Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News: मुंबईतील व्यापाऱ्यांकडून मराठीचे जोरदार स्वागत! नियम मोडणाऱ्या १,१२४ दुकानांना पालिकेचा दणका; प्रभावी अमलबजावणीवर भर

महिनाभरात पालिकेने केलेल्या धडक कारवाईत तब्बल ३५ हजार ४२८ आस्थापनांची झाडाझडती केली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १,१२४ व्यावसायिकांवर 'महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियमानुसार कायदेशीर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 14, 2026 | 09:51 AM
मुंबईतील व्यापाऱ्यांकडून मराठीचे जोरदार स्वागत! नियम मोडणाऱ्या १,१२४ दुकानांना पालिकेचा दणका; प्रभावी अमलबजावणीवर भर

मुंबईतील व्यापाऱ्यांकडून मराठीचे जोरदार स्वागत! नियम मोडणाऱ्या १,१२४ दुकानांना पालिकेचा दणका; प्रभावी अमलबजावणीवर भर

Follow Us
Follow Us:

मुंबई महापालिका क्षेत्रातील दुकाने आणि आस्थापनांवर मराठी भाषेतील नामफलक सक्तीच्या अंमलबजावणीसाठी प्रशासनाने हाती घेतलेल्या विशेष मोहिमेचा पहिला टप्पा शुक्रवारी (१३ जून) पूर्ण झाला. गेल्या महिनाभरात पालिकेने केलेल्या धडक कारवाईत तब्बल ३५ हजार ४२८ आस्थापनांची झाडाझडती केली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १,१२४ व्यावसायिकांवर ‘महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियमा’ नुसार कायदेशीर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. राज्य शासनाच्या धोरणानुसार मुंबईत मराठी भाषेला प्राधान्य मिळावे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी पालिकेने १४ मे ते १२ जून २०२६ या कालावधीत शहरात विशेष धाडसत्रे राबवली.(फोटो सौजन्य – AI)

एसटी प्रवाशांनो लक्ष द्या ! सवलतीच्या तिकिटासाठी NCMC कार्ड काढून घ्याच; ‘या’ तारखेपासून कार्ड असेल बंधनकारक

उपमहापौर, विधी समिती अध्यक्षा तसेच उपायुक्त (विशेष) यांच्या थेट निर्देशानुसार पालिकेच्या विशेष पथकांनी शहरातील प्रमुख रस्ते, महत्त्वाचे मार्ग आणि व्यापारीदृष्ट्या गजबजलेल्या भागांतील आस्थापनांची कसून पाहणी केली. या तपासणीदरम्यान ज्या दुकानांवर मराठी भाषेतील नामफलक आढळले नाहीत, त्यांची नोंद घेऊन त्यांच्यावर तातडीने दंडात्मक कारवाई करण्यात आली.

प्रशासनाचा कारवाईसह जनजागृतीवर भर

या महिनाभराच्या मोहिमेत केवळ कायदेशीर कारवाईवर भर न देता जनजागृतीलाही प्राधान्य देण्यात आले होते. दरम्यान, पहिल्या टप्प्यातील ही मोहीम संपली असली तरी अद्यापही काही व्यापारी नियमांचे उल्लंघन करत असल्याचे समोर आले आहे, त्यामुळे महापालिकेकडून आगामी काळातही अशाच स्वरूपाची अचानक धाडसत्रे आणि तपासणी मोहीम सुरूच राहणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

एसटी वाचविण्यासाठी जनआंदोलनाची गरज; नेतृत्त्व प्रताप सरनाईक यांनीच करावे : श्रीरंग बरगे

अनेक व्यापाऱ्यांकडून नियमांचे कठोर पालन

महापालिकेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, महिनाभरात तपासणी करण्यात आलेल्या ३५ हजार ४२८ आस्थापनांपैकी तब्बल ३४ हजार ३०४ आस्थापनांवर नियमानुसार मराठी नामफलक लावल्याचे आढळून आले.त्यामुळे मुंबईतील बहुतांश व्यापारी आणि व्यावसायिकांनी नियमांचे योग्य पालन केल्याचे स्पष्ट झाले आहे. या मोहिमेमुळे व्यापारी वर्गात मराठी नामफलकांबाबत मोठी जागरूकता निर्माण झाली असून अनेक आस्थापनांनी स्वयंस्फूर्तीने नियमांचे पालन केले असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Enthusiastic response to the marathi language mandate from mumbais traders municipal corporation cracks down on 1 124 shops for violating rules emphasis on effective implementation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2026 | 09:30 AM

Topics:  

  • Brihanmumbai Municipal Corporation
  • maharashtra
  • Mumbai News

संबंधित बातम्या

गणेशोत्सवात कृत्रिम फुलांचा ‘सुळसुळाट’, अस्सल फुलांची मागणीच घटली; झेंडूचे दर ३५ ते ४० रुपयांवर
1

गणेशोत्सवात कृत्रिम फुलांचा ‘सुळसुळाट’, अस्सल फुलांची मागणीच घटली; झेंडूचे दर ३५ ते ४० रुपयांवर

ऐन गणेशोत्सवातही फुलांचे भाव कोमेजले; अपेक्षेप्रमाणे बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत
2

ऐन गणेशोत्सवातही फुलांचे भाव कोमेजले; अपेक्षेप्रमाणे बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत

Eknath Shinde Helicopter: गुजरात दौऱ्यात एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे उड्डाण रद्द; टेकऑफपूर्वी तांत्रिक बिघाड
3

Eknath Shinde Helicopter: गुजरात दौऱ्यात एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे उड्डाण रद्द; टेकऑफपूर्वी तांत्रिक बिघाड

लोणीतील खुनाच्या प्रयत्नाचा लावला छडा, मुख्य आरोपी जेरबंद! सात साथीदार निष्पन्न
4

लोणीतील खुनाच्या प्रयत्नाचा लावला छडा, मुख्य आरोपी जेरबंद! सात साथीदार निष्पन्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.