पुणे: महात्मा फुले वाडा स्मारकाच्या विस्तारीकरणाच्या कामाला वेग आला असून पुणे महापालिकेकडून या परिसरातील नागरिकांच्या मागण्या समजून घेण्यासाठी सर्व्हेक्षण केले जाणार आहे. या सर्व्हेक्षणाच्या माध्यमातून नागरिकांच्या मागण्या समजून घेतल्या जाणार असून त्या निश्चित केल्या जाणार आहेत. त्यासोबतच भूसंपादनाचा प्रक्रिया सुरु केली जाणार आहे, अशी माहिती शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी दिली. राज्य शासनाच्या माध्यमातून पालिका महात्मा फुले वाडा स्मारकाच्या विस्तारीकरणाचे काम केले जाणार आहे. या विस्तारीकरणाच्या कामाला वेग देण्यासाठी पालिकेत आज बैठक पार पडली.
या प्रसंगी या परिसरातील नागरिकांच्या प्रतिनिधी उपस्थित होते. त्यावेळी या स्मारकाच्या भूसंपादन करण्यासाठी या परिसरातील नागरिकांच्या मागण्या समजून घेतल्या जाणार आहेत. महात्मा फुले वाडा या राष्ट्रीय स्मारकास भेट देण्यासाठी वर्षभर राष्ट्रीय नेते व अति महत्वाच्या व्यक्ती येत असतात. मात्र येथे वाहतूक व वाहनतळासाठी प्रशस्त जागा नसल्याने पर्यटन व नागरिकांची गैरसोय होत आहे. यामुळे महात्मा फुले वाडा व सावित्रीबाई फुले स्मारकांचा विस्तार केला जाणार आहे.
झाडाला गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या; आईने घराबाहेर पाहताच…
महात्मा फुले वाडा स्मारक व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक यामध्ये एमआरटीपी ३७ (१ क) अन्वये प्रस्तावित आरक्षणाचे क्षेत्र अंदाजे १०,९४२ चौ.मी. इतके आहे. (२.७३ एकर) फुले स्मारक एकत्रीकरण व विस्तारीकरणात एकूण ९१ मिळकती बाधित होत असून त्याचे क्षेत्रफळ ५३१०.०० चौरस. मीटर आहे. तसेच त्यामध्ये मालक ५१६ व भाडेकरू २८५ आहेत. महात्मा फुले वाडा स्मारकाच्या विस्तारीकरणाचे काम केले जाणार आहे. त्यासाठी भूसंपादन करावे लागणार आहे. या भूसंपादनासाठी राज्य शासनाकडून महापालिकेला २०० कोटी देण्याचे मान्य करण्यात आले आहे.
स्मारकालगतचे जागामालक आणि भाडेकरु यांच्या विविध मागण्या आहेत. जागा देण्याच्या मोबदल्याच पर्यायी जागेची मागणी केली जात आहे. परंतु पर्यायी जागा देण्याचे धोरण पालिकेचे नाही. त्यामुळे त्यांना रोख मोबदला दिला जाऊ शकतो. तसेच पालिकेची उपलब्ध घरे त्यांना देण्याचा विचार होऊ शकतो. काही ठिकाणी मालक दोन चार भाडेकरू आहेत. त्यामुळे मालक आणि भाडेकरू यांनाही मोबदला हवा आहे. या प्रकारे नागरिकांच्या विविध मागण्या आहेत. या मागण्या समजून घेतल्या जाणार आहेत. याचे सर्व्हेक्षण करण्यासाठी उपआयुक्तांची टीम नेमली जाणार आहे. मागण्या निश्चित केल्यानंतर यासोबत भूसंपादन केले जाणार आहे. असे वाघमारे यांनी सांगितले.
भांडण सोडवणं पडलं एका रिक्षाचालकाला महागात, टोळक्याकडून धारदार शस्त्राने वार,
महात्मा फुले वाडा स्मारकासाठी राज्य शासनाने निधी देण्याची तयारी दाखविल्यानंतर स्मारकासाठी आवश्यक जागेचे भुसंपादन करण्यासाठी महापालिका जागामालक आणि भाडेकरूंशी चर्चा सुरु केली आहे. पुणे शहरातील महात्मा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे राहते घर १९९२ मध्ये राष्ट्राला अर्पण करून ही वास्तू राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आली आहे. या स्मारकाच्या विस्तारीकरणासाठी लगतचे जागामालक आणि भाडेकरु यांना मोबदला यासाठी भूमिसंपादनाची आवश्यक तेवढी रकमेची मागणीचा प्रस्ताव शासनाने मान्य केला आहे.