Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: इलेक्ट्रिक बससेवेच्या फेऱ्यात वाढ; पण सवलत मिळेना, एसटी महामंडळाचे दुर्लक्ष

वायू प्रदूषण कमी करण्यासाठी वीजेवर चालणाऱ्या ई-एसटी गाड्याची संख्या वाढत आहे. मात्र, या बसेसमध्ये सवलत धारकांना सवलत दिली जात नाही.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 05, 2026 | 09:16 PM
इलेक्ट्रिक बससेवेच्या फेऱ्यात वाढ; पण सवलत मिळेना, एसटी महामंडळाचे दुर्लक्ष

इलेक्ट्रिक बससेवेच्या फेऱ्यात वाढ; पण सवलत मिळेना, एसटी महामंडळाचे दुर्लक्ष

Follow Us
Follow Us:

सुनील गजें/ नेवासे: इंधनावर होणारा खर्च टाळण्यासाठी आणि प्रदुषन कमी करण्यासाठी आता वीजेवर चालणाऱ्या ई-एसटी गाड्याची संख्या वाढत आहे. त्याच पाश्वभूमीवर शहरी भागासह ग्रामीण भागातही वीजेवरील चालणाऱ्या एसटी गाड्याच्या फेऱ्या वाढल्या आहेत. मात्र या गाड्यात सवलत धारकांना सवलत दिली जात नाही. त्यामुळे अंध, दिव्यांगासह सवलत धारकांची कुचबंना होत आहे. सवलतधारकांना सवलत देण्याची लोकांतून सातत्याने मागणी करुनही महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून सवलत देण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येत आहे. राज्यात प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी कडून

अलिकडच्या काळात ई-बसची संख्या वाढवली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्यातील बहुतांश भागात सध्या शिवाई ई-बस ची संख्या बऱ्यापैकी वाढत असल्याने शहरासह ग्रामीण भागातही या बसच्या फेऱ्या वाढल्या आहेत. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या लालपरी व अन्य साध्या, आराम, निमआराम गाड्यात अशा सर्व प्रकारच्या बसगाड्यात विविध सामाजिक घटकांना सुमारे ३० ते ३२ प्रकारच्या प्रवासी भाडे सवलती मिळतात. यामध्ये प्रामुख्याने महिला व ज्येष्ठ नागरीकां (६५ वर्षावरील) ५० टक्के तर ७५ वर्षावरील सर्व ज्येष्ठांना मोफत प्रवासाची सवलत आहे.

Ahilyanagar News: खासदार लंके यांचा “वेट अँड वॉच” इशारा; राहुरी पोटनिवडणुकीत मविआच्या भूमिकेकडे लक्ष

विविध सवलतींचा उडाला फज्जा

याशिवाय दिव्यांग, विद्यार्थी, क्षय रोगी, कर्क रोगी, कुष्ठ रोगी, राज्य शासनाने पुरस्कृत केलेल्या खेळांमध्ये भाग घेतलेल्या विजेते स्पर्धक, विद्यार्थी जेवणाचे डबे, अर्जुन, द्रोणाचार्य, दादोजी कोंडदेव व शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू, पंढरपूर आषाढी कार्तिकी एकादशीला शासकीय पुजेचे मान मिळालेले वारकरी दाम्पत्य, रेसक्यू होममधील मुलांना वर्षातून एकदा सहल, मुंबई पुनर्वसन केंद्रातील मानसिक दृष्ट्या अपंग विद्दयार्थ्यांच्या सहलीसाठी, शैक्षणिक खेळ आदींना एसटीत वेगवेगळ्या प्रकारे प्रवास सवलत आहे.

ई-गाडीला मोठे ओझे नेता येत नाही

इ-गाडीच्या फेऱ्या अधिक आहेत. मात्र या गाडीत प्रवास करताना नागरिकांना लालपरी गाड्यासारखे मोठे ओझे नेता येत नाहीत. त्याचा परिणाम ग्रामीण भागातील शेतकरी, कामगारावर होताना दिसत आहे. ई-बसच्या फेऱ्या वाढल्या, त्या महामंडळाचे अधिकारी लोकांना वाढलेल्या फेऱ्याची माहिती देत असले तरी मात्र सवलत नसल्याने बसस्थानकावर सवलतधारकांनी ताटकळत बसावे लागत आहे.

हिमंत बिस्वा सरमा देशातील सर्वात भ्रष्टाचारी मुख्यमंत्री; आसाममधून राहुल गांधींचा आक्रमक पवित्रा

वेगवेगळ्या योजनांमध्ये वर्षभर सवलतीत प्रवास

विद्यमान विधानमंडळ सदस्य व त्यांचे एक साथीदार, स्वातंत्र सैनिक व त्याचे एक साथीदार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त व्यक्ती व एक साथीदार, आदिवासी पुरस्कार प्राप्त व्यक्ती व त्यांचे एक साथीदार, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे पुरस्कार्थी व त्यांचे साथीदार, अपंग गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त व्यक्ति व त्यांचे एक साथीदार, शासन अधिस्वीकृतीधारक पत्रकार, अहिल्याबाई होळकर योजनेप्रमाणे ५ वी ते १२ वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण भागातील विद्दयार्थीनी, सिकलसेल रुग्ण, हिमोफेलिया रुग्ण, दुर्धर आजार रुग्ण, डायलेसिस रुग्ण, राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्राप्त व्यक्ती, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजना यांना वर्षभर मोफत प्रवास सवलत आहे.

Web Title: Electric bus trips increase ahilyanagar no fare concession st department issue

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2026 | 09:16 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • MSRTC Bus

संबंधित बातम्या

Ahilyanagar Crime News : आधी दुकानदाराला बेदम मारहाण, मग थेट पोलिसांनाच दमदाटी!
1

Ahilyanagar Crime News : आधी दुकानदाराला बेदम मारहाण, मग थेट पोलिसांनाच दमदाटी!

Ahilyanagar News: भीमा नदीला महापूर; श्रीगोंद्यातील आर्वी बेटाचा संपर्क तुटला, 200 ग्रामस्थ अडकले
2

Ahilyanagar News: भीमा नदीला महापूर; श्रीगोंद्यातील आर्वी बेटाचा संपर्क तुटला, 200 ग्रामस्थ अडकले

Ahilyanagar News : विजेच्या खांबाला हात लागल्याने साडेतीन वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू!
3

Ahilyanagar News : विजेच्या खांबाला हात लागल्याने साडेतीन वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू!

Shevgaon News : शेवगावातील गुटखा कारवाईवर संशय; ५६ हजारांचा मुद्देमाल दाखवून लाखोंचा साठा लपवल्याची चर्चा
4

Shevgaon News : शेवगावातील गुटखा कारवाईवर संशय; ५६ हजारांचा मुद्देमाल दाखवून लाखोंचा साठा लपवल्याची चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.