Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चक्क ढाब्यावर दिसून आल्या ईव्हीएम मशीन; राष्ट्रवादीसह शिवसेनेचे पदाधिकारी आक्रमक

ईव्हीएम मशीन सापडलेल्या ढाब्यासमोर रात्री उशिरापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला. ईव्हीएम मशीन सोलापूर-पुणे महामार्गावर आढळून आल्याने हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 09, 2026 | 09:03 AM
चक्क ढाब्यावर ईव्हीएम मशीन

चक्क ढाब्यावर ईव्हीएम मशीन

Follow Us
Follow Us:

सोलापूर : सोलापूर-पुणे महामार्गावर असलेल्या मोहोळजवळील एका ढाब्यावर शनिवारी रात्री ११ वाजता दोन ईव्हीएम मशीन आढळल्याची घटना घडली. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक काळात ईव्हीएम मशीन एका धाब्यावर आढळूल्याने सोलापुरात खळबळ उडाली आहे.

महामार्गावरील ईव्हीएम मशीन सापडलेल्या ढाब्यासमोर रात्री उशिरापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला. ईव्हीएम मशीन सोलापूर-पुणे महामार्गावर आढळून आल्याने हाय व्होल्टेज ड्रामा पाहावयास मिळाला. दरम्यान, ढाब्यावर सापडलेल्या दोन्ही मशीन या झोनल अधिकाऱ्यांकडे होत्या. त्या दोन्ही पेट्या अतिरिक्त होत्या. मतदानासाठी त्या मशीन वापरल्या नव्हत्या, असा दावा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी केला आहे. दोन्ही पेट्या पोलिस ठाण्याकडे घेऊन जाऊ असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, कार्यकर्ते मशीन देण्यात तयार नव्हते.

तसेच, या पेट्या ज्या अवस्थेत सापडल्या आहेत, त्यावरून निवडणुकीचे निकाल काय लागणार हे स्पष्ट होत आहे. प्रशासनाचा हा कारभार अत्यंत संशयास्पद असून, हा प्रकार रिझर्व्ह बँकेच्या नोटा छापण्याचे मशीन पळवण्यासारखाच गंभीर आहे. ज्या पेट्या सुरक्षित ठेवाव्या लागतात, त्या रस्त्यावर सापडणे ही लोकशाहीची थट्टा आहे. यावरून महाराष्ट्राने समजून घेतले पाहिजे. या पेट्या माझ्या कुरुल जिल्हा परिषद गटाच्याच आहेत, असा आक्रमक पवित्रा कार्यकर्त्यांनी घेतला.

…तोपर्यंत पेट्या हलू देणार नाही

घटनास्थळावर जोपर्यंत जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक येत नाहीत. तोपर्यंत इथून पेट्या मी हलवू देणार नाही, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी घटनास्थळी घेतली. शिवसेना पदाधिकारीही आक्रमक झाल्याचे दिसून आले.

सिल्लोडमध्येही कार्यकर्त्यांचा राडा

दुसऱ्या एका घटनेत, जिल्हा परिषद, पंचायत समिती निडणूक मतदानादरम्यान, काही ठिकाणी पोलिस आणि उमेदवार प्रतिनिधी यांच्यात शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. बिडकीन मतदान केंद्रावर विनाकाम महिला गर्दी करत असल्याने पोलिसांनी महिलांना बाहेर काढल्याने वाद चिघळला होता. एका ठिकाणी भाजप उमेदवाराचा आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसह नागरिकांचा गोंधळ पाहायला मिळाला.

हेदेखील वाचा : Bihar Crime: चार मित्रांनी एकत्र घेतलं उचललं टोकाचं पाऊल; एकाच कंपनीत करायचे नोकरी; काय घडलं नेमकं?

Web Title: Evm machines were surprisingly found at a roadside eatery

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 09:03 AM

Topics:  

  • Election News
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
1

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

Ladki Bahin Yojana August installment: लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! ऑगस्टच्या हप्त्यासाठी ३३९ कोटींचा निधी मंजूर
2

Ladki Bahin Yojana August installment: लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! ऑगस्टच्या हप्त्यासाठी ३३९ कोटींचा निधी मंजूर

Maharashtra Politics: ‘महेंद्र थोरवे तिसऱ्यांदा आमदार होणार’; भरत गोगावलेंचा 2029 च्या निवडणुकीबाबत दावा
3

Maharashtra Politics: ‘महेंद्र थोरवे तिसऱ्यांदा आमदार होणार’; भरत गोगावलेंचा 2029 च्या निवडणुकीबाबत दावा

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन
4

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.