crime (फोटो सौजन्य- pinterest)
नाशिकमध्ये दोन जणांच्या वादात मारहाणी झाली होती. या मारहाणीत एका रिक्षाचालकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली. हि घटना शनिवारी घडली. रिक्षाचालक भांडण सोडवायला गेला होता. त्या भांडणात शिक्षचालकावर धारधार शाश्त्राने टोळक्याने वार केला आणि उपचारा दरम्यान मृती झाला.
पत्नीसमोरच पतीची हत्या; चाकूने पोटावर केले सपासप वार अन्…
भांडण सोडवणं एका शिक्षाचालकाला महागात पडलं. नाशिक मध्ये दोन व्यक्तींमध्ये वाद झाला. या वादात मारहाणी झाली आणि याच मारहाणीत एक रिक्षाचालक जखमी झाला आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मृत व्यक्तीचे नाव प्रकाश मधुकर सूर्यवंशी (३९) असे आहे. ही घटना शनिवारी घडली.
अधिक माहिती काय
याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या काही वर्षांपासून मृत प्रकाश सूर्यवंशी हे स्वामी नरेंद छाया हाइट्स कडेपठार सोसायटीत कुटुंबासोबत राहत होते. गुरुवारी रात्री त्याच सोसायटीत राहणारे गणेश पाटील हे रात्री बारा वाजता सोसायटीच्या पार्किंगमध्ये गप्पा मारत उभे होते. याच दरम्यान चार संशयित हे गणेश पाटील यांच्या आतेभाऊ असलेल्या किरण जमदाडे यांच्यासोबत झालेल्या जुन्या वादातून मारहाण करण्यास आले होते.
टोळक्याने त्यांचा भाऊ गणेश पाटील यांना किरण जमदाडेबाबत विचारपूस केली. किरण जमदाडे न भेटल्याने संशयित टोळक्याने पाटील यांच्यावर हल्ला केला. हा वाद सोडवण्याचा प्रकाश सूर्यवंशी प्रयत्न करीत असताना टोळक्याने कोयता व धारदार शस्त्राने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. जखमी झालेल्या सूर्यवंशी यांना रात्री नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. हल्ल्यात सूर्यवंशी यांच्या किडनीजवळ आणि पाठीवर गंभीर घाव झाले होते. उपचारादरम्यान शनिवारी प्रकाश सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली असा परिवार आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.