Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘माऊली’च्या गजरात संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात जल्लोषात स्वागत

त्र्यंबकेश्वरहून निघालेली संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी सोलापूर जिल्ह्यात दाखल झाली. रावगाव येथे लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत ढोल-ताशे, पुष्पवृष्टी आणि 'माऊली'च्या जयघोषात पालखीचे भव्य स्वागत करण्यात आले. प्रशासनाने वारकऱ्यांसाठी आरोग्य, सुरक्षा आणि विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या.

  • By विवेक
Updated On: Jul 19, 2026 | 10:00 PM
'माऊली'च्या गजरात संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात जल्लोषात स्वागत

'माऊली'च्या गजरात संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात जल्लोषात स्वागत

Follow Us
Follow Us:

प्रतिनिधी l करमाळा : नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथून २० दिवसांमध्ये सुमारे ३०० किलोमीटरचा पायी प्रवास करत संत ज्ञानेश्वर महाराजांचे थोरले बंधू संतश्रेष्ठ श्री संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी शनिवारी एक लाखांहून अधिक वारकऱ्यांसह सोलापूर जिल्ह्यात दाखल झाली. जिल्ह्याच्या सीमेवरील करमाळा तालुक्यातील रावगाव येथे पालखीचे अत्यंत भक्तिमय वातावरणात जल्लोषात स्वागत करण्यात आले.

अहिल्यानगर जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश होताच रांगोळीच्या पायघड्या, ढोल-ताशांचा गजर, हलगी-लेझीमचा निनाद, फटाक्यांची आतषबाजी, चार उंट आणि दोन जेसीबीच्या साहाय्याने करण्यात आलेली पुष्पवृष्टी यामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. सोलापूर जिल्हा प्रशासन, करमाळा तालुका प्रशासन आणि रावगाव ग्रामपंचायतीच्या वतीने पालखीचे उत्साहात स्वागत करण्यात आले.

‘माऊली… माऊली…’ आणि विठ्ठल नामाच्या अखंड गजरात हजारो भाविकांनी संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले. रावगावसह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने स्वागतासाठी उपस्थित होते. पालखीचे आगमन होताच संपूर्ण परिसरात भक्ती, उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले. यंदाच्या पालखी सोहळ्यात ६१ दिंड्या सहभागी असून एक लाखांहून अधिक वारकरी पायी वारी करत आहेत. पालखीच्या रथासोबत चार अश्व आणि दोन बैलजोड्या आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर व्हीआयपी दर्शन बंद; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही नियम पाळत घेतले केवळ मुखदर्शन

यावेळी संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थान, त्र्यंबकेश्वरचे अध्यक्ष राहुल महाराज साळुंखे, पालखी प्रमुख माधव महाराज राठी, पालखी चालक नवनाथ महाराज गांगुर्डे, श्रीपाद महाराज कुलकर्णी, बेलापूरकर महाराज, माजी अध्यक्षा कांचनताई जगताप आणि जयंत महाराज गोसावी यांचाही जिल्हा प्रशासन, तालुका प्रशासन व रावगाव ग्रामपंचायत यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

पालखीच्या स्वागत सोहळ्यास प्रांताधिकारी जयश्री आव्हाड, उपविभागीय अधिकारी अंजना कृष्णा, तहसीलदार शिल्पा ठोकडे, पोलीस निरीक्षक रणजीत माने, गटविकास अधिकारी डॉ. अमित कदम, मनोज राऊत तसेच रावगावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वारकऱ्यांसाठी प्रशासनाची चोख व्यवस्था

  • आरोग्य विभागाकडून मोफत आरोग्य तपासणीसह ईसीजी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.
  •  वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले.
  • पोलीस, आरोग्य विभाग आणि महावितरण यांच्यात समन्वय राहावा यासाठी स्वतंत्र आपत्कालीन कक्ष सुरू करण्यात आला.
  • ग्रामपंचायतीकडून मोफत मसाज सेवा, चप्पल दुरुस्ती, कपड्यांची इस्त्री, मोबाईल चार्जिंग, तसेच महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र स्नानगृह आणि स्वच्छतागृह उभारण्यात आले.
Maharashtra News: ‘भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची’ आषाढी वारीतील ३.८३ लाखांहून अधिक वारकऱ्यांना आरोग्य सेवा

वारकऱ्यांची सेवा करण्याचे भाग्य लाभते

यावेळी रावगाव येथील ग्रामस्थ दत्तात्रय बरडे म्हणाले, “महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या दिंड्यांपैकी तिसऱ्या क्रमांकाची मोठी दिंडी आमच्या रावगावातून जात असल्याने गावात आनंदाचे वातावरण असते. विठू माऊलीच्या गजरात संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीची मिरवणूक निघते, तेव्हा मन भारावून जाते. याच वेळी वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळणे हे आमच्यासाठी खरे भाग्य आहे.”

Web Title: Sant nivruttinath maharaj palkhi solapur raogav welcome ashadhi wari

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2026 | 10:00 PM

Topics:  

  • pandharpur
  • Solapur
  • Solapur News
  • vitthal mandir

संबंधित बातम्या

Solapur News: सोलापूर जिल्ह्यात पावसाची प्रतीक्षा कायम; खरीप पिके संकटात, रब्बीच्या पेरणीवरही टांगती तलवार
1

Solapur News: सोलापूर जिल्ह्यात पावसाची प्रतीक्षा कायम; खरीप पिके संकटात, रब्बीच्या पेरणीवरही टांगती तलवार

Solapur : विद्यार्थ्यांनी घेतला पिठलं-भाकरीचा आंनद! पालकांच्या मार्गदर्शनाने उपक्रमाला उधाण
2

Solapur : विद्यार्थ्यांनी घेतला पिठलं-भाकरीचा आंनद! पालकांच्या मार्गदर्शनाने उपक्रमाला उधाण

प्रभारी शिक्षणाधिकारी प्रशांत आरबाळे अडचणीत? मुख्याध्यापक महांतेश्वर कट्टीमनी यांच्या तक्रारीची शिक्षणाधिकाऱ्यांकडून दखल
3

प्रभारी शिक्षणाधिकारी प्रशांत आरबाळे अडचणीत? मुख्याध्यापक महांतेश्वर कट्टीमनी यांच्या तक्रारीची शिक्षणाधिकाऱ्यांकडून दखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.