडे पाठविण्यात आली आहेत. प्रदेश स्तरावरून अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर सर्वसाधारण सभेत सदस्यांची घोषणा केली जाणार आहे.

परिवहन समितीच्या निवडीचा विषय फेब्रुवारी महिन्यातील सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यावर होता. मात्र, स्वीकृत नगरसेवकांच्या एका जागेवरून निर्माण झालेल्या वादामुळे परिवहन समितीच्या निवडीही रखडल्या होत्या. अखेर चार महिन्यांनंतर हा तिढा सुटत असून समितीला नवे नेतृत्व मिळणार आहे.

Solapur News : संत निवृत्तीनाथ महाराजांच्या माऊलींचा पालखी सोहळा आज जिल्ह्यात! जिल्हा प्रशासन सज्ज; वारकऱ्यांसाठी विविध सोयीसुविधा

दरम्यान, शिवसेनेकडून परिवहन समितीसाठी राजन जाधव यांच्या नावाची जोरदार चर्चा असून त्यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे. एमआयएम आणि भाजपमधील संभाव्य सदस्यांच्या नावांवर अद्याप पक्षांतर्गत चर्चा सुरू आहे.

नवीन ई-बस सेवेसाठी महापालिकेने आवश्यक तयारीही अंतिम टप्प्यात आणली आहे. बस चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले असून बस शेडचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. शहर व ग्रामीण भागातील बसमार्ग निश्चित करण्यात आले असून बस पुरवठा करणाऱ्या कंपनीशी करार प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. त्यामुळे ई-बस सेवा सुरू करण्यापूर्वी परिवहन समिती अस्तित्वात आणण्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.

Satara News: स्वच्छ भारत अभियानातून साताऱ्याला ‘हायड्रो जेटिंग’ मशीन प्राप्त; गटारे व सांडपाणी वाहिन्यांची आता यांत्रिक स्वच्छता

परिवहन व्यवस्थेच्या आधुनिकीकरणाच्या दृष्टीने ही समिती महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार असून, ई-बस सेवा, मार्ग नियोजन, पायाभूत सुविधा आणि प्रशासनिक निर्णयांमध्ये नव्या समितीची जबाबदारी निर्णायक ठरणार आहे.

यावेळी सभागृह नेते नरेंद्र काळे यावेळी म्हणाले, “फेब्रुवारी तहकुब सभा २० जुलै रोजी काढली आहे. परिवारांच्या सदस्यांच्या निवडीची प्रक्रिया या बोर्डामध्ये घेतली जाणार आहे. विजन इच्छुक आहेत यादी प्रदेशाकडे पाठवली आहे.”

Web Title: Solapur transport committee members announcement e bus service

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2026 | 08:49 PM

Topics:  

  • Solapur
  • Solapur Municipal Corporation
  • Solapur News

संबंधित बातम्या

Solapur News :१,४८३ कोटींच्या जलआराखड्याला ब्रेक; ८५० कोटींची योजना १४८३ कोटींवर कशी, मुख्य सचिवांचा सवाल
1

Solapur News :१,४८३ कोटींच्या जलआराखड्याला ब्रेक; ८५० कोटींची योजना १४८३ कोटींवर कशी, मुख्य सचिवांचा सवाल

Solapur News : बार्शीत रंगणार युवा महोत्सवाचा जल्लोष; ९ रंगमंचांवर ३९ कलांचा अविष्कार!
2

Solapur News : बार्शीत रंगणार युवा महोत्सवाचा जल्लोष; ९ रंगमंचांवर ३९ कलांचा अविष्कार!

Solapur News: ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा अनोखा एल्गार; झाडावर चढून अर्धनग्न आंदोलन, अडीच कोटींची थकबाकी
3

Solapur News: ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा अनोखा एल्गार; झाडावर चढून अर्धनग्न आंदोलन, अडीच कोटींची थकबाकी

Solapur-Mumbai Air Service Suspended Again: सोलापूर-मुंबई विमानसेवेला पुन्हा ‘ब्रेक’! Star Airचा मोठा निर्णय; नेमकं कारण काय?
4

Solapur-Mumbai Air Service Suspended Again: सोलापूर-मुंबई विमानसेवेला पुन्हा ‘ब्रेक’! Star Airचा मोठा निर्णय; नेमकं कारण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.