Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

AI in Farming : बारामतीच्या AI प्रयोगाची जगाकडून दखल; इलॉन मस्क यांच्याकडूनही कौतुक

जगभरात सध्या AI तत्रज्ञानाचा बोलबाला आहे. रोबोटपासून ते शेतपर्यंत याचा वापर केला जात आहे. दरम्यान बारामतीच्या शेतीतील AI प्रयोगाची जगभारत चर्चा होत आहे. कृषी विकास ट्रस्टच्या शेतीसाठी याचा वापर करण्यात आला आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Feb 25, 2025 | 09:12 PM
बारामतीच्या AI प्रयोगाची जगाकडून दखल; इलॉन मस्क यांच्याकडूनही कौतुक

बारामतीच्या AI प्रयोगाची जगाकडून दखल; इलॉन मस्क यांच्याकडूनही कौतुक

Follow Us
Close
Follow Us:

जगभरात सध्या AI तत्रज्ञानाचा बोलबाला आहे. रोबोटपासून ते शेतपर्यंत याचा वापर केला जात आहे. दरम्यान बारामतीच्या शेतीतील AI प्रयोगाची जगभारत चर्चा होत आहे. बारामतीच्या कृषी विकास ट्रस्टच्या शेतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यात आला आहे. बारामतीमधील कृषी बारामतीमधील शेतातील एआय प्रयोगाची मायक्रोसॉफ्टचे चेअरमन आणि सीईओ सत्या नडेला यांच्यानंतर टेस्टाचे मालक इलॉन मस्क यांनीही कौतुक केलं आहे.

सत्या नडेला म्हणाले, ‘बारामतीत लहान शेतकरी कृत्रिम बुद्धीमत्तेचा प्रभावी वापर करून शेतीमध्ये करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे शेतातील केमिकलचं प्रमाण कमी होत आहे. त्याचबरोबर पाण्याचा वापर देखील कमी होऊ लागला आहे’.

‘कृत्रिम बुद्धिमतेचा वापर वाढल्याने उत्पन्न देखील वाढू लागले आहे. शेतकरी त्यांच्या भाषेत प्रश्न विचारून त्याचं उत्तर कृत्रिम बुद्धितद्वारे मिळवत आहेत, असेही नडेला म्हणाले. सत्य नडेला यांच्या पोस्टवर इलॉन मस्क यांनी प्रतिक्रिया दिली. मी आणखी या तंत्रज्ञानात सुधारणा करणार असल्याचं इलॉन मस्क यांनी म्हटलं आहे.

बारामतीमधील कृषी विकास ट्रस्टची स्थापना ही शरद पवार आणि त्यांचे मोठे बंधू अप्पासाहेब पवार यांनी १९६८ साली केली होती. या संस्थेचा मुख्य उद्देश कृषी आणि शैक्षणिक विकास घडवण्याचा आहे. कृषी विकास ट्रस्टच्या सुरुवातीला उपक्रमांमध्ये पुण्यातील बारामतीत दुष्काळग्रस्त भागात पाण्याच्या गरजा भागवण्यासाठी पाझर तलावांचे बांधकाम केलं होतं. या ट्रस्टद्वारे पिण्याच्या पाण्यासोबत शेतीसाठीही पाण्याचा पुरवठा होऊ लागला. ही संस्था आता नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी मदत करत आहे.

”इलॉन मस्क यांनी बारामतीतील या प्रकल्पाची दखल घेतली आहे. ही बाब या प्रकल्पाचं मोठं यश आहे. कृत्रीम बुद्धीमत्तेचा प्रभावी वापर कृषी क्षेत्रात झालाय. कृत्रीम बुद्धीमत्तेचे सकारात्मक परिणाम जगभरातील कृषी क्षेत्रावर होतील, याची कल्पना मस्क यांना आहे. त्यामुळे त्यांनी प्रकल्पाची स्वत:हून दखल घेतली आहे.

‘बारामतीतील प्रकल्पाला जागतिक मान्यताही मिळू लागली आहे. हे याचं यश आहे. ज्येष्ठ नेते शरद पवारांनी सातत्याने प्रशिक्षण आणि संशोधनासाठी प्रोत्साहन दिल्यामुळे ही बाब शक्य झाली आहे. प्रकल्पाचे महत्व हळुहळू सर्वांना समजू लागलं आहे, अँग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे विश्वस्त प्रतापराव पवार यांनी सांगितले.

‘आर्टिफिशियल इंटेलिजेन्सच्या माध्यमातून कमी खर्चात अधिक उत्पादन देणारी शेती शक्य आहे. ही बाब ऊसाच्या माध्यमातून अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टने सिद्ध केली आहे. संस्थेचे विश्वस्त प्रतापराव पवार, डॉ. अजित जावकर यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश नलावडे आणि त्यांच्या सर्वच सहकाऱ्यांच्या अथक प्रयत्नातून यश मिळालंय. इलॉन मस्क यांनी प्रयोगाची दखल घेणं ही बाब खूप आशादायक आहे’, असं अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार यांनी म्हटलं आहे.

Web Title: Elon musk satya nadella praises ai technology used in baramati agriculture

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2025 | 09:12 PM

Topics:  

  • AI model
  • AI technology
  • baramati news

संबंधित बातम्या

देशातील AI चा वापर होणार नियंत्रित; केंद्र सरकारकडून 66 पानी सूचना जाहीर
1

देशातील AI चा वापर होणार नियंत्रित; केंद्र सरकारकडून 66 पानी सूचना जाहीर

Local Body Election 2025: ऑनलाईनमुळे यंत्रणा ठप्प; मात्र ‘या’ निर्णयाने राजकीय पक्षांना दिलासा
2

Local Body Election 2025: ऑनलाईनमुळे यंत्रणा ठप्प; मात्र ‘या’ निर्णयाने राजकीय पक्षांना दिलासा

भारत अमेरिका-चीनला देणार टक्कर; लॉंच झाला AI चॅटबॉट, काय आहेत विशेष फीचर्स
3

भारत अमेरिका-चीनला देणार टक्कर; लॉंच झाला AI चॅटबॉट, काय आहेत विशेष फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.