Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

78 वर्षांनंतरही दोन जिल्ह्यांना जोडणारा पूल कागदावर; वैनगंगेच्या पात्रात मृत्यूचा प्रवास

विशेष म्हणजे, हा भाग राज्याच्या दोन बड्या राजकीय नेत्यांचा बालेकिल्ला मानला जातो. इटाण हे गाव काँग्रेसचे नेते आणि आमदार नाना पटोले यांच्या साकोली मतदारसंघातील शेवटच्या टोकाचे गाव आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 24, 2026 | 11:17 AM
वैनगंगेच्या पात्रात मृत्यूचा प्रवास

वैनगंगेच्या पात्रात मृत्यूचा प्रवास

Follow Us
Close
Follow Us:

भंडारा : देशात एकीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा झाला आणि ‘डिजिटल इंडिया’च्या घोषणांनी आकाश दुमदुमले. मात्र, भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यांच्या सीमेवर वास्तव काही वेगळेच आणि भयावह आहे. भंडारा जिल्ह्यातील इटाण आणि चंद्रपूर जिल्ह्यातील कोलारी या दोन गावांना जोडणारा रस्ताच अस्तित्वात नसल्याने, स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतरही इथली जनता वैनगंगेच्या विस्तीर्ण पात्रात जीव मुठीत धरून ‘डोंग्या’च्या (नाव) साह्याने प्रवास करत आहे.

विशेष म्हणजे, हा भाग राज्याच्या दोन बड्या राजकीय नेत्यांचा बालेकिल्ला मानला जातो. इटाण हे गाव काँग्रेसचे नेते आणि आमदार नाना पटोले यांच्या साकोली मतदारसंघातील शेवटच्या टोकाचे गाव आहे. तर, नदीच्या पलीकडील कोलारी हे गाव भाजपचे आमदार बंटी भांगडिया यांच्या चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर मतदारसंघात येते. एका बाजूला विरोधी पक्षाचे वजनदार नेते आणि दुसऱ्या बाजूला सत्ताधारी भाजपचे शक्तिशाली आमदार असतानाही, या दोन गावांना जोडणारा पूल का होऊ शकला नाही, असा संताप सवाल आता विचारला जात आहे.

हेदेखील वाचा : मराठवाड्यातील 11 धरणांत 81 टक्के पाणीसाठा; मध्यम प्रकल्पांमध्ये 75 टक्क्यांहून अधिक साठा

पूल नसल्याने पावसाळ्यात जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. रस्ता नसल्याचा फटका केवळ दळणवळणाला बसतोय असे नाही, तर इथल्या सामाजिक जीवनावरही याचे गंभीर परिणाम झाले आहेत. पावसाळ्यात वैनगंगा नदी जेव्हा दुथडी भरून वाहते, तेव्हा या भागाचा संपर्क पूर्णपणे तुटतो. आजारी रुग्ण असो वा गर्भवती महिला, त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी डोंग्याशिवाय पर्याय उरत नाही. अनेकदा या दळणवळणाच्या समस्येमुळे तरुणांचे विवाह जमण्यात अडचणी येतात. रस्ता आणि पूल नसल्यामुळे अनेक सोयरीकी तुटल्याची खंत ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. अमृत महोत्सवाच्या झगमगाटात इटाण आणि कोलारीच्या ग्रामस्थांच्या नशिबी मात्र वैनगंगेच्या पात्रातील काळोखच आहे.

पुलाच्या निर्मितीसाठी 100 कोटी मंजूर पण…

मी खासदार असताना केंद्र सरकारने या पुलाच्या निर्मितीसाठी १०० कोटी रुपये मंजूर केले होते. मात्र, त्यानंतर केंद्राने उर्वरित निधी थांबविल्याने पुलाचे काम रखडले. परिणामी, आजही नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.

– नाना पटोले, आमदार

या पुलाची निर्मिती झाली तर भंडारा आणि चंद्रपूर या सीमावर्ती भागातील शेतकरी, विद्यार्थी आणि व्यापाऱ्यांना मोठे पाठबळ मिळेल. शिक्षण आणि व्यापारासाठी हा मार्ग अत्यंत सोयीस्कर होईल, पण शासन याकडे लक्ष द्यायला तयार नाही.

– संदीप मोटघरे, ग्रामस्थ, इटाण

Web Title: Even after 78 years the bridge connecting two districts is still pending

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 11:15 AM

Topics:  

  • bhandara news

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.