Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पोलीस अन् दरोडेखोरांमध्ये चकमक, 1 पोलीस कर्मचारी जखमी; 5 दरोडेखोरांना पोलिसांनी पकडले

वारजे भागात कोबिंग ऑपरेशन करणार्‍या गुन्हे शाखेचे पथक आणि 8 ते 10 दरोडेखोरांमध्ये चकमक उडाली. दरोडेखोरांनी गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी कोयता फेकून मारल्याने त्यात पोलीस कर्मचारी जखमी झाला असून त्याला प्रतिउत्तर देण्यासाठी पोलिसांनीही दरोडेखोरांवर गोळीबार केला.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 09, 2023 | 07:54 AM
पोलीस अन् दरोडेखोरांमध्ये चकमक, 1 पोलीस कर्मचारी जखमी; 5 दरोडेखोरांना पोलिसांनी पकडले
Follow Us
Follow Us:

पुणे : शहरात नाकाबंदी करण्यात आली असताना वारजे भागात कोबिंग ऑपरेशन करणार्‍या गुन्हे शाखेचे पथक आणि 8 ते 10 दरोडेखोरांमध्ये चकमक उडाली. दरोडेखोरांनी गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी कोयता फेकून मारल्याने त्यात पोलीस कर्मचारी जखमी झाला असून त्याला प्रतिउत्तर देण्यासाठी पोलिसांनीही दरोडेखोरांवर गोळीबार केला. पळून जाणार्‍या 5 दरोडेखोरांना पोलिसांनी पकडले. स्टेट बँकेच्या एटीएमवर दरोडा टाकण्याच्या तयारीत दरोडेखोर होते. ही घटना वारजे येथील रोजरी स्कुलजवळील म्हाडा वसाहतीमध्ये मध्यरात्री एक वाजता घडली. या घटनेत पोलीस कर्मचारी कट्टे हे जखमी झाले आहेत.

शहर पोलिसांनी शुक्रवारी रात्री संपूर्ण शहरात नाकाबंदी केली होती. या वेळी पोलिस आयुक्त रितेश कुमार, सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, आणि पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे, पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, पोलीस उपनिरीक्षक पवार व त्यांचे सहकार्‍यांनी वारजे येथील म्हाडा वसाहतीमध्ये कोंबिग ऑपरेशन राबवत होते. गुन्हेगारांची चेकिंग करीत असताना त्यांना रोझरी स्कुलजवळ 8 ते 10 जणाच्या संशयास्पद हालचाली दिसून आल्या. तेव्हा त्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिस त्यांच्या दिशेने जात होते. त्यावेळी त्यांच्यातील एकाने पिस्तुल काढून पोलिसांच्या दिशेने गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनीही गोळीबार केला. तेव्हा झालेल्या झटापटीमध्ये एका चोरट्याने पोलिसांच्या दिशेने कोयता फेकून मारला. तो पोलीस कर्मचारी कट्टे यांना लागून ते जखमी झाले. यावेळी पोलिसांनी त्यांच्यातील ५ जणांना पकडले. इतर जण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले.

पकडलेल्या 5 जणांकडून एक गावठी कट्टा, 4 जिवंत काडतुसे, कोयते, कटावणी, स्क्रु ड्रायव्हर, हातोडा असे साहित्य जप्त केले आहे. स्टेट बँकेचे एटीएम फोडण्याच्या तयारीने दरोडेखोर आले होते. दरोडेखोर सराइत गुन्हेगार असून त्यांच्यावर गंभीर गुन्हे यापूर्वी दाखल आहेत. वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

[blockquote content=”कोबिंग ऑपरेशनची कारवाई चालू होती, एक वाजण्याच्या सुमारास म्हाडा वसाहतीमध्ये कोंबिग ऑपरेशन सुरू होते. गुन्हेगारांची तपासणी करीत असताना त्यांना रोझरी स्कुलजवळ 8 ते 10 जणाच्या संशयास्पद हालचाली दिसून आल्या. तेव्हा त्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलीस त्यांच्या दिशेने जात होते. त्यावेळी त्यांच्यातील एकाने पिस्तूल काढून पोलिसांच्या दिशेने गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनीही गोळीबार केला. तेव्हा झालेल्या झटापटीमध्ये एका चोरट्याने पोलिसांच्या दिशेने कोयता फेकून मारला. तो पोलीस कर्मचारी कट्टे यांना लागल्याने ते जखमी झाले. यावेळी पोलिसांनी त्यांच्यातील 5 जणांना पकडले. इतर जण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले.” pic=”” name=”- अमोल झेंडे (पोलिस उपायुक्त, गुन्हे शाखा)”]

Web Title: Encounter between police and robbers 1 policeman injured police caught 5 robbers nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2023 | 07:54 AM

Topics:  

  • cmomaharashtra
  • maharashtra
  • NAVARASHTRA
  • Pune
  • Warje

संबंधित बातम्या

Konkan Railway News: कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले! कोकणकन्या ५ तास ४० मिनिटे, मांडवी ६ तास उशिराने
1

Konkan Railway News: कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले! कोकणकन्या ५ तास ४० मिनिटे, मांडवी ६ तास उशिराने

Ketan Agrawal Muder Case: सियाच्या घरातून पुरावे जप्त; पोलिसांची संशयाची सुई आता नेमकी कोणाकडे?
2

Ketan Agrawal Muder Case: सियाच्या घरातून पुरावे जप्त; पोलिसांची संशयाची सुई आता नेमकी कोणाकडे?

Monsoon Trip : जिथे ढग डोंगररांगांच्या कुशीत विसावतात… पावसाळ्यात फिरण्यासाठी महाराष्ट्रातील 6 अप्रतिम ठिकाणे
3

Monsoon Trip : जिथे ढग डोंगररांगांच्या कुशीत विसावतात… पावसाळ्यात फिरण्यासाठी महाराष्ट्रातील 6 अप्रतिम ठिकाणे

Ketan Agrawal Muder Case: दरीत ढकलण्यापूर्वी केतनचा मोबाईल सियाकडे; पोलिसांच्या तपासात मोठा खुलासा
4

Ketan Agrawal Muder Case: दरीत ढकलण्यापूर्वी केतनचा मोबाईल सियाकडे; पोलिसांच्या तपासात मोठा खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.