
Kudal, Medha, Satara News, ST Bus, Niranjana River,
निरंजना नदीवरील पुलाच्या अर्धवटकामामुळे सोनगाव,आर्डे,बेलावडे,कुडाळ,नेवेकरवाडी,करंदोशी,गोपाळपंताची वाडी आणि पानस परिसरातील विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. एसटी बससेवा पूर्ववत नसल्याने विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयात वेळेवर पोहोचणे कठीण झाले असून, खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असल्याने पालकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे.
Supreme Court Recruitment 2026: १० वी पास उमेदवारांना सर्वोच्च न्यायालयात नोकरीची संधी!
सध्या परीक्षा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची धावपळ आणखी वाढली आहे.अशा परिस्थितीत मेढा एसटी आगाराने विद्यार्थ्यांच्या अडचणींकडे गांभीर्याने पाहून मेढा येथून पाचवडच्या दिशेने जाणारी एसटी बससेवा तातडीने सुरू करावी,अशी मागणी पालक, विद्यार्थ्यांकडून जोर धरू लागली आहे.पुलामुळे आजही कुडाळ–हुमगाव–आखाडे मार्गे वळसा घालून प्रवास करावा लागत असल्याने विद्यार्थी,पालक, मेढ्याकडे दररोज जाणारे शासकीय कर्मचारी आणि व्यावसायिक यांना वेळ व पैशांचे नुकसान सहन करावे लागत आहे. पुलाचे काम पूर्णत्वाकडे जात असताना मेढा एसटी महामंडळाकडून बससेवा सुरू करण्याबाबत ठोस निर्णय का घेतला जात नाही,असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
पुलावरून वाहतूक सुरू करण्यासाठी आवश्यक सुरक्षिततेची तपासणी आणि संबंधित यंत्रणेची परवानगी पूर्ण झाली असल्यास मेढा एसटी महामंडळाने विनाविलंब बससेवा सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यावा. पुलावरून एसटी चालविणे अद्याप सुरक्षित नसल्यास,पर्यायी मार्गाने विद्यार्थ्यांना दिलासा देणारी व्यवस्था करावी.
Raigad News: आधी अतिवृष्टी, नंतर पावसाची दडी! माणगावमध्ये भातशेतीला दुहेरी फटका, दुष्काळ जाहीर
विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आणि परीक्षेचा प्रश्न लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासन व मेढा एसटी महामंडळाने केवळ आश्वासनांवर न थांबता प्रत्यक्ष कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.आता एसटी महामंडळ विद्यार्थ्यांच्या अडचणींची दखल घेऊन बस सेवा नेमकी कधी सुरू करणार, याकडे संपूर्ण कुडाळ परिसराचे लक्ष लागले आहे.