Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News : कोरेगावात अतिक्रमणावर तिसऱ्यांदा हातोडा; पोलिस बंदोबस्तात हटवली 20 पक्की शेड

प्रथम त्यांनी रस्त्याकडेला अस्ताव्यस्त व वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरणारी फेरीवाले, फळे, भाजीपाला, इतर छोटे मोठे साहित्य विक्रेते, दुकानदारांनी आपापल्या दुकानाच्या समोर जाहिरात फलक, पत्र्याचे छत आदी माध्यमातून केलेली कच्ची

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 21, 2025 | 01:40 PM
Satara News : कोरेगावात अतिक्रमणावर तिसऱ्यांदा हातोडा; पोलिस बंदोबस्तात हटवली 20 पक्की शेड

Satara News : कोरेगावात अतिक्रमणावर तिसऱ्यांदा हातोडा; पोलिस बंदोबस्तात हटवली 20 पक्की शेड

Follow Us
Close
Follow Us:

कोरेगाव : कोरेगाव नगरपंचायत व पोलिसांनी गुरुवारी (दि.20) सकाळपासून सायंकाळपर्यंत प्रचंड पोलीस बंदोबस्तामध्ये अतिक्रमण कारवाई राबवली. सलग तिसऱ्या वेळी राबविलेल्या अतिक्रम हटाव मोहिमेत सुमारे 20 अतिक्रमणे हटविण्यात आली. त्यात बहुतांश अतिक्रमणे ही अतिक्रमणधारकांनी स्वतः काढून घेतली.

हेदेखील वाचा : गुंतवणुकीच्या आमिषाने तब्बल 54 लाखांची फसवणूक; पॉलिटेक्निक प्राध्यापकासह 6 जणांविरुद्ध गुन्हा

मागील अडीच महिन्यांपासून शहरातील वाहतूक कोंडी व त्यातून होणाऱ्या अपघातांचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या पार्श्वभूमीवर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विनोद जळक व कोरेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांनी संयुक्तपणे शहरातून जाणाऱ्या सातारा ते लातूर या राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा असलेली अतिक्रमण हटविण्याची मोहीम उघडली होती. प्रथम त्यांनी रस्त्याकडेला अस्ताव्यस्त व वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरणारी फेरीवाले, फळे, भाजीपाला, इतर छोटे मोठे साहित्य विक्रेते, दुकानदारांनी आपापल्या दुकानाच्या समोर जाहिरात फलक, पत्र्याचे छत आदी माध्यमातून केलेली कच्ची अतिक्रमणे हटवली.

त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये तब्बल 96 पक्क्या अतिक्रमणधारकांना रीतसर नोटीसा काढून त्यांना अतिक्रमणे काढून घेण्याचे सूचित केले. मात्र, त्यास फार प्रतिसाद न मिळाल्यामुळे मोठ्या पोलीस बंदोबस्तात दुसऱ्या वेळी अतिक्रमण हटाव मोहीम राबवून मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण हटवण्यात आली. त्यात काहींनी लवकरच आम्ही अतिक्रमण काढून घेतो, असे लेखी दिले होते.

दरम्यान, या दुसऱ्या अतिक्रमण मोहिमेनंतर सायंकाळी आमदार शशिकांत शिंदे यांनी सर्वांना विश्वासात घेऊन मोहीम राबविण्याची मागणी केली होती. त्यानुसार, या मोहिमेस स्थगिती देण्यात आल्याने शहरात पुन्हा अतिक्रमणे ‘जैसे थे’ स्थितीत असल्याचे समोर आले.

शिरूरमध्ये अतिक्रमणवर कारवाई

दुसरीकडे, सणसवाडी (ता.शिरुर) येथे पुणे-अहिल्यानगर महामार्गावर दैनंदिन व औद्योगिक वाहतूकीमुळे दररोज वाहतूक कोंडी चौकात पुणे महानगर विकास प्राधिकरणच्या अतिक्रमण विरोधी कारवाई पथकाने बुधवारी (दि.१२) दिवसभरात तब्बल १०५ बेकायदा गाळे व टपऱ्या सपाट केल्याने भाजी विक्रेते, वडापाव, चायनिज, स्वीटहोम या गाळ्यांनी महामार्गावरील चौक व्यापला गेला असताना हे सर्व मोकळे केल्याने सणसवाडीतील महामार्ग कालपासून मोकळा श्वास घेवू लागला आहे.

हेदेखील वाचा : Eknath Shinde death Threat: एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी, बुलढाण्यातून मामा भाच्याच्या जोडीला अटक

Web Title: Encroachment in koregaon cracked down on for the third time nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2025 | 01:40 PM

Topics:  

  • Satara News

संबंधित बातम्या

Kas Pathar news : कास पठार हंगाम लवकरच होणार सुरु…; आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ होण्यासाठी ग्रामस्थांनी घेतले विविध निर्णय
1

Kas Pathar news : कास पठार हंगाम लवकरच होणार सुरु…; आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ होण्यासाठी ग्रामस्थांनी घेतले विविध निर्णय

कोयना धरणातून नयनरम्य पाण्याचा विसर्ग; साताऱ्यात पावसाचा जोर वाढला
2

कोयना धरणातून नयनरम्य पाण्याचा विसर्ग; साताऱ्यात पावसाचा जोर वाढला

…तर आम्ही महायुतीतून बाहेर पडू; आरपीआयच्या आठवले गटाचा इशारा
3

…तर आम्ही महायुतीतून बाहेर पडू; आरपीआयच्या आठवले गटाचा इशारा

कबुतरांचा सहवास देतोय खोकला अन् दमा; फुफुसाच्या संसर्गित रोगांना मिळतंय आवताण
4

कबुतरांचा सहवास देतोय खोकला अन् दमा; फुफुसाच्या संसर्गित रोगांना मिळतंय आवताण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.