Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 19 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

निसर्गाचा बळी देऊन विकास नको! डॉ. नीरज हातेकरांचा बावधनमध्ये स्पष्ट संदेश; डीजे-डॉल्बीला फाटा देणाऱ्या २५ गणेश मंडळांचा सन्मान

वाई तालुक्यातील बावधन येथे पर्यावरण संवर्धन आणि पारंपरिक गणेशोत्सवाचा संदेश देणारा कार्यक्रम पार पडला. प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ डॉ. नीरज हातेकर यांनी विकासासोबत निसर्गाचे संरक्षणही महत्त्वाचे असल्याचे सांगितले. यावेळी डीजे-डॉल्बी टाळणाऱ्या २५ गणेशोत्सव मंडळांचा आणि तीन वृक्षमित्रांचा सन्मान करण्यात आला.

  • By विवेक
Updated On: Oct 19, 2026 | 09:17 PM
dr niraj hatekar satara

dr niraj hatekar satara

Follow Us
Follow Us:
  • पर्यावरणपूरक विकासाचा संदेश
  • २५ गणेश मंडळांचा गौरव
  • तीन वृक्षमित्रांचा सत्कार
 

वाई : रुंद रस्ते आणि चकचकीत पायाभूत सुविधा उभारल्या म्हणजे विकास झाला, असे मानता येणार नाही. सामान्य माणसाला रोजगार, दर्जेदार आरोग्यसेवा आणि मूलभूत सुविधा मिळणे तितकेच आवश्यक आहे. विकास करताना निसर्गाची हानी आणि स्थानिकांच्या हिताकडे दुर्लक्ष होणार असेल, तर त्याचा गांभीर्याने विचार झाला पाहिजे, असे मत प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ डॉ. नीरज हातेकर यांनी बावधन येथे व्यक्त केले.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान व सेवा संकल्प अभियानांतर्गत बावधन ग्रामपंचायत आणि मंगलमूर्ती सोशल क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. डीजे-डॉल्बीचा वापर टाळून पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करणाऱ्या गावातील २५ गणेशोत्सव मंडळांचा, तसेच वृक्षसंवर्धनासाठी योगदान देणाऱ्या तीन वृक्षमित्रांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

डॉ. हातेकर म्हणाले, विकासाची आवश्यकता नाकारता येणार नाही; मात्र त्यासाठी पर्यावरणाला मोजावी लागणारी किंमतही लक्षात घेतली पाहिजे. सुरूर–वाई रस्त्याच्या रुंदीकरणासाठी होणारी वृक्षतोड, वाढते तापमान आणि भविष्यातील संभाव्य पाणीटंचाई यांचा परस्परसंबंध समजून घेण्याची गरज आहे. मोठे प्रकल्प उभारताना त्यांचा स्थानिक नागरिकांच्या जगण्यावर काय परिणाम होतो, याचाही विचार व्हायला हवा. समृद्धी महामार्गाचा संदर्भ देत, अशा प्रकल्पांमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात अपेक्षित समृद्धी आली का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

Baramati: छत्रपती कारखान्याची ऊस दरात आघाडी; पहिली उचल ३५०१ रुपये प्रतिटन, सभासदांसह गेटकेनधारकांनाही समान दर

बावधन परिसरातील प्रस्तावित दगडखाणींच्या मुद्द्याकडे निसर्गप्रेमी व सामाजिक कार्यकर्ते प्रशांत डोंगरे यांनी लक्ष वेधले. या खाणींमुळे निर्माण होणारी धूळ आणि त्याचे पर्यावरणासह नागरिकांच्या आरोग्यावर होणारे संभाव्य परिणाम विचारात घेतले पाहिजेत. हा प्रश्न केवळ बावधनपुरता मर्यादित राहणार नसून वाई परिसरालाही त्याची झळ बसू शकते, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली. वृक्षरक्षणाविषयी आज्ञापत्रातील विचारांचा संदर्भ देत त्यांनी वृक्षसंपत्ती जपण्याचे आवाहन केले. वाईच्या भाजी मंडईतील वृक्षतोडीनंतर विक्रेत्यांना उन्हात व्यवसाय करावा लागत असल्याचे उदाहरणही त्यांनी दिले.

वाईचे पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांनी ध्वनिप्रदूषण टाळून गणेशोत्सव साजरा करणाऱ्या बावधनकरांचे कौतुक केले. पारंपरिक उत्सवाचा आनंद जपत डीजे-डॉल्बीपासून दूर राहण्याचा मंडळांचा निर्णय अनुकरणीय असून, गावाने ही परंपरा पुढेही कायम ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले.

विवाह नोंदणीच्या निमित्ताने एक झाड लावण्याच्या ग्रामपंचायतीच्या उपक्रमाची माहिती ग्रामविकास अधिकारी प्रशांत धुमाळ यांनी दिली. वृक्षारोपणाला कुटुंबातील महत्त्वाच्या प्रसंगाची जोड देऊन नागरिकांचा सहभाग वाढविण्याचा आणि वृक्षसंवर्धनाची जबाबदारी रुजविण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी वृक्षमित्र संजय मदन भोसले, निलेश अरुणराव शिंदे आणि संजय बाळकृष्ण कुंभार यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. नवयुग गणेश मंडळ, अहिल्यादेवी गणेशोत्सव मंडळ, अमर गणेशोत्सव मंडळ, अजिंक्य गणेशोत्सव मंडळ, श्रीराम गणेशोत्सव मंडळ, श्री छत्रपती शिवाजी महाराज गणेशोत्सव मंडळ, जय हिंद गणेशोत्सव मंडळ आणि मानाचा गणपती गणेश मंडळ यांच्यासह एकूण २५ मंडळांचाही सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाला गटविकास अधिकारी नारायण घोलप, मंगलमूर्ती सोशल क्लबचे अध्यक्ष धनंजय भोसले, तंटामुक्त संघटनेचे माजी अध्यक्ष प्रदीप कदम, मदन भोसले, चंद्रकांत भोसले, सयाजी पिसाळ पाटील, विजयकुमार रासकर, राजेंद्र कदम यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. अनिल पिसाळ यांनी प्रास्ताविक केले. केशव कोदे यांनी सूत्रसंचालन केले. राजेंद्र तरटे यांनी आभार मानले.

Gokul Result 2026 : गोकुळमध्ये सतेज पाटील यांची बाजी! 13-12 च्या निकालात कोण जिंकलं? पाहा संपूर्ण यादी

Web Title: Bavdhan ganesh mandals tree conservation neeraj hatekar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2026 | 09:17 PM

Topics:  

  • Satara News
  • Wai News

संबंधित बातम्या

Satara News: कोट्यवधींचा कुडाळ पूल बांधूनही पूलावरून एसटी वाहतूक बंदच; ठेकेदारामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय
1

Satara News: कोट्यवधींचा कुडाळ पूल बांधूनही पूलावरून एसटी वाहतूक बंदच; ठेकेदारामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय

Khandala Sugar Factory Election: खंडाळा साखर कारखान्याचा बिगुल वाजला!; २१ जागांसाठी २२ नोव्हेंबरला मतदान, आजपासून अर्ज दाखल
2

Khandala Sugar Factory Election: खंडाळा साखर कारखान्याचा बिगुल वाजला!; २१ जागांसाठी २२ नोव्हेंबरला मतदान, आजपासून अर्ज दाखल

Mudhaidevi Navratri Ashtami: महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी देऊरची मुधाई देवी!; अष्टमीच्या मुख्य दिनी राज्यभरातून भाविकांची गर्दी
3

Mudhaidevi Navratri Ashtami: महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी देऊरची मुधाई देवी!; अष्टमीच्या मुख्य दिनी राज्यभरातून भाविकांची गर्दी

Satara Water Crisis News: १४ कोटींची योजना पूर्ण, तरीही पाण्यासाठी संघर्ष; प्रशासनाला १५ दिवसांचा अल्टिमेटम
4

Satara Water Crisis News: १४ कोटींची योजना पूर्ण, तरीही पाण्यासाठी संघर्ष; प्रशासनाला १५ दिवसांचा अल्टिमेटम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.