खासदार लंके यांचा “वेट अँड वॉच” इशारा; राहुरी पोटनिवडणुकीत मविआच्या भूमिकेकडे लक्ष
राहुरी विधानसभा मतदारसंघातून माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याबाबत आणि त्यांच्या पक्षाबाबत अजूनही तळ्यात मळ्यात आहेत. समर्थक मात्र ते निवडणूक रिंगणात नक्की असतील, असा दावा करत आहेत, असे असले तरी ते पक्षा चिन्हाऐवजी अपक्ष म्हणून शड्डू ठोकणार असल्याचे बोलले जाते. जर तनपुरे अपक्ष लढले, तर त्यामागे स्थानिक समीकरणे, जुळवण्याची रणनीती असू शकते. मात्र त्यांची ही भूमिका महाविकास आघाडी मान्य करेल का, हे पाहणे महत्वाचे ठरेल.
हे देखील वाचा : हिमंत बिस्वा सरमा देशातील सर्वात भ्रष्टाचारी मुख्यमंत्री; आसाममधून राहुल गांधींचा आक्रमक पवित्रा
सध्या तरी आमची भूमिका “वेट अँड वॉच” अशीच आहे. लंके यांची भूमिका गौधळात टाकणारी आहे. खासदार लंके यांच्या विधानामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. खासदार लंके हे शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात. त्यांच्या ववक्तव्यामागे एखादा ‘राजकीय भूकंप’ तर दडलेला नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. राजकारणात वेळ आणि काळ खूप महत्वाचा असतो. सध्या आम्ही परिस्थितीचा आढावा घेत आहोत, योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल, असे विधान त्यांनी केले होते.
उट्टे काढण्याची संधी आणि भावनिक लढाई अशी अवस्था आहे. विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूक आणि नंतर नगरपालिका, महापालिका या निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीचा सुपडासाफ केला होता. त्याचा वचपा काढण्यासाठी माविआसाठी ही संधी आहे, तर भावनिक आणि राजकीय दृष्ट्या महायुतीसाठी ही अस्तित्वाची लढाई आहे. प्राजक्त तनपुरे याची भूमिका आणि शरद पवार गटाचा अंतिम निर्णय यावरच राहुरीच्या निकालांचे भवितव्य अवलंबून असेल.
तनपुरे यांनी अद्याप आपली अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही, परंतु राजकीय वर्तुळात त्यांच्या अपक्ष उमेदवारीची चर्चा सुरू झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. राजकारणात वेळ आणि काळ महत्वाचा… आज अहिल्यानगरमध्ये जिल्हा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी बैठक पार पडली. या बैठकीत आगामी निवडणुकीच्या रणनीतीवर खल झाला. बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना खासदार निलेश लंके म्हणाले, राजकारणात वेळ आणि काळ खूप महत्त्वाचा असतो. सध्या आम्ही परिस्थितीचा आढावा घेत आहोत. योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल.






