Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kabaddi: कबड्डीत टीसी कॉलेजचा ‘डबल धमाका’; १७ आणि १९ वर्षे गटात विजेतेपद

Kabaddi: १७ वर्षे वयोगट मुलांच्या संघात समीर नेवसे, युवराज जाधव, आयुष देवकाते, अविनाश खंडागळे, नरेंद्र अवचट, हर्षित पटेल, समर्थ गोसावी, गौरव पारेकर, रोहन बनकर, सार्थक गवंड आणि यश कोकरे यांचा समावेश होता.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 26, 2026 | 06:09 PM
Kabaddi Competition

Kabaddi Competition

Follow Us
Follow Us:
  • टीसी कॉलेजला कबड्डीत ‘दुहेरी मुकुट’
  • खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
  • १७ व १९ वर्षे वयोगटात बारामती तालुका अजिंक्यपद
Pune/Kabaddi: क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य (पुणे) अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बारामती तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा नुकत्याच उत्साहात पार पडल्या. २१ ते २३ सप्टेंबर २०२६ दरम्यान जिल्हा क्रीडा संकुल, बारामती येथे झालेल्या या स्पर्धेत येथील नामांकित तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या (टीसी कॉलेज) १७ आणि १९ वर्षे वयोगटातील मुलांच्या दोन्ही संघांनी अप्रतिम कामगिरीचे प्रदर्शन करत विजेतेपद पटकावले आणि दुहेरी मुकुटावर आपले नाव कोरले.

१७ वर्षे वयोगट मुलांच्या संघात समीर नेवसे, युवराज जाधव, आयुष देवकाते, अविनाश खंडागळे, नरेंद्र अवचट, हर्षित पटेल, समर्थ गोसावी, गौरव पारेकर, रोहन बनकर, सार्थक गवंड आणि यश कोकरे यांचा समावेश होता. या सर्व खेळाडूंनी आक्रमक चढाया आणि मजबूत पकडींच्या जोरावर उत्कृष्ट सांघिक खेळाचे दर्शन घडवत अंतिम सामन्यात विजय मिळवून अजिंक्यपद पटकावले.

Maitri Chashak Kabaddi: वाईत रंगला ‘मैत्री चषक’; पाचगणीच्या व्यायाम मंडळाने पटकावला तृतीय क्रमांक, दिग्गज खेळाडूंचा भव्य सत्कार

 १९ वर्षे वयोगटातही दबदबा कायम

१९ वर्षे वयोगटातील अंतिम लढतीत यश भोपळे, पार्थ जाधव, ओम साळुंके, यश वाघमोडे, प्रदीप पिसाळ, केशव जगताप, कुणाल भापकर, समर्थ जाधव, साहिल सुपेकर, रुद्राक्ष रहाटे, ओम शिंदे आणि अनुज नलवडे यांनी कौशल्यपूर्ण सांघिक खेळाचे प्रदर्शन केले. चुरशीच्या सामन्यात आक्रमक चढाया आणि भक्कम बचावाच्या जोरावर या संघाने बाजी मारत तालुका विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.या चमकदार कामगिरीच्या जोरावर दोन्ही संघांमधील खेळाडूंची पुणे जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. खेळाडूंना प्रा. डॉ. गौतम जाधव आणि प्रा. अशोक देवकर यांचे बहुमूल्य क्रीडा मार्गदर्शन लाभले.

खेळाडूंचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या

महाविद्यालयाच्या दोन्ही संघांनी मिळवलेल्या या नेत्रदीपक यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष जवाहर शाह (वाघोलीकर), सचिव मिलिंद शाह (वाघोलीकर), संस्थेचे सर्व पदाधिकारी, प्राचार्य डॉ. अविनाश जगताप, उपप्राचार्य तसेच सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन केले. प्राचार्य डॉ. अविनाश जगताप यांनी खेळाडूंचे कौतुक करत आगामी जिल्हास्तरीय स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करून विजयी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

‘ये गोल्ड हमारा है!’ भारताशी नडला त्याचा गेम झाला; इराणला नमवत टीम इंडियाने जिंकलं ‘सुवर्ण’

Web Title: Baramati tc college wins 17 and 19 years group kabaddi matches sports news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2026 | 06:09 PM

Topics:  

  • baramati news
  • Kabaddi
  • Pune Sports News

संबंधित बातम्या

‘ये गोल्ड हमारा है!’ भारताशी नडला त्याचा गेम झाला; इराणला नमवत टीम इंडियाने जिंकलं ‘सुवर्ण’
1

‘ये गोल्ड हमारा है!’ भारताशी नडला त्याचा गेम झाला; इराणला नमवत टीम इंडियाने जिंकलं ‘सुवर्ण’

Asian Games 2026: पुष्पा राणाच्या नेतृत्वात महिला कबड्डी संघाने मिळवले ऐतिहासिक सुवर्णपदक, इराणची लज्जास्पद हार
2

Asian Games 2026: पुष्पा राणाच्या नेतृत्वात महिला कबड्डी संघाने मिळवले ऐतिहासिक सुवर्णपदक, इराणची लज्जास्पद हार

Sports News: धावपटूंचा जोश, जिंकण्याची जिद्द! पुणे विद्यापीठाची क्रॉस-कंट्री स्पर्धा उत्साहात
3

Sports News: धावपटूंचा जोश, जिंकण्याची जिद्द! पुणे विद्यापीठाची क्रॉस-कंट्री स्पर्धा उत्साहात

Asian Games: भारतीय रणरागिणींचा धडाका! जपान चारीमुंड्या चीत; महिला कबड्डी संघाची शानदार विजयाची हॅट्ट्रिक
4

Asian Games: भारतीय रणरागिणींचा धडाका! जपान चारीमुंड्या चीत; महिला कबड्डी संघाची शानदार विजयाची हॅट्ट्रिक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.