मराठवाड्यातील ११ धरणांत ८१ टक्के साठा (संग्रहित फोटो)
छत्रपती संभाजीनगर : उन्हाचा चटका जाणवायला सुरुवात झाली असून, धरणातील पाणीसाठ्यावर या उन्हाचा परिणाम होत आहे. जायकवाडीसह मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पांमध्ये आता फेब्रुवारीच्या मध्यात पाणीसाठा ८१ टक्के आहे. याशिवाय ७५ मध्यम प्रकल्पांमध्ये ७३ टक्के तर ७५८ लघू प्रकल्पांमध्ये सध्या ६३ टक्के पाणीसाठा आहे. सध्या तरी फेब्रुवारी महिन्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत आजची परिस्थिती समाधनाकारक आहे.
मराठवाड्यातल्या या मोठ्या धरणांचा प्रकल्पिय संकल्पित साठा ५१५६ दशलक्ष घनमीटर एवढा आहे. यामध्ये सध्या ४१८३ दशलक्ष घनमीटर एवढा उपयुक्त पाणीसाठा आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात हासाठा ४२९० दशलक्ष घनमीटर एवढा होता. मराठवाड्याच्या पिण्याची आणि सिंचनासाठी सर्वात जास्त मदार ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जायकवाडी धरणावर आहे. मातीच्या सर्वात मोठ्या धरणाची २१७१ दशलक्ष घनमीटर एवढी प्रकल्पिय साठा आहे, त्यापैकी सध्या १७६८ दशलक्ष घनमीटर एवढा म्हणजे ८१ टक्के पाणीसाठा सध्या या धरणात आहे.
सध्या सर्वात कमी उपयुक्त साठा हिंगोली जिल्ह्यातील सिद्धेश्वर प्रकल्पात आहे. याचा प्रकल्पिय साठा ८१ दशलक्ष घनमीटर आहे तर सध्या ३२ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा आहे. परभणी जिल्ह्यातील येलदरीचा प्रकल्पिय साठा ८०९ दशलक्ष घनमीटर असून सध्या ७१० दशलक्ष घनमीटर उपयुक्त साठा आहे. हे प्रमाण ८८ टक्के आहे. याच जिल्ह्यातील निम्न दुधना प्रकल्पात प्रकल्पाचा प्रकल्पिय साठा २४२ दशलक्ष घनमीटर असून सध्या त्यात १४९ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा आहे. हे प्रमाण ६१ टक्के एवढे आहे.
माजलगाव प्रकल्पिय साठा ३१२ दशलक्ष घनमीटर
बीड जिल्ह्यातील माजलगाव प्रकल्पाचा प्रकल्पिय साठा ३१२ दशलक्ष घनमीटर असून सध्या त्यात २६५ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा आहे. हे प्रमाण ८५ टक्के एवढे आहे. याच जिल्ह्यातील मांजरा प्रकल्पाचा साठा १७७ दशलक्ष घनमीटर असून सध्या त्यात १५१ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा आहे. हे प्रमाण ८५ टक्के एवढे आहे. धाराशीव जिल्ह्यातील निम्न तेरणा प्रकल्पाचा प्रकल्पिय साठा ९१ दशलक्ष घनमीटर असून सध्या त्यात ७९ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा आहे. हे प्रमाण ८६ टक्के एवढे आहे.
हेदेखील वाचा : Chhatrapati Sambhajinagar Water Crisis: ढोरकीनमध्ये मुख्य पाईपलाईन फुटली! जायकवाडीची केबल जळाल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत






