Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: निपुत्रिक महिलांना मी मूल देतो! असं म्हणणाऱ्या वडगावपानच्या गडगेबाबाला अटक, तिघे फरार

भोंदू बाबा अशोक खरातनंतर राजयभरातील अनेक भोंदू बाबांवर कारवाई करण्यात येत आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तक्रारीनंतर वडगावपानच्या गडगेबाबाला देखील अटक कारंब्यात आली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 19, 2026 | 03:11 PM
Ahilyanagar News: निपुत्रिक महिलांना मी मूल देतो! असं म्हणणाऱ्या वडगावपानच्या गडगेबाबाला अटक, तिघे फरार
Follow Us
Follow Us:

माझ्याकडे दैवी शक्ती आहे, कर्करोगासारख्या गंभीर आजारांना मंत्राने बरे करतो, ज्या महिलांना मूल होत नाही अशा महिलांना मूल देतो, घरातल्या सर्व समस्या मंत्रोच्चाराने दूर करतो असे सांगून सामान्य जनतेची आणि महिलांची आर्थिक फसवणूक करत जनतेला वेठीस धरणारा वडगावपान (ता. संगमनेर) येथील दत्तधाम सरकार दरबारचा तथाकथित भोंदूबाबा राजेंद्र बापू गडगे याच्यावर अखेर गुन्हा दाखल झाला आहे. त्याच्यासह तिघांना काल रात्री उशीरा अटक करण्यात आली आहे. दरम्यान, भोंदू बाबा गडगे यास आज कोर्टासमोर उभे केले असता सहा दिवसांची २३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

Sambhajinagar : पिण्याच्या पाण्यासाठी वणवण; टँकर प्रस्तावाकडे प्रशासनाकडून होतेय दुर्लक्ष, ग्रामस्थांनी दिला आंदोलनाचा इशारा

दत्ताधाम आश्रमातील डॉ. मोहन पुरी, ज्ञानेश्वरी गडगे (दोघे रा. वडगाव पान), सुरज शंदे व मधुकर शिदे (दोघे रा. रहिमपूर ता. संगमनेर) अशा एकूण पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य सचिव रंजना गवांदे यांनी संगमनेर तालुका पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून जादूटोणा विरोधी कायदा, आयटी ॲक्ट, ड्रग्ज ॲन्ड मॅजिक रेमेडी ॲक्ट, मेडिकल प्रॅक्टिशनर ॲक्ट, बनावट व्हिडिओ तयार करून व्हायरल करणे आदी गंभीर कलमान्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दत्तधाम सरकारचा भोंदू महाराज गडगे व त्याचा साथीदार मधुकर शिंदे या दोघांना बेड्या ठोकून गजाआड करण्यात आले आहे, उर्वरित तिघेजण फरार आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

तक्रार देण्यास कोणी पुढे येईना

या गंभीर प्रकाराची अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दखल घेतली होती. भोंदूबाबावर गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करावी, तसेच दत्तधाम दरबार बंद करावा अशी मागणी अंनिसच्या राज्य सचिव ॲड, रंजना गवांदे यांनी पोलिस प्रशासनाकडे केली होती.

मात्र तक्रार देण्यास भक्तगण पुढे येत नसल्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यास विलंब होत होता. अखेर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पुढाकार घेऊन गडगेबाबाचा भंडाफोड केला.

११ हजार, २१ हजार आणि ५१ हजार…

संगमनेर तालुक्यातील वडगाव पान आणि मनोली गावाच्या शिवावर दत्तधाम सरकार या नावाने गेली अनेक वर्षापासून दरबार भरवला जातो. मंत्रोच्चार व कथित चमत्काराने शारीरिक दुर्धर असणारे आजार बरे करण्याचे काम गडगेबाबा करतात, असे दत्तधाम युट्युब चॅनेलद्वारे सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल करण्यात येत असे. घरातल्या सर्व समस्या मंत्रोच्चाराने दूर करतो असे सांगून सामान्य लोकांकडून ११ हजार, २१ हजार आणि ५१ हजार अशा रकमा घेऊन भक्तांची लूट करत असल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

आश्रमात होत असे विजेची चोरी

वडगाव पान येथील दत्तधाम सरकार या आश्रमावर महावितरणच्या भरारी पथकाने छापा टाकला. या छाप्यात मीटरला बायपास करून सुमारे ७ किलोवॅटची वीज चोरी केली जात असल्याचे उघड झाले आहे. चीजचोरी करणाऱ्याऱ्यांना दंडात्मक बिल दिले जाईल. ते भरण्यासाठी सात दिवसांची मुदत दिली जाईल. सात दिवसांत दंडाची रक्कम भरली नाही, तर महावितरणमार्फत गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती महावितरण संगमनेर उपविभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप वट्टमवार यांनी दिली.

Web Title: Fake baba rajendra gadge arrested in sangamner fraud case maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2026 | 03:11 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Marathi News
  • Sangamner

संबंधित बातम्या

Anil Kapoor: अनिल कपूर यांचा कव्वाली लुक आणि एनर्जीचा धमाका, ‘इंडियाज टॉप 1%’ चं नवं टीझर आलं समोर
1

Anil Kapoor: अनिल कपूर यांचा कव्वाली लुक आणि एनर्जीचा धमाका, ‘इंडियाज टॉप 1%’ चं नवं टीझर आलं समोर

“Are We Muslims?”Javed Akhtar: ‘आपण मुस्लिम आहोत का?’ फरहानच्या त्या एका प्रश्नाने घरात काय घडलं? वाचा भन्नाट किस्सा
2

“Are We Muslims?”Javed Akhtar: ‘आपण मुस्लिम आहोत का?’ फरहानच्या त्या एका प्रश्नाने घरात काय घडलं? वाचा भन्नाट किस्सा

Avadhoot Gupte: ‘हा धंदा विद्यानंदा…’ पुण्याच्या बापटांसाठी अवधूत गुप्तेंनी गायले भन्नाट गाणे; VIDEO चर्चेत
3

Avadhoot Gupte: ‘हा धंदा विद्यानंदा…’ पुण्याच्या बापटांसाठी अवधूत गुप्तेंनी गायले भन्नाट गाणे; VIDEO चर्चेत

Unfolds Across 2 Seasons: बाप-लेकाचं नातं पाहून डोळे पाणावतील! IMDbवर 7.9 रेटिंग असलेली ‘ही’ सीरिज या विकेंडला नक्की पाहा….
4

Unfolds Across 2 Seasons: बाप-लेकाचं नातं पाहून डोळे पाणावतील! IMDbवर 7.9 रेटिंग असलेली ‘ही’ सीरिज या विकेंडला नक्की पाहा….

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.