श्रीगोंदा: राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टीच्या (NCP) श्रीगोंदा शहराध्यक्षपदी श्रीगोंदा येथील शुभम खेडकर यांची निवड करणयात आली, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश 0उपाध्यक्ष घन:शाम शेलार, माजी आमदार राहुल जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हरिदास शिर्के, शहराध्यक्ष भाऊसाहेब खेतमाळीस व विद्यार्थी तालुकाध्यक्ष विजय खेतमाळीस यांनी एकमताने खेडकर यांची शहराध्यक्षपदी शिफारस केली.
काल राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ओंकार गुंड यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले. खेडकर यांचा श्रीगोंदा शहरातील विद्यार्थी व युवकांचा संपर्क व संघटन पाहून तसेच चळवळीतील कार्यकर्ता व आक्रमकपणा लक्षात घेऊन श्रीगोंदा शहरात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या शाखा तयार करणे, कार्यकर्ते जोडणे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या शाखा तयार करणे, सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविणे व शहरातील विद्यार्थ्यांच्या विकासाच्या प्रश्नांवर काम करण्याची महत्त्वाची जबाबदारी घन:शाम शेलार व राहुल जगताप यांनी दिली आहे, खेडकर यांच्या निवडीबद्दल त्यांचे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे, जिल्हाध्यक्ष ओंकार गुंड, प्रदेशउपाध्यक्ष घन:शाम शेलार, माजी आमदार राहुल जगताप, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हरिदास शिर्के, युवक तालुकाध्यक्ष ऋषिकेश गायकवाड, नगरसेवक राजा लोखंडे, शहराध्यक्ष भाऊसाहेब खेतमाळीस, विद्यार्थी तालुकाध्यक्ष विजय खेतमाळीस आदींनी अभिनंदन केले.