प्रेमभंगामुळे तरूण नैराश्येत, गळफास घेऊन संपवलं जीवन; सुसाईड नोटमध्ये म्हटलं, 'जिसे मैं पसंत करता था, उसने...'' (File Photo : Suicide)
अमरावती : अमरावतीच्या तिवसा तालुक्यातील गुरुकुंज मोझरी येथील दासटेकडी परिसरात राहणाऱ्या एका तरुणाने स्वतःच्या घरातील आंब्याच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (दि.11) मध्यरात्री घडली. मयूर विजय येलके (वय 19) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे आहे.
शनिवारी (दि.12) सकाळी मयूरची आई झोपेतून उठल्यानंतर अंगणात येताच, मयूरचा मृतदेह झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. यावेळी तिने आरडाओरड केली असता, परिसरातील नागरिकांनी धाव घेतली. सदर घटनेने सर्वत्र खळबळ उडाली. सदर घटनेची माहिती तिवसा पोलिस स्टेशनला कळताच, तिवसा पोलिस घटनास्थळी तातडीने पोहचले व पंचनामा करून मयूरचा मृतदेह तिवसा उपजिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनकरिता पाठविण्यात आला.
दरम्यान, मयूर बी. कॉम. पहिल्या वर्षात शिक्षण घेत होता. कॉलेजला सुट्ट्या लागल्याने तो मजुरीचे काम करत होता. मयूरचे कुटुंब हे भूमिहीन असून, वडिल कंपनीमध्ये कामगार म्हणून काम करतात. लहान भाऊ शिक्षण शिकत आहे. मयूरचे मूळगाव वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील होते.
आत्महत्येचे कारण अस्पष्ट
कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी गेल्या 13 ते 14 वर्षांपासून ते गुरुकुंज मोझरी दासटेकडी परिसरात राहत आहेत. सदर घटनेमुळे येलके परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्याच्या मृत्यू मागचे अद्यापही कुठले कारण स्पष्ट झाले नाही. या घटनेचा पुढील तपास तिवसा पोलिस करत आहे.
शिक्रापुरात तरुणाची आत्महत्या
शिक्रापूर (ता.शिरुर) येथे एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आकाश काळजे (वय 27 वर्षे, रा. पाटवस्ती शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे) असे या तरूणाचे नाव आहे. आकाश हा कुटुंबियांसह जेवण करुन रात्रीच्या सुमारास घरात झोपलेला होता. सकाळी सर्वजण उठले तरी आकाश बाहेर येत नसल्याने घरच्या मंडळींना संशय आला. त्यांनी पाहिले असता आकाशने आत्महत्या केल्याचे दिसून आले.